गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१

!! आंतरराष्ट्रीय वृध्द दिवस !! (१ ऑक्टोबर )

 


!! आंतरराष्ट्रीय वृध्द  दिवस !!
   (१ ऑक्टोबर )



           वृद्धांना होणाऱ्या त्रासाविषयी जागरूकता निर्माण करणे. त्यांच्यामध्ये सुसंवाद वाढविणे .त्यांनी समाजाप्रती दिलेल्या योगदानाचे कौतुक करणे यासाठी १ ऑक्टोबर  हा दिवस आंतरराष्ट्रीय वृध्द दिवस( आजी- आजोबा दिवस ) म्हणून साजरा केला जातो.
           आंतरराष्ट्रीय वृध्द दिवस (आजी आजोबा दिवस कसा साजरा करावा.
१) आजी आजोबांसमवेत वेळ घालवावा. २)वृद्धाश्रम आणि स्वयंसेवी संस्थांना भेट द्यावी.
३)त्यांच्यासाठी वाढदिवस साजरा करुन
  केक कापावा.
४) वृध्दाना भेट कार्ड द्यावीत.
          आजी आजोबा संस्कारपीठ आहे. खासकरून नातवंडांना चांगली दिशा देण्याचे काम ते करत असतात. आदर्श समाजनिर्मितीसाठी आजी आजोबा यांची गरज आहे.भारतीय कुटुंबसंस्था जगात आदर्श मानली जाते. आजही तीन तीन पिढया सुखाने एकत्र नांदताना दिसतात.
           एखाद्या घरात दोघेच राहणार असतील, त्यांच्यात काही विसंवाद झाल्यास त्यांना कोण मार्गदर्शन करणार. विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचे काम घरातील वृध्दच करीत असतात. चला आपण आपल्या आजी आजोबांची काळजी घेऊया. हा दिवस आनंदात साजरा करुया.
        संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

!!माधवराव सिंधिया स्मृतिदिन !! (३० सप्टेंबर )

 

!!माधवराव सिंधिया स्मृतिदिन !!
   (३० सप्टेंबर )



    माधवराव जिवाजीराव सिंधिया जन्म:१० मार्च १९४५ मृत्यू - ३० सप्टेंबर २००१  एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मंत्री होते . १९६१ मध्ये ते ग्वाल्हेरचे मराठ्यांच्या सिंधिया राजघराण्याचे वंशज म्हणून  महाराजा बनले होते . त्यांचा कार्यकाळ १९६१ ते १९७१ असा होता. तथापि २६ व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय संविधानानुसार सर्व संस्थाने रद्द करण्यात आली.  त्यांचे संस्थानही रद्द करण्यात आले.आपोआपच त्यांचे राजेपण गेले. माधवराव सिंधिया (शिंदे )
यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड हे  आहे.त्या गावाला त्यांनी भेट दिली होती. कण्हेरखेडमध्ये त्यांचा पुतळा आहे.
       सिंधियाचा जन्म ग्वाल्हेरच्या शेवटचा शासक महाराजा , जिवाजीराव सिंधिया येथे झाला . त्यांचे शालेय शिक्षण सिंधिया स्कूल , ग्वाल्हेर येथे झाले आणि त्यानंतर विंचेस्टर कॉलेज आणि ऑक्सफोर्ड येथील न्यू कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले .माधवराव सिंधिया लोकसभेचे ९ वेळा सदस्य झाले. ते केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे, नागरी उड्डाण ,मनुष्यबळ विकास आदि मंत्री  होते.भारतीय माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (आयआयआयटीएम) स्थापन करण्याचे श्रेय सिंधिया यांनाच जाते. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षदेखील होते .३० सप्टेंबर २००१ रोजी विमान अपघातात माधवराव सिंधिया यांचे निधन झाले.
            माधवराव सिंधिया (शिंदे ) यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

मंगळवार, २८ सप्टेंबर, २०२१

जागतिक हृदय दिन !! (२९ सप्टेंबर )

 

!! जागतिक हृदय दिन !! (२९ सप्टेंबर )



       जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो.
World Heart Day :.... म्हणून आज जागतिक हृदय दिन साजरा केला जातो; जाणून घ्या हृदय विकारांची लक्षणं
सप्टेंबर २९ ला  जागतिक हृदय दिन जगभरात साजरा केला जातो. जागतिक हृदय दिन हा कौटुंबिक, शासकीय, सामाजिक पातळीवर हृदयांच्या आरोग्यासंबंधी जनजागृती पसरवण्यासाठी साजरा केला जातो.  वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्यामते (CVD) धुम्रपान, डायबिटीस, उच्च रक्तदाब,  लठ्ठपणा, प्रदुषण यांमुळे हृदयासंबंधी आजार वाढत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयासंबंधी आजारांमुळे होतो.
       जागतिक आरोग्य संघटनेनं  २०१३ मध्ये नॉन कम्युनेकेबल डिसीज नियंत्रणात आणण्यासाठी मोहीम सुरू केली होती. (CVD)  कार्डीओ वॅस्क्युलर डिसीज त्यातील महत्वाचा भाग होता. २०२५ पर्यंत  (CVD) मुळे वाढणारा मृत्यूदर  २५ टक्क्यांनी कमी करणं हे त्या मागचं उद्दिष्ट  होतं.  हृदयाच्या आजारांमुळे वाढणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दिवस  साजरा केला जातो. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी कोणती लक्षणं दिसतात. याबाबत सांगणार आहोत.
       कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते.  त्याला एंजायना पेन असं सुद्धा म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे.
        अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिने चढताना- उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये अनेकदा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो. काहीही खाल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. याशिवाय  काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळणं यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.
         चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात. सगळ्यात महत्वाचं लक्षणं म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो. या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला कफची समस्या असून हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं.
            अनेकाना कोणतेही शारीरिक श्रमाचे काम न करता घाम येण्याची समस्या जाणवते. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची कारणं वेगवेगळी असतात. मादक पदार्थांचे सेवन, लठ्ठपणा, आनुवांशिकता ही कारणं हार्ट अटॅकची असू शकतात. अशी लक्षणं दिसत असल्यास वेळीच तज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्या.
माहिती स्रोत :  लोकमत मधील लेख
संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

भगतसिंग जन्मदिन !!(२८ सप्टेंबर )

 

!! भगतसिंग जन्मदिन !!(२८ सप्टेंबर )



             भगतसिंग जन्म :  २८ सप्टेंबर १९०७ मृत्यू : २३ मार्च १९३१ हे एक भारतीय क्रांतिकारक होते. हिंदुस्थानातील ब्रिटिश साम्राज्याविरुद्धच्या लढ्यात त्यांनी केलेल्या दोन हिंसात्मक कार्यांमुळे वयाच्या २३व्या वर्षी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली.
     भगतसिंग यांच्यावर  जहाल मतवादी लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपीनचंद्र पाल यांच्या विचारांचा प्रभाव जास्त होता.सायमन कमिशनला विरोध करत असताना झालेल्या लाठीमारात लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला म्हणून एक महिन्यातच  ब्रिटिश पोलीस अधिकारी जॉन सँडर्सची हत्या केली.
      भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात,तसेच सामाजिक कामाचा कुटूंबाचा वारसा भगतसिंग यांना लाभला होता.समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली. चंद्रशेखर आझाद, राजगुरू यांच्याबरोबर भगतसिंगही त्यामध्ये प्रमुख होते. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे, शेतकरी- कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक-आर्थिक व्यवस्था उलथून टाकणे, सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करण्याला भगतसिंग यांनी महत्त्व दिले.
               सँडर्सच्या मृत्यूनंतर सरकारने क्रांतिकारकांची धरपकड केली.त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले.२३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी "मेरा रंग  दे बसंती चोला" हे गीत गात फाशी गेले.
भगतसिंग यांच्या बलिदानाबद्दल कुसुमाग्रज म्हणतात.
"जरी न गातील भाट डफावर तुझे तुझेच हे रे,तुझेच बलिदान, सफल जाहले."
              भगतसिंग यांच्या वीरश्रीस सलाम,त्यांना विनम्र अभिवादन.
      संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८
   





रविवार, २६ सप्टेंबर, २०२१

!! जागतिक पर्यटन दिवस !! (२७ सप्टेंबर )

 

!! जागतिक पर्यटन दिवस !!
    (२७ सप्टेंबर )



   
आज २७ सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन.....जगभरात हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो.
        हिरवा निसर्ग, गर्द झाडी, निळशार समुद्र आणि मस्त भटकंती…हे शब्द कानावर पडले तरी आपल्यातील अनेक जण फिरण्याचे प्लॅनिंग करण्यास सुरुवात करतात. वर्षभरातून एकदा तरी माथेरान, महाबळेश्वर, गोवा ते थेट लडाखपर्यंतचे एखादा प्लॅन हा ठरलेला असतो. आज २७ सप्टेंबर म्हणजेच जागतिक पर्यटन दिन…..जगभरात हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो.
        पर्यटनातून ग्रामीण विकास अशी यंदाच्या वर्षीची संकल्पना आहे. ही संकल्पना घेऊन यंदाचा पर्यटन दिन साजरा केला जातो. कोरोना काळात पर्यटन क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारुन सर्व पर्यटन क्षेत्र सुरु व्हावे, असे अनेक पर्यटकांचं म्हणणं आहे.
          पर्यटन क्षेत्रात रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने पर्यटन क्षेत्रात जागरुकता व्हावी, पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी हा दिवस साजरा केला जातो. पर्यटन क्षेत्राच्या जोरावर कोणत्याही देशातील आर्थिक स्थिती सुधारु शकते. नैसर्गिक सौदर्य, संस्कृती पाहण्यासाठी देशाच्या विविध भागांत लोकांनी जावं म्हणून पर्यटन विकास प्रकल्प महत्वाचे ठरतात. सिंगापूर सारख्या काही देशांची आर्थिक स्थिती ही फक्त पर्यटन क्षेत्रावर अवलंबून असते.
       दरवर्षी पर्यटन दिवस हा वेगवेगळ्या संकल्पनेवर साजरा केला जातो. यंदाचा पर्यटन दिवस हा पर्यटन आणि ग्रामीण विकास या संकल्पनेवर साजरा केला जात आहे. ग्रामीण भागातील तरुण आणि स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करुन देणे, पर्यटनामुळे कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध होतो.
       जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात १९७० पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. २७ सप्टेंबर १९८० रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.
     संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

!! लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर स्मृतिदिन !!(२६ सप्टेंबर )

 


!! लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर स्मृतिदिन !!(२६ सप्टेंबर )



 जन्म:२० जून १८६९ मृत्यू:२६ सप्टेंबर १९५६  हे मराठी, हे भारतीय उद्योजक होते. ते किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक होते.वडील
काशिनाथ किर्लोस्कर यांनी
१८८८ साली बेळगावात सायकल दुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. शेतीसाठी त्यांनी बनवलेले लोखंडी नांगर हे पुढे विस्तारलेल्या किर्लोस्कर समूहाचे पहिले उत्पादन होते. किर्लोस्करवाडी येथे त्यांनी  १९१० साली कारखाना काढला; तसेच कारखान्यातील कर्मचाऱ्यांसाठी औद्योगिक वसाहत स्थापन केली.
त्यांच्यानंतर किर्लोस्कर समूहाची धुरा त्यांचे पुत्र शंतनुराव किर्लोस्कर यांनी सांभाळली.
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१

!! भारताचे १३ वे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह जन्मदिन !!(२६ सप्टेंबर )

 


!! भारताचे १३ वे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह जन्मदिन !!(२६ सप्टेंबर )



           मनमोहन सिंह जन्म:२६ सप्टेंबर १९३२ हे भारताचे १३ वे पंतप्रधान होते. त्यांचा कार्यकाळ २२ मे २००४ ते २६ मे  २०१४ असा होता. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात (१९९१ ते १९९६) ते अर्थमंत्री होते. त्यावेळी ते लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य नव्हते. नंतर त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून आसाममधुन घेण्यात आले.अर्थमंत्री असताना त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या.आयात निर्यात धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणला. उदारीकरणाचा स्वीकार करुन देशाची आर्थिक स्थिती मजबूत केली.
            राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते १५ वे गव्हर्नर होते. भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांनी काही काळ दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिकक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले.   
      डॉ. मनमोहन सिंह यांना मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान.....
१) पद्मविभूषण
२)सर्वोत्कृष्ट खासदार २००२
३)इंडियन सायन्स काँग्रेस,जवाहरलाल नेहरु पुरस्कार
३) केम्ब्रिज विद्यापीठाचा  अ‍ॅडम
स्मिथ पुरस्कार
  डॉ.मनमोहन सिंह यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१

!! सत्यशोधक समाज स्थापना !! (२४ सप्टेंबर )

 

!! सत्यशोधक समाज स्थापना !!
          (२४ सप्टेंबर )



           सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी महाराष्ट्रात स्थापन झालेला एक कांतिकारक पंथ. समाजाच्या आमूलाग्र मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्धा यांचे निर्मूलन करून वैचारिक क्रांती घडविण्याकरिता महात्मा जोतीराव फुले यांनी समाजातील काही समविचारी मंडळींच्या सहकार्याने २४ सप्टेंबर १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
       सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते.
          सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.
सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली.
त्यासाठी मराठीत मंगलाष्टके रचली.
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
           सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही सूत्रे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे.
(१) ईश्वर (निर्मिक) एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय (निर्मात्याशिवाय) मी इतर कशाचीही पूजा करणार नाही.
(२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही.
(३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो.
(४) निर्मिक सावयव रूपाने अवतरत नाही.
(५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही. (६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.
(७) दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि
(८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.
        सत्यशोधक समाजाच्या विचारानं सर्वांनीच मार्गक्रमण करणे गरजेचे आहे असे मला वाटते.
       संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

!!अभय बंग जन्मदिन !! ( २३ सप्टेंबर )

 


!!अभय बंग जन्मदिन !! ( २३ सप्टेंबर )

 



           डॉ.अभय बंग  हे डॉक्टर आहेत. त्यांचा जन्म २३ सप्टेंबर १९५० ला झाला. ते सर्च या संस्थेमार्फत गडचिरोलीतील ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा आणि संशोधन असे कार्य करतात. बालमृत्यू नियंत्रणावरील त्यांच्या संशोधनाची दखल भारतासोबतच अनेक देशांनी घेतली असून पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेश व अनेक आफ्रिकन देश त्यांनी तयार केलेले बालमृत्यू नियंत्रणाचे प्रतिरूप (मॉडेल) वापरतात. वैद्यकीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये त्यांचे अनेक लेख छापून आलेले आहेत. त्यांचे स्वतःच्या हृदयरोगावरील अनुभवकथनाचे "माझा साक्षात्कारी हृदयरोग "हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
              अभय बंग हे ठाकुरदास आणि सुमन बंग यांचे पुत्र आहेत. ते दोघेही गांधीवादी कार्यकर्ते होते. ठाकुरदास बंग हे गांधीजींना भेटले होते आणि गांधीजींच्या सांगण्यावरून त्यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याऐवजी खेड्यांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. अभय बंग हे वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाच्या वातावरणात वाढले. गांधीजीनी सुरू केलेल्या नयी तालीम या शिक्षणपद्धतीत त्यांचे शिक्षण झाले.
                डॉ.अभय बंग  यांनी नागपूर मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. ची पदवी मिळवली. यात त्यांना तीन विषयात सुवर्णपदके मिळाली. त्यानंतर भारतातील अग्रगण्य समजल्या जाणार्‍या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (पी. जी. आय.) या संस्थेत त्यानी काम केले. सार्वजनिक आरोग्य या विषयाचे शिक्षण देणार्‍या संस्था शोधत ते भारतभर फिरले परंतु त्यांना तसले शिक्षण देणारी एकही संस्था सापडली नाही. नंतर त्यांनी अमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक हेल्थ ही पदवी  १९८४ साली सुवर्णपदकासह मिळवली. तेथे त्यांनी कार्ल टेलर यांच्याकडून सार्वजनिक आरोग्याचे धडे घेतले. यामध्ये ते ९९ टक्के गुणांसह प्रथम आले. ते या संस्थेमध्ये संचालकही होऊ शकले असते. त्यांना अत्याधुनिक रुग्णालयात किंवा रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्याच्या संधी चालून आल्या होत्या. पण त्यांनी शहरी, श्रीमंती आणि आरामशीर जीवनशैली नाकारली आणि गडचिरोलीसारख्या दुर्लक्षित भागाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले.
१)गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी चळवळ :-"अभय बंग डॉक्टर आहेत, त्यानी फक्त आरोग्याचे काम करावे. त्यानी दारूबंदीच्या भानगडीत पडू नये" असे एका पोलीसप्रमुखांचे मत होते. अशा प्रकारच्या कुठल्याच दबावाला बळी न पडता त्यानी हे आंदोलन लोकांच्या मदतीने यशस्वी केले. १९८८ मध्ये सुरू केलेल्या एका महिला जागरण यात्रेत एका स्त्रीने दारूच्या समस्येबद्दल लक्ष वेधले. त्याबरोबर इतर स्त्रियांनीही त्यांच्या नवर्‍याच्या दारू पिण्यामुळे होणारे त्रास सांगितले आणि या समस्येवर काय करता येईल यावर अभय बंग आणि इतर सर्वांनी विचार केला. यावर १०४ गावांमध्ये एक अभ्यास करण्यात आला. यात दारूच्या अर्थशास्त्राविषयी माहिती जमवण्यात आली. गडचिरोलीतील अनेक स्वयंसेवी संघटना एकत्र आल्या. आणि यांनी 'गडचिरोली जिल्हा दारूमुक्त करा' अशी मागणी सुरू केली. यासाठी एक दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातील ३ आमदारांनी यास पाठिंबा दिला. या काळात अभय आणि राणी बंग यांनी मोठ्या संघर्षाला तोंड दिले. ' अभय आणि राणी बंग यांचे मुडदे पाडू' अशी भाषा एका चौकातील सभेत दारू दुकानाच्या मालकांनी केली होती. यावेळी हिरामण वरखेडे, सुखदेव उईके सारखे आदिवासी नेते अभय बंगांच्या पाठीमागे उभे राहिले. आज गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे.
२) नवजात बालकांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास आणि उपाययोजना :-
३) स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नावरील संशोधन :-अमीर्झा आणि वसा या दोन गावांत केलेल्या संशोधनानुसार स्त्रियांमधले गायनॅकॉलॉजिकल आजारांचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे हे सिद्ध झाले आणि यावरील एक पेपर लॅनसेट मध्ये छापून आला आहे. यातील आकडेवारीवरून हे सिद्ध झाले की ९२% स्त्रियांना कुठल्याना कुठल्या प्रकारचा स्त्रियांचा आजार होता. या रिसर्च पेपरमुळे 'मदर ॲन्ड चाईल्ड हेल्थ' अशी घोषणा बदलून वूमन ॲन्ड चाईल्ड हेल्थ अशी घोषणा झाली. आणि जागतिक आरोग्य संघटनेने महिला आरोग्य वर्षाची आखणी केली.
४) सिकल सेल अनिमियावरील संशोधन
५) इ.स. १९८८ साली त्यांनी 'सर्च' नावाची बिगर सरकारी संघटना ५८ गावातील ४८,००० लोकसंख्येसाठी स्थापन केली व आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्याचे काम सुरू केले. आदिवासींना आरोग्यसेवा देण्याकरिता त्यांनी अशिक्षित स्त्रियांनाच आरोग्यसेवेचे किमान प्रशिक्षण दिले. दाई आणि आरोग्यदूत यांच्यामार्फत स्त्रियांना उपचार देण्याचा प्रकल्प ’सर्च’ मध्ये सुरुवातीपासून राबवण्यात येत आहे. डॉ. अभय बंग त्यांचे ग्रामीण सेवा आणि संशोधनाचे कार्य या सोसायटी फॉर एज्युकेशन ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ( (सर्च) नावाच्या संस्थेमार्फतच करतात. ’सर्च ने जगाला न्युमोनिया हे बालमृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे हे दाखवून दिले.
       डॉ. अभय बंग आणि राणी बंग यांना आजवर अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले, त्यांतले काही :-
१)टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी
२) २००३ सालचा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार
३)२०१८ सालचा पद्मश्री पुरस्कार
      संकलक: राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०२१

!! पदमभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जयंती !!(२२ सप्टेंबर)

 

!! पदमभूषण डॉ.  कर्मवीर भाऊराव पाटील जयंती  !!(२२ सप्टेंबर)



         कर्मवीर भाऊराव पाटील जन्म : २२ सप्टेंबर १८८७ मृत्यू :  ९ मे १९५९ यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. या संस्थेची महाराष्ट्रात  ४१ महाविद्यालये, ४३९ हायस्कुले, कॉलेजच्या मुलांसाठी २७ वसतीगृहे, १६० उच्च माध्यमिक विद्यालये, १७ शेती महाविद्यालये, ५ तंत्र विद्यालये, ५ इंग्रजी माध्यमाच्या शाळा, ८ डी.एड. महाविद्यालये, ४५ प्राथमिक व पूर्व प्राथमिक शाळा, शाळेच्या मुलांसाठी ६८ वसतिगृहे, ८ आश्रमशाळा, २ आयटीआय व इतर. एकूण संस्था ६७९ अशा आहेत.
           भाऊराव पाटील यांनी सुरुवातीस काही काळ ओगले काच कारखाना,किर्लोस्कर नांगर कारखाना, कूपर इंजिनिअरिंग वर्क्स येथे काम केले होते. सुरुवातीला काही काळ शिकवण्या घेतल्या होत्या. त्यावेळी लोक त्यांना पाटील मास्तर असे लोक संबोधित.त्यांच्या शिक्षणविषयक कामात त्यांची पत्नी  "रयतमाऊली"लक्ष्मीबाई पाटील यांचाही फार मोठा वाटा आहे. साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले.त्याचे नाव शाहू बोर्डिंग असे आहे.तिचे उदघाटन महात्मा गांधी यांनी केले होते. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालवण्याचा यशस्वी प्रयोग केला.
                   कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा जिल्ह्यातील काले या गावी सत्यशोधक समाजाच्या मेळाव्यामध्ये बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी 'रयत शिक्षण संस्था' या नावाने एक शैक्षणिक संस्था स्थापन करण्यात यावी असा ठराव मांडला व तो एक मताने मंजूर झाला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी विजया दशमीच्या शुभमुहूर्तावर काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. स्वत:च्या मालकीची जमीन करणाऱ्या शेतकऱ्यास 'रयत' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या प्रजेला 'रयत' म्हणून संबोधित. त्यामुळे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेला 'रयत शिक्षण संस्था' हे नाव सार्थ वाटते.
        कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर सत्यशोधकी विचारांचा प्रभाव होता. शाहू महाराजांची प्रेरणा घेऊनच त्यांनी काम केले. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होणेसाठी शिक्षण आवश्यक आहे.यासाठीच रयत शिक्षण संस्थेची स्थापना. त्यांनी शिक्षणातून समता, बंधुता ही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न. या उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी वसतिगृहे सुरु केली. वसतिगृहात सर्व जातीधर्माचे लोक एकत्र राहत. एकत्र स्वयंपाक करत, एकत्र जेवण करत. यामधून त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला.१९३२ मध्ये महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्यामध्ये" पुणे करार"झाला होता.या ऐक्याच्या स्मरणार्थ युनियन बोर्डिंगची स्थापना पुणे येथे भाऊराव पाटील यांनी केली.
        महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटील यांना "कर्मवीर"ही पदवी देऊन गौरव केला. भारत सरकारने पदमभूषण तर पुणे विद्यापीठाने डी. लिट.ही पदवी दिली.
खालील प्रमुख उद्दिष्टे डोळ्यापुढे ठेऊन रयत शिक्षण संस्थेने आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली.
१)बहुजन समाजामध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.
२) मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.
३)निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यांत 
   प्रेमभाव निर्माण करणे.
४)अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या
   विकासाचे वळण लावणे.
५)एकीचे महत्त्व कृतीने पटवून देणे.
६) सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
७)बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल, तेव्हा संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.कमवा आणि शिका योजना ही संस्थेने शिक्षण क्षेत्रास दिलेली मोठी देणगी होय.
     नुकतेच रयत शिक्षण संस्थेला कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.या विद्यापीठात ३ ते ५ महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. यामध्ये सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (स्वायत्त ),धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त ),छत्रपती शिवाजी महाविद्यालय(स्वायत्त ), यांचा समावेश असणार आहे. हे विद्यापीठ शासनमान्य,पूर्ण अनुदानित असून अकॅडेमिक अधिकार संस्थेकडे असणार आहेत.
                 रयत गीत
   रयतेमधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे,
   वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे.!!ध्रु!!
           पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारत सरकारने "भारतरत्न" देऊन सन्मानित करावे. कर्मवीरांच्या कार्याचा मरणोत्तर गौरव व्हावा असे वाटते.
        पदमभूषण  डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
(रयत गीत ऐकण्यासाठी आपणास यु ट्यूबची लिंक देत आहे, आपण गीत ऐकावे.)
https://youtu.be/FZBSebom7uI
   (संग्रहित माहिती )
  संकलक : राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८

सोमवार, २० सप्टेंबर, २०२१

!! जागतिक शांतता दिन !! (२१ सप्टेंबर )

 


      !! जागतिक शांतता दिन !! 
      (२१ सप्टेंबर )



     इंटरनेटचे जाळे, खुले आर्थिक धोरण (उदारीकरण, खासगीकरण व जागतिकीकरण) आणि स्मार्ट फोन यामुळे ‘जग एक खेडे’ बनले आहे. आपल्या देशात एके काळी खेडी स्वयंपूर्ण होती; पण हे जगरूपी खेडे स्वयंपूर्ण होणार नाही. देशोदेशी अंतर्गत होणारी देवाण घेवाण ही सुरूच राहणार असल्याने, शांततामय संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे. म्हणून २१ सप्टेंबर हा जागतिक शांतता दिन साजरा करण्यास सुरुवात झाली आहे. आज जगभर हा दिवस साजरा होईल; पण शांततेचे काय? याबाबत थोडेसे...
        मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी शांतता अत्यंत महत्त्वाची बाब आहे; पण जगभराचा विचार करता धर्म आणि वर्चस्ववाद यामुळे संकटांना सामोरे जावे लागले. परिणामी, जागतिक अशांतता निर्माण झाली. त्यातील एक भाग म्हणजे आजपर्यंत जगाने पाहिलेली दोन जागतिक महायुद्धे. या दोन युद्धांमुळे जगातील अनेक राष्ट्रांचे अपरिमित नुकसान झाले. तरीही जग तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज असल्याचे दिसतेय, मग तेलापायी वा पाण्यापायी. अशा स्थितीत जागतिक शांतता दिन ही साजरा होतोय. हा एक चांगला संदेश असून, एक शांततामय जीवनाच्या आशेचा किरण म्हणावा लागेल.
             जागतिक शांतता धोक्यात आणण्यामध्ये आतंकवाद हा मोठा घटक असून, त्याची झळ अनेक देशांना बसली आहे व बसत आहे. काही राष्ट्रांना तर आतंकवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी होत आहे. यावरून आंतकवादाचे रूप किती भयानक आहे हे दिसून येते. आंतकवाद ही एक जागतिक समस्या असून, त्यामुळे जागतिक शांतता धोक्यात येत असते. जगातील अनेक राष्ट्रे आतंकवादाने पोखरून निघाली आहेत.
आपल्या देशात आतंकवादाने कहरच केला आहे. नेहमी कुठे ना कुठे कारवाया होत असतात. जगाचे लक्ष असलेल्या काश्मीरच्या वादामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. आपल्या शेजारील देश शेजारधर्म पाळत नसल्याने आपली संरक्षण यंत्रणा नेहमी सज्ज ठेवावी लागते. तसेच वेळोवेळी विविध चाचण्या आणि अणुशक्तीमधून आपली ताकद दाखवून द्यावी लागते. जगामध्ये आशिया खंड हा आतंकवादाचा अड्डा असल्याचे बोलले जाते. काही राष्ट्रांनी अणुबॉम्ब तयार करून जागतिक करार भंग केले आहेत.
       खरे तर जागतिक शांतता ही एखाद्या राष्ट्रातील काही घटनांवरून साधता येत नाही. त्यासाठी विश्वव्यापी पुढाकार घेतला पाहिजे. कारण मूलभूत व चिरंतन विकासातून मानवी कल्याण होण्यासाठी शांतता अत्यंत गरजेची आहे. त्यासाठी दोन मार्ग आहेत एक धाक आणि दुसरा अहिंसा; पण खरे तर यातील अहिंसेचा दुसरा मार्गच पत्करणे
काळाची गरज आहे.
          जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या धर्माचे आचरण होणे गरजेचे आहे. अलीकडे मानवाच्या मूलभूत गरजा आणि भौतिक हव्यास वाढत चालला असून, वाढती  लोकसंख्या व नागरीकरण यातून मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. परिणामी, माणूस आंतकवादाकडे वळू पाहत आहे. त्यासाठी शांततेची गरज असून पहिले, दुसरे महायुद्ध झाले, आता तिसरे महायुद्ध नको. कारण, ते या खेडेरूपी जगाला परवडणारे नाही. नाहीतर हे खेडे अलीकडच्या शस्त्रसामुग्रीमुळे बेचिराख होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून जागतिक शांतता दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मानवता हाच धर्म मानून जगाला शांततेचा संदेश दिला पाहिजे. म्हणून ज्या देशात शांतता नांदेल म्हणजे जगात शांतता नांदेल मानवतेची सत्ता येईल. म्हणजेच मानवी कल्याणला वाव मिळेल आणि सामाजिक स्वास्थ्य निर्माण होण्यास मदत होईल. म्हणून जिथे शांतता असेल तिथे मानवता आहे म्हणावे लागेल, कारण शांतता हे मानवी विकासाचे मूळ आहे.
माहिती स्रोत: दैनिक लोकमतमधील दाजी कोळेकर यांचा लेख
      संकलक: राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

शनिवार, १८ सप्टेंबर, २०२१

!! समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी डॉ. ॲनी बेझंट स्मृतिदिन !! (२० सप्टेंबर )

 

!! समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी
    डॉ. ॲनी  बेझंट स्मृतिदिन !!
       (२० सप्टेंबर )



      होमरूल लीगच्या संस्थापक डॉ.ॲनी बेझंट यांच्याविषयी माहिती
          होमरुल म्हणजे आपला कारभार आपण करणे. यालाच "स्वशासन" म्हणतात. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक सनदशीर व शांततापूर्ण आंदोलन करणारी संघटना  . ॲनी बेझंट ह्या आयरिश असल्यामुळे त्या वारंवार आयर्लंडला जात. आयर्लंडमध्ये १९०८–१३ दरम्यान होमरूलची चळवळ चालू होती. त्यामुळे त्यांना भारतातही स्वराज्यासाठी अशीच चळवळ सुरू करावी, असे वाटले. म्हणून त्यांनी भारतातील चळवळीला ‘होमरूल लीग’ हे नाव दिले. ‘होमरूल’चा शब्दशः अर्थ स्वराज्य असा असून या काळात भारताच्या राजकीय नेतृत्वात एक प्रकारची शिथिलता आली होती. या वेळी ॲनी बेझंट यांनी राजकीय उन्नतीसाठी सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि २५ सप्टेंबर १९१६ रोजी होमरूल लीगची मद्रासमध्ये स्थापना केली.
                 खेडे हा राज्याचाआद्य घटक मानून तेथून जिल्हा, प्रांत व राष्ट्रीय संसदेपर्यंत स्वराज्याची उभारणी करणे, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. अल्पावधीतच तिच्या शाखा मुंबई, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, मथुरा, कालिकत, अहमदनगर, मद्रास आदी ठिकाणी स्थापन झाल्या. एका देशव्यापी संघटनेचे स्वरूप तिला प्राप्त झाले. ॲनी बेझंट यांनी तत्पूर्वी कॉमनविल या साप्ताहिकात २ जानेवारी १९१४ रोजी धार्मिक स्वातंत्र्य, राष्ट्रीय शिक्षण, सामाजिक व राजकीय सुधारणा ही स्वराज्याची उद्दिष्टे उद्धृत केली होती.
      ॲनी बेझंट यांनी आपली दोन पत्रके, भाषणे आणि थिऑसॉफिकल सोसायटीच्या शाखांद्वारे देशभर लीगचा प्रसार-प्रचार केला. तत्पूर्वीच लोकमान्य टिळकांनी होमरूल लीगची कल्पना १९१४ मध्ये मांडली होती. लोकमान्य टिळकांनी पुणे येथे डिसेंबर १९१५ मध्ये राष्ट्रवादींची( जहालांची) परिषद भरविली. तीत नेमलेल्या समितीने बेळगावच्या परिषदेत २८ एप्रिल १९१६ रोजी इंडियन होमरूल लीगच्या स्थापनेचा ठराव संमत करून जोसेफ बॅप्टिस्टा यांना लीगचे अध्यक्ष नेमले.न. चिं. केळकर सचिव झाले. या दोन्ही संघटनांचे कार्य एकमेकींना पूरक असेच होते.
            ब्रिटिश साम्राज्यांतर्गत सनदशीर मार्गांनी लोकजागृती व जनसंघटन हा लीगचा उद्देश होता. लोकमान्य टिळकांनी केसरी-मराठा वृत्तपत्रांतून आणि सभा-संमेलनांतून लीगचा प्रसार केला.
      या चळवळीचा वाढता प्रभाव ब्रिटिश सरकारला असह्य झाल्याने १५ जून १९१७ रोजी ॲनी बेझंट यांना मद्रास येथे स्थानबद्ध करण्यात आले. तत्पूर्वी लखनौ येथे झालेल्या १९१६ च्या काँग्रेस अधिवेशनाच्या वेळी लोकमान्य टिळकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-लीग करार झाला व काँग्रेस–लीग संयुक्त अधिवेशन होऊन स्वराज्याच्या मागणीचा ठराव एकमताने मंजूर केला गेला. मवाळांच्या राजकीय हालचालींना होमरूल लीगने पायबंद घातला. ॲनी बेझंट यांना स्थानबद्ध केल्यानंतर लोकमान्य टिळकांवरही राजद्रोहाचा खटला भरण्यात आला पण उच्च न्यायालयाने त्यांना दोषमुक्त केले.
भारत सचिव माँटेग्यू यांना ॲनी बेझंट यांनी आपल्या लीगतर्फे निवेदन सादर केले. विलायतेस (इंग्लंडला) जाऊन आपले म्हणणे मांडल्याशिवाय कार्यभाग होणार नाही, असे पाहून लोकमान्य टिळकांनी होमरूल लीगतर्फे एक शिष्टमंडळ बॅप्टिस्टांच्या नेतृत्वाखाली १९१७ मध्ये इंग्लंडला पाठविले  व स्वतः इंग्लंडला जाण्याचे प्रस्थान ठेवले  पण त्यांच्या शिष्टमंडळाची पारपत्रे (पासपोर्ट) रद्द करण्यात आली, तर ॲनी बेझंट यांच्या शिष्टमंडळाला जिब्राल्टरहून भारतात परत पाठविण्यात आले. अमेरिकेतील सिनेटर आणि काँग्रेस प्रतिनिधींनी होमरूल लीगची प्रशंसा करून कॅनडा व ऑस्ट्रेलियासदृश स्वराज्य भारतास द्यावे, असे सुचविले. त्याप्रीत्यर्थ इंडियन होमरूल लीगची शाखा न्यूयॉर्कमध्ये काढली. तिने यंग इंडिया हे नियतकालिक जुलै १९१८ मध्ये काढले. त्यानंतर लोकमान्य टिळकांनी लाला लजपत राय, के. डी. शास्त्री, एन्. एस्. हार्डीकर आदी लीग कार्यकर्त्यांना अमेरिकेत पाठविले. त्यांनी सॅन फ्रान्सिस्कोला  १९१९ मध्ये लीगची शाखा काढली.
         जून १९१८ मध्ये माँटेग्यू-चेम्सफर्ड अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात निर्दिष्ट केलेल्या सुधारणांचे ॲनी बेझंट यांनी स्वागत केले. लोकमान्य टिळकांना हे मान्य नव्हते. त्यावरून त्यांच्याशी ॲनी बेझंट यांचे मतभेद झाले. काँग्रेसला स्वयंनिर्णय व संपूर्ण जबाबदारीचे स्वराज्य पाहिजे होते.
       भारतातील वाढता असंतोष,होमरुल चळवळीची वाढती लोकप्रियता, युरोपातील युध्दजन्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर ब्रिटिश सरकारने भारतीयांना राजकीय अधिकार देण्याचे ठरविले. एका परदेशी महिलेचे भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील  कार्य वाखानन्यासारखे आहे. डॉ.ॲनी बेझंट यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
         संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८


!! अनंत चतुर्दशी !!(१९ सप्टेंबर

 


!! अनंत चतुर्दशी !!(१९ सप्टेंबर )




अनंत चतुर्दशी : भाद्रपद शुद्ध चतुर्दशी हा अनंतपूजेचा दिवस, एक व्रत व उत्सव म्हणून साजरा करतात. वनवासामध्ये पांडवांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली, तेव्हा कृष्णाने त्यांना हे अनंतव्रत, इच्छित-फलदायक म्हणून करण्यास सांगितले. अनंतपूजनात उदक-कलशाभोवती दोरा गुंडाळला जातो. तो दोरा पुढे पवित्र म्हणून सांभाळावयाचा असतो. ह्या व्रताचा प्रसार वैष्णवात विशेष आहे. चौदा वर्षे हे व्रत आचरल्यावर त्याचे उद्यापन करतात. गणेशचतुर्दशीला गणपतीची प्रतिष्ठापना करून अनंत चतुर्थीला त्याचे सार्वजनिक रीत्या उत्सवपूर्वक विसर्जन करण्याची प्रथा महाराष्ट्रात पाळली जाते.
      सलग दोन वर्षे आपल्या राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने विसर्जन मिरवणुकीला मर्यादा आलेल्या आहेत. गर्दी होणार नाही याची आपणही काळजी घ्या. गणपतीचे विसर्जन साधेपणाने करा.
आपणा सर्वांना अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा.   
       संकलक :राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

!! संगीतकार विष्णु नारायण भातखंडे स्मृतिदिन !! (१९ सप्टेंबर )

 


!!  संगीतकार विष्णु नारायण भातखंडे स्मृतिदिन !!  (१९ सप्टेंबर )

 



विष्णु नारायण भातखंडे जन्म : १० ऑगस्ट १८६० मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६.
हे  हिंदुस्थानी संगीतक्षेत्रातील एक थोर संशोधक, संगीतशास्त्रकार व संगीतप्रसारक. जन्म वाळकेश्वर, मुंबई येथे. मूळ गाव कोकणातील नागाव (जि. रायगड). त्यांचे वडील मुंबईतील एका धनिकाच्या जमीनजुमल्याचे कारभारी होते. त्यांना संगीताची आवड होती आणि ते स्वरमंडलही वाजवित असत. त्यामुळे गजानन ऊर्फ विष्णू यांस लहानपणापासून संगीताची गोडी लागली. भातखंडे हे लहानपणीच बासरी वाजविण्यास शिकले. महाविद्यालयात शिकत असताना ते सतारही वाजविण्यास शिकले. सुरुवातीस गोपाळ गिरी यांच्याकडे व नंतर अंध वादक वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे धडे घेतले. ते एलफिन्स्टन महाविद्यालयातून १८८५ मध्ये बी.ए. व पुढे एल.एल.बी. झाले.
       भातखंडे १८८४ मध्ये काही पारशी संगीतप्रेमींनी चालविलेल्या ‘गायनोत्तेजक मंडळी’ मध्ये (स्थापना १८७०) दाखल झाले होते. तेथे त्यांना त्या काळातील नामांकित गायक-वादकांचे गायन-वादन ऐकण्याची संधी मिळाली. ही संस्था त्यांच्या व्यासंगाची गंगोत्रीच ठरली व तेथे त्यांच्या संशोधनाला चालनाही मिळाली. ह्या संस्थेत त्यांनी अनेक वर्षे विनावेतन संगीत शिकविले आणि वेगवेगळ्या थोर कलावंतांकडून पारंपरिक धृपदे, ख्याल, होरी, तराणे, ठुमरी यांची माहिती व चिजा गोळा करण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना असे आढळून आले, की गायकांच्या चिजांमध्ये व्यक्त होणाऱ्या रागस्वरूपांचा प्राचीन ग्रंथातील रागविचारांशी व उपपत्तींशी नीट मेळ बसत नाही. शास्त्रीय स्वरलिपिपद्धतीचा प्रचार नसल्याने आणि उपपत्तींचे गायकांना ज्ञान नसल्याने ते पारंपरिक चिजांमध्ये बदल करीत आणि नवीनही चिजा बनवीत. त्यामुळे उपलब्ध रागरागिण्या व चिजा हाच संशोधनाचा व उपपत्तींचा पाया मानून भातखंडे यांनी आपल्या जन्मभर चालविलेल्या संगीतकलेच्या पद्धतशीर अभ्यासाला प्रारंभ केला. गायनोत्तेजक मंडळीच्या नियतकालिक बैठकांमध्ये ते वरील विषयासंबंधी पद्धतशीर विचार मांडू लागले. जुन्या ग्रंथांतील भाषा व विचार अस्पष्ट, संदिग्ध व शंकास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. तद्वतच प्राचीन ग्रंथांतर्गत संगीतशास्त्र व प्रत्यक्ष प्रचलित गानव्यवहार यांतील पूर्ण फारकतही त्यांच्या निदर्शनास आली होतीच. त्यातून संगीतशास्त्राची नव्याने आमूलाग्र फेरमांडणी करणे व प्रचलित संगीतव्यवहाराशी त्याची सांगड घालणे, हे त्यांना अत्यावश्यक वाटू लागले. आपला वकिलीचा व्यवसाय सोडून त्यांनी संगीतसंशोधनाला सर्वस्वी वाहून घेतले. स्वत:वर काटेकोरपणे बंधने घालून केवळ संगीतसंशोधनासाठी त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली (१९०४, १९०७ व १९०८-०९). ठिकठिकाणच्या संगीतकेंद्रांना भेटी देऊन तेथील शास्त्रकार व कलावंत ह्यांच्यासमवेत त्यांनी चर्चा केल्या. संगीतावरचे दुर्मीळ ग्रंथ, हस्तलिखिते यांचा शोध घेऊन, त्यांतील तत्त्वविचारांची चिकित्सा केली.  हिंदुस्थानी संगीतातील स्वरलिपिरचना, रागविचार, त्याचे आरोहावरोह, श्रुतिविचार, थाटपद्धती, वादी-संवादी स्वर इ. विषयांसंबंधी तात्त्विक सांगोपांग चर्चा व त्या अनुषंगाने विविध उपपत्ती त्यांनी आपल्या ग्रंथांतून मांडल्या. तसेच एक खास स्वरलिपिपद्धती प्रस्थापित केली. पंडित भातखंडे यांच्या संगीतकार्याची त्रिसूत्री म्हणजे प्राचीन संगीतविद्येचे संशोधन, नव्या संगीतशास्त्राची नव्याने उभारणी आणि ह्या संगीतशास्त्राचा प्रचार व प्रसार होय. त्यासाठी त्यांनी संगीतविद्यालयाची स्थापना केली. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी आपली सरकारी संगीतपाठशाळा नव्या पद्धतीने चालवण्यासाठी भातखंडे यांच्या हवाली केली (१९१६). ग्वाल्हेरचे महाराज माधवराव शिंदे यांनी त्यांच्या देखरेखीखाली ‘माधव संगीत महाविद्यालय’ नव्याने स्थापन केले (१९१८) आणि मुख्य म्हणजे भातखंडे यांनी लखनौला तेथील स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने ‘मॉरिस कॉलेज ऑफ हिंदुस्थानी म्युझिक’ याची स्थापना केली (१९२६). या संस्थेचेच रूपांतर पुढे ‘भातखंडे संगीत महाविद्यालया’मध्ये झाले. तसेच या संगीतविद्यालयांसाठी सुसूत्र असा अभ्यासक्रम त्यांनी आखला व त्यानुसार क्रमिक पुस्तकेही तयार केली. संगीतविषयक खुल्या चर्चा व विचारविनिमय यांद्वारे संगीप्रसार व्हावा, म्हणून संगीतपरिषदा भरवण्याची मूळ कल्पनाही त्यांचीच होय. त्यानुसार बडोदे (१९१६), दिल्ली (१९१८), वाराणसी (१९१९) व लखनौ (१९२४ व १९२५) येथे परिषदा भरवण्यात त्यांनी पुढाकार घेतला. शिवाय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी लक्षणगीतसंग्रहासारख्या ग्रंथरचनाही केल्या. बव्हंशी १९०८ ते १९३३ या कालावधीत त्यांनी आपली ग्रंथरचना केली.
वाळकेश्वर, मुंबई येथे भातखंडे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.भातखंडे यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक: राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

शुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१

!! मृत्युंजयकार शिवाजी सावंत स्मृतिदिन !! (१८ सप्टेंबर )

 

!! मृत्युंजयकार शिवाजी सावंत
     स्मृतिदिन !! (१८ सप्टेंबर )



शिवाजी गोविंदराव सावंत जन्म: ३१ऑगस्ट १९४० मृत्यू:१८ सप्टेंबर  २००२ हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात.
    शिवाजी सावंत यांचा जन्म  सामान्य शेतकरी कुटुंबात, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावात झाला. सावंत उत्कृष्ट कबड्डीपटू होते. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजऱ्यात झाल्यावर त्यांनी कोल्हापुरात बी.ए.चे प्रथम वर्ष पूर्ण केले आणि मग वाणिज्य शाखेतील पदविका (GDCA) घेतली. टायपिंग, शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टात कारकुनाची नोकरी केली, आणि नंतर ते कोल्हापुरातील राजाराम प्रशालेत १९६२ ते १९७४ या काळात शिक्षक होते.
        पुण्यात स्थायिक झाल्यावर १९७४ ते १९८० अशी सहा वर्षे त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या ’लोकशिक्षण’ या मासिकाचे सहसंपादक, व नंतर संपादक म्हणून काम केले. १९८३ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पुढील आयुष्यात फक्त लेखनावरच पूर्ण लक्ष केंद्रित केले.
       शिवाजी सावंत हे १९९५ पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्षे उपाध्यक्ष होते. १९८३ मध्ये बडोदा येथे भरलेल्या "बडोदा मराठी साहित्य संमेलनाचे" ते संमेलनाध्यक्ष होते.
        मृत्युंजय कादंबरीच्या लेखनासाठी शिवाजी सावंत यांना थेट कुरुक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. प्रदीर्घ संशोधन, चिंतन आणि मनन यांतून रससंपन्न अशा ‘मृत्युंजय’ या वास्तववादी कादंबरीचा जन्म झाला आणि शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत पोहोचले.
        ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगंधर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली.शिवाजी सावंत यांची कादंबर्‍यांसहित अन्य पुस्तके इंग्रजी भाषेत अनुवादित झाली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद सावंत यांची अमेरिकास्थित कन्या कादंबिनी यांनी केला आहे.
       मृत्युंजय या कादंबरीवर आधारलेली काही मराठी-हिंदी नाटकेही रंगभूमीवर आली. मृत्युंजय ही कादंबरी दानशूरपणासाठी प्रख्यात असलेला महान योद्धा कर्णाच्या जीवनावर, तर युगंधर ही कादंबरी भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. मराठी भाषेत कसदार लेखन करून साहित्याची सेवा केल्याबद्दल त्यांना भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
          कर्‍हाड येथे भरणार्‍या ७६व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. आपल्या उमेदवारीच्या प्रचारासाठी गोव्यात गेले असताना मडगाव येथे, शिवाजी सावंत यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.
शिवाजी सावंत यांना मिळालेले सन्मान/पुरस्कार
१)मृत्यंजयसाठी -महाराष्ट्र राज्य पुरस्कार
  (१९६७)
२) न. चिं. केळकर पुरस्कार (१९७२)
३)ललित मासिकाचा पुरस्कार (१९७३)
४)भारतीय ज्ञानपीठाचा ‘मूर्तिदेवी
   पुरस्कार’ (१९९४)
५)फाय फाउंडेशन पुरस्कार (१९९६)
६)आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ पुरस्कार
  (१९९८)
७)पूनमचंद भुतोडिया बंगाली पुरस्कार (ताम्रपटासह, कलकत्ता -१९८६)
८)’मृत्युंजय’च्या प्रतिमा दवे यांनी
केलेल्या गुजराती भाषांतराला, गुजरात
सरकारचा साहित्य अकादमी पुरस्कार
(१९९०)त्याच गुजराती भाषांतराला केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कार (१९९३)
९)छावासाठी -महाराष्ट्र शासनाचा
   पुरस्कार (१९८०)
१०)बडोदे मराठी साहित्यसंमेलनाचे
  अध्यक्षपद (१९८३)
११)पुणे महापालिकेतर्फे सन्मानपत्र
  (१९९७)
१२)कोल्हापूर येथे १९९८ मध्ये भरलेल्या सातव्या कामगार साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद
१३)पुणे विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार (१० फेब्रुवारी २०००)
१४)'कोल्हापूरभूषण’ पुरस्कार
   (२ मार्च २०००)
१५)महाराष्ट्र सरकारचा जीवनगौरव हा साहित्यिक सन्मान (मे २०००)
१६)भारत सरकारच्या मानव संसाधन व सांस्कृतिक कार्यालयाकडून त्यांना ज्येष्ठ साहित्यिक शिष्यवृत्ती.
       शिवाजी सावंत याच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुणे येथे मृत्युंजय प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले आहे. या प्रतिष्ठानातर्फे दर वर्षी ’मृत्युंजकार शिवाजीराव सावंत स्मृतिसाहित्य आणि स्मृति समाजकार्य’या नावाचे दोन पुरस्कार.देण्यात येतात.
त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या जन्मगावी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या वतीने प्रतिवर्षी ‘मृत्युंजयकार शिवाजी सावंत कादंबरी पुरस्कार’ दिला जातो.
   शिवाजी सावंत यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
          संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१

! कवी वसंत बापट स्मृतिदिन !! (१७ सप्टेंबर )

 

!! कवी वसंत बापट स्मृतिदिन !!
(१७ सप्टेंबर )



विश्‍वनाथ वामन बापट ऊर्फ वसंत बापट जन्म:२५ जुलै१९२२ मृत्यू: १७ सप्टेंबर २००२ हे मराठी कवी होते.
                   बापट यांचा जन्म सातारा जिल्ह्यात कराड येथे झाला होता. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले. बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. इ.स. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगातही होते.
           तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा)' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. इ.स. १९४७ ते इ.स. १९८२ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात अध्यापन केले. दरम्यान, इ.स. १९७४ मध्ये ते मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अध्यासनाचे प्राध्यापक झाले. ते दिल्लीच्या साहित्य अकादमीचे सदस्य होते.
      लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्‍न होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट इ.स. १९८३ ते इ.स. १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते.
                     पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा' ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. 'गगन सदन तेजोमय' सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली.
                इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. १९७७ व इ.स. १९९३मध्ये अमेरिकेत आणि इ.स. १९९२ मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत.
                  कविवर्य वसंत बापट यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
( देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य - सुंदर मंगलाची नित्य हो आराधना!
   ही कवी वसंत बापट यांची प्रार्थना ऐकण्यासाठी आपणास यु ट्यूबची लिंक देत आहे, आपण प्रार्थना ऐकावी.)

         संकलक : राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८



बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१

आंतरराष्ट्रीय ओझोन दिन !! (१६ सप्टेंबर )

 


!!आंतरराष्ट्रीय ओझोन दिन !!
                  (१६ सप्टेंबर )



आंतरराष्ट्रीय ओझोन दिन - १६ सप्टेंबर
फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या थराला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण (अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते.
             संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो. १९७८ साली कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.
           खरेतर चंगळवादाने सर्व पृथ्वीला संकटात टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण होय. विकसनशील देशांनी वस्तू वापरण्यापूर्वी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा ही अपेक्षा. तसेच हरितगृह- वायूंच्या प्रमाणावर नियंत्रण आणणारा क्योटो करारही यशस्वी ठरेल अशी आशा आहे. सध्या   हायड्रोफ्लुरोकार्बन चा वापर सुरु झाला आहे. परंतु यावरही २०३० पूर्वी नियंत्रण आणायचे आहे.
         पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी आपण आपल्या स्तरावर जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करुया.
माहिती स्रोत: वनविभाग महाराष्ट्र शासन, वनदर्शिका २०१६.
         संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

मंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१

!! अभियंता दिन !! (१५ सप्टेंबर )

 

           !!   अभियंता दिन   !!
(१५ सप्टेंबर )



आज १५ सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो.
याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
                  जन्म.१५ सप्टेंबर १८६१
                मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची परिस्थिती हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.   आता    त्यांना   तांत्रिक  शिक्षणाची  ओढ लागली.
          गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त   केली    ती    साधीसुधी  नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात.या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले.                                                                      १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली.एखादा अन्य कोणी असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.त्यांची  कीर्ती   ऐकुन  हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशेष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनी   हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले.त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला.
                       म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मा. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले.
संकलक: राजेंद्र पवार
             ९८५०७८११७८

सोमवार, १३ सप्टेंबर, २०२१

!! हिंदी दिवस !! (१४ सितंबर )

 

!! हिंदी दिवस !! (१४ सितंबर )



             भारत के संविधान ने देवनागरी लिपि में लिखित हिंदी को १९५० के अनुच्छेद ३४३ के तहत देश की आधिकारिक भाषा के रूप में १९५० में अपनाया। इसके साथ ही भारत सरकार के स्तर पर अंग्रेजी और हिंदी दोनों भाषाएं औपचारिक रूप से इस्तेमाल हुईं। १९४९ में भारत की संविधान सभा ने देश की आधिकारिक भाषा के रूप में हिंदी को अपनाया। वर्ष १९४९ से प्रत्येक वर्ष १४ सितंबर को हिंदी दिवस मनाया जाता है।
            हिंदी दिवस को उस दिन को याद करने के लिए मनाया जाता है जिस दिन हिंदी हमारे देश की आधिकारिक भाषा बन गई। यह हर साल हिंदी के महत्व पर जोर देने और हर पीढ़ी के बीच इसको बढ़ावा देने के लिए मनाया जाता है जो अंग्रेजी से प्रभावित है। यह युवाओं को अपनी जड़ों के बारे में याद दिलाने का एक तरीका है। इससे कोई फर्क नहीं पड़ता कि हम कहाँ तक पहुंचे हैं और हम क्या करते हैं अगर हम अपनी जड़ों के साथ मैदान में डटे रहे और समन्वयित रहें तो हम अपनी पकड़ मजबूत बना लेंगे।
                 यह दिन हर साल हमें हमारी असली पहचान की याद दिलाता है और देश के लोगों को एकजुट करता है। जहां भी हम जाएँ हमारी भाषा, संस्कृति और मूल्य हमारे साथ बरक़रार रहने चाहिए और ये एक अनुस्मारक के रूप में कार्य करते है। हिंदी दिवस एक ऐसा दिन है जो हमें देशभक्ति भावना के लिए प्रेरित करता है।
         आज के समय में अंग्रेजी की ओर एक झुकाव है जिसे समझा जा सकता है क्योंकि अंग्रेजी का इस्तेमाल दुनिया भर में किया जाता है और यह भी भारत की आधिकारिक भाषाओं में से एक है। यह दिन हमें यह याद दिलाने का एक छोटा सा प्रयास है कि हिंदी हमारी आधिकारिक भाषा है और बहुत अधिक महत्व रखता है।
          जहाँ अंग्रेजी एक विश्वव्यापी भाषा है और इसके महत्व को अनदेखा नहीं किया जा सकता है वहीँ हमें यह नहीं भूलना चाहिए कि हम पहले भारतीय हैं और हमें हमारी राष्ट्रीय भाषा का सम्मान करना चाहिए। आधिकारिक भाषा के रूप में हिंदी को अपनाने से साबित होता है कि सत्ता में रहने वाले लोग अपनी जड़ों को पहचानते हैं और चाहते हैं कि लोगों द्वारा हिंदी को भी महत्व दिया जाए।
          आप सभीको  हिंदी दिनकी शुभ कामना l
       संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८



रविवार, १२ सप्टेंबर, २०२१

!! नारायण महादेव उर्फ मामा परमानंद स्मृतिदिन !! (१३ सप्टेंबर )

 

!! नारायण महादेव उर्फ मामा परमानंद
स्मृतिदिन !! (१३ सप्टेंबर )



     मामा परमानंद जन्म:३जुलै १८३८ मृत्यू:१३ सप्टेंबर १८९३ मामा परमानंद हे
प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक. जन्म कोकणात सावंतवाडी नजिकच्या माणगाव या खेड्यात. संपूर्ण नाव नारायण महादेव परमानंद; तथापि मामा परमानंद ह्याच नावाने ते प्रसिद्ध आहेत. मामांचा जन्म झाल्यावर वडील महादेव दुसऱ्या वर्षीच वारले. आई गंगाबाई हिने तिच्या भावाच्या मदतीने असलेले दुकान चालवून मामांचे प्राथमिक शिक्षण केले. दहाव्या वर्षी मामा मुंबईस बहिणीकडे गेले असताना, त्यांची हुशारी व महत्त्वाकांक्षा पाहून त्यांचे मेहुणे कृष्णशेट तिरवेकर यांनी पुढील शिक्षणार्थ त्यांना मुंबईसच ठेवून घेतले. पूर्वी अत्यंत गरिबीत झालेले अर्धवट मराठी शिक्षण पुरे करून मामा सरकारी सेंट्रल स्कूलमध्ये चार वर्षे शिकले. पुढे कॉलेजातही गेले. मेहनती व जात्याच बुद्धिमान विद्यार्थी असल्यामुळे मामांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवून पहिल्या वर्गातील ‘स्कॉलर’ म्हणून लौकिक संपादन केला.
        मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा देऊन ते बी. ए. परीक्षेसही बसले होते; पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि एल्फिन्स्टन हायस्कूलात शिक्षकाची नोकरी धरावी लागली. तेथे उत्कृष्ट शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक झाला. त्यांच्या हाताखाली नामवंत अनेक विद्यार्थी तयार झाले. उदा., प्रसिद्ध संशोधक काशिनाथपंत तेलंग यांचेच विद्यार्थी. पुढे सिंधमध्ये बदली झाली. तिकडेही त्यांनी उत्तम काम केले; पण हवा न मानवल्यामुळे मुंबईसच यावे लागले. शिक्षकी पेशा सोडून वृत्तपत्र संपादन व लेखन ह्या सार्वजनिक क्षेत्रात त्यांनी  मोठे यश व कीर्ती मिळविली. इंदुप्रकाश, पुढे  नेटिव  ओपिनिअन, इंडियन स्पेक्टॅटर व विशेषतः सुबोध पत्रिका (मुंबई प्रार्थना समाजाचे मुखपत्र) ह्या वृत्तपत्रांची जबाबदारी अंगावर घेऊन ती निर्भीड व निस्पृहपणे पार पाडली.  मामांचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. त्यांचे लेखन सुबोध, चटकदार, मार्मिक व निश्चयात्मक मते मांडणारे होते. दैनंदिन राजकीय घडामोडींवरील त्यांची टीका भारदस्त व न्यायनिष्ठुर असे. तत्कालीन अनेक भ्रष्टाचारी प्रकरणांवर त्यांनी प्रकाशझोत टाकला; यूरोपिअन अंमलदारांचा देखील बेबंदपणा त्यांनी उघडकीस आणला व हाच रोष त्यांना सरकारी नोकरीत नडला.
       संस्थानी कारभार व त्याची सुधारणा ह्यावरही मामांनी अभ्यासपूर्ण लेख लिहिले, कच्छच्या संस्थानिकाने त्यांना नायब दिवाण नेमले. तेथील गुंतागुंतीचा कारभार मामांच्या सरळ, शांत व सभ्य स्वभावाला मानवला नाही आणि राजीनामा देऊन ते मुंबईस परत आले. हिंदी लोकांचे मित्र व हितचिंतक सर विल्यम वेडरबर्न हे मामांची योग्यता व कार्यक्षमता जाणणारे होते. त्यांनी ते मुंबई उच्च न्यायालयात प्रबंधक असताना मामांना उपप्रबंधक म्हणून नेमले. पुढे त्यांनीच मामांना मजूर खात्याचे सेक्रेटरी केले. नंतर मामा महसूल व सामान्य खात्याचे अधीक्षक देखील झाले. पण कामाच्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली व शेवटपर्यंत (१८८३ ते ९३) त्यांना घरीच बिछान्यावर पडून रहावे लागले.
      हिंदी राजकारणाचा त्यांचा सखोल अभ्यास  होता. सयाजीराव गायकवाड, सर विल्यम वेडरबर्न, रानडे, तेलंग, चंदावरकर, मलबारी, मोतीलाल घोष वगैरे ख्यातनाम मंडळी मामांचा सल्ला घेत असत. साधुशील मामा मुंबई प्रार्थनासमाजाचे एक ध्येयनिष्ठ, निष्ठावंत व समर्पित कार्यकर्ते होते. बिछान्यास खिळून असतानाही त्यांनी शेवटपर्यंत सुबोध पत्रिकेसाठी लेखन केले. ते एक कृतिशील धर्म व समाजसुधारक होते. धर्म सुधारल्याशिवाय आपल्या देशाची सर्वांगीण उन्नती होणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते
             बेंजामिन फ्रॅंक्लिनच्या चरित्राचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. न्या. रानडे यांनी मामांना ‘राजकीय ऋषि’ ह्या महनीय पदवीने गौरविले. मामांचा अवघा संसार परमार्थावर आधारलेला होता. त्यांचे घर म्हणजे विद्यार्थ्यांचे आश्रयस्थान, अनेक  थोर पुढाऱ्यांच्या व पाहुण्यांच्या वर्दळीचे ठिकाण व पुनर्विवाहितांचा आश्रम असेच होते. त्यांच्या पत्नी जानकीबाई यांनी सहधर्मचारिणी या नात्याने मामांना अखेरपर्यंत चांगली साथ दिली. मामांचा स्वभाव प्रसिद्धीविन्मुख व सोशिक होता.
       सयाजीराव गायकवाड यांनी मामांची योग्यता व कार्य चांगले जाणले होते. म. जोतीराव फुले यांच्या शेवटच्या आजारात आर्थिक साह्य मिळावे म्हणून बडोदे सरकारला मामांनी लिहिलेली पत्रे फुल्यांच्या चरित्रावर व कार्यावर चांगला प्रकाश टाकणारी ठरली आहेत. सर्व वर्ग व सर्व थरांतील समकालीन मोठमोठ्या कर्त्या पुढाऱ्यांचे ते सल्लागार होते. मुंबईस त्यांच्या राहत्या घरी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी त्यांचे मित्र व सहकारी डॉ. रामकृष्ण भांडारकर, शांताराम विठ्ठल, तुकाराम तात्या, नारायण चंदावरकर, भास्कर हरि भागवत, श्रीधरपंत भांडारकर वगैरे जीवाभावाची मंडळी सभोवती जमली असताना मामांचे प्राणोत्क्रमण झाले.
            अशा सेवाभावी मामा परमानंद यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
       संकलक : राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

शनिवार, ११ सप्टेंबर, २०२१

!! महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल.भावे स्मृतिदिन !! (१२ सप्टेंबर )

 

!! महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल.भावे
   स्मृतिदिन !! (१२ सप्टेंबर )



विनायक लक्ष्मण भावे जन्म :  ६ नोव्हेंबर १८७१ मृत्यू : १२ सप्टेंबर १९२६ हे मराठी लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
             विनायक लक्ष्मण भावे यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या जनार्दन बाळाजी मोडक या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली.
        इ.स. १८८७ मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या विनायकला त्यांच्या वकील असलेल्या वडिलांनी इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही. इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेल्या या मुलाने वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी १ जून १८९३ रोजी ठाणे शहरातल्या या ग्रंथालयाची निर्मिती केली. १८९५ मध्ये भावे मुंबईतून बी.एस्‌.सी. झाले, नंतर त्यांनी अनेक वर्षे मिठागरे चालवण्याचा व्यवसाय केला.
              इ.स. १८९८ पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधीचा ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.
                वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७ साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बाळबोध लिपीत प्रकाशित केल्या. महाराष्ट्र सारस्वताच्या दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संशोधन संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले. अज्ञानदासाच्या अफजलखानाच्या पोवाड्यातील ऐतिहासिक प्रसंगावर एक ५३ पानी निबंध लिहून प्रकाशित केला. त्यांनी ‘विद्यमान’ नावाचे मासिकही काढले होते.
           महाराष्ट्र सारस्वत हा वि.ल.भावे यांचा ग्रंथ इतका गाजला की ते महाराष्ट्र सारस्वतकार म्हणून ओळखले जातात. नेपोलियनचे चरित्रही त्यांनी प्रथमच मराठीत आणले. ठाण्याच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात त्यांचा १२ सप्टेंबर हा स्मृतिदिन आजही पाळला जातो.
              सारस्वतकार वि.ल.भावे यांना स्मृतिदिनानिमित्ताने विनम्र अभिवादन.
    संकलक : राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

आचार्य विनोबा भावे जन्मदिन !! (११ सप्टेंबर )

 

!! आचार्य विनोबा भावे जन्मदिन !!
    (११ सप्टेंबर )



             विनायक नरहरी भावे( आचार्य विनोबा भावे) जन्म: ११ सप्टेंबर १८९५ मृत्यू: १५ नोव्हेंबर  १९८२ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले.
        आचार्य विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागोदे गावी झाला होता.त्यांचे मुळ गाव वाई होते.त्यांचे वडील नोकरीच्या निमित्ताने बडोदे येथे गेले. विनोबांचे माध्यमिक आणि उच्च शिक्षण बडोदे येथेच झाले. १९१६ साली महाविद्यालयीन इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस जाण्यास निघाले; परंतु वाटेतच सुरतेस उतरले. गांधीजींचे भाषण ऐकले. त्या भाषणाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला. त्यांनी गांधीजींशी पत्रव्यवहार केला. नंतर ७ जून १९१६ रोजी गांधीजींची भेट घेतली.  तेथेच ब्रह्मचर्याची प्रतिज्ञा करून जीवनसाधना सुरू केली. ऑक्टोबर १९१६ रोजी महात्मा गांधींजींच्याकडून एक वर्षांची रजा घेऊन ते वाई येथे प्राज्ञपाठशाळेत वेदान्ताच्या अध्ययनाकरिता उपस्थित झाले. ब्रह्यविद्येची साधना  हा त्यांचा जीवनोद्देश होता. दहा महिन्याच्या कालावधीतच वेदांताचे शिक्षण पूर्ण केले.
             विनोबा फेब्रुवारी १९१८ मध्ये अहमदाबादला गेले. यावर्षी देशभर इन्फ्लुएन्झाची साथ पसरली होती. या साथीत आई ,वडील व धाकटा भाऊ  दत्तात्रय आजारी पडले. लक्षावधी लोक या साथीत बळी पडले.आई व भाऊ या दोघांचेही निधन झाले. ज्येष्ठ पुत्र असल्याने आईवर विनोबांनी विधी करणे अपेक्षित होते. परंतु आईवर पुरोहिताकडून  अंत्यविधीचा कोणतीही संस्कार  करण्यास विनोबा तयार नव्हते त्यामुळे ते स्मशानभूमीत गेलेच नाहीत.सर्व विधी वडिलांनीच पूर्ण केला.
             सन १९२१ साली जमानालाल बजाज यांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्धा येथे सुरु केली. त्या शाखेचे संचालक म्हणून महात्मा गांधीनी विनोबांची रवानगी वर्ध्याला केली. ८ एप्रिल १९२१ ला विनोबा वर्ध्याला पोहोचले.१९५१ ते १९७३ चा भूदान चळवळीचा काळ वगळता विनोबांनी संपूर्ण आयुष्य वर्धा येथेच तपचर्या करत घालवले.
           दिवसातले सात-आठ तास सूत कातणे, विणणे आणि शेतकाम यांमध्ये त्यांनी घालविले. रोज नेमाने शरीरश्रम प्रत्येक माणसाने करावे, असा त्यांचा सिद्धान्त होता. 'शरीरश्रमनिष्ठा' हे त्यांच्या जीवन-तत्त्वज्ञानाप्रमाणे महत्त्वाचे व्रत होते. शरीरश्रमांबरोबरच त्यांनी मानसिक, आधात्मिक साधनाही प्रखरतेने केली. १९३० व ३२ च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी कारागृहवास भोगला. १९४० साली महात्मा गांधीनी स्वराज्याकरिता वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन आरंभले. त्यात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. जवाहरलाल नेहरू हे दुसरे निवडले. आध्यात्मिक साधनेला वाहून घेतलला शत्रुमित्रसमभावी तपस्वी मनुष्य सत्याग्रहाला अत्यंत आवश्यक, म्हणून त्यांनी विनोबांची निवड केली. कारण सत्याग्रह हे शत्रूच्या हृदयपरिवर्तनाचे नैतिक शुद्ध साधन होत, अशी महात्मा गांधीची मूलभूत राजकीय भूमिका होती. उच्चतम आध्यात्मिक जीवनसाधनेस वाहिलेला शत्रुमित्रभाव विसरलेला माणूसच असे हृदय-परिवर्तन करू शकतो, अशी गांधींची धारणा होती. २० ऑक्टोबर १९४० रोजी स्वसंपादित हरिजन साप्ताहिकात गांधींनी आपल्या या शिष्याची ओळख करून दिली आहे.
                    १९३२ सालच्या सविनय कायदेभंगाच्या सामुदायिक आंदोलनात विनोबांनी भाग घेतला. त्यांनी धुळे कारागृहामध्ये शिक्षा भोगली. सुप्रसिद्ध गीताप्रवचने या कारागृहात त्यांनी दिली. शंभरापेक्षा अधिक सत्याग्रही कैदी आणि इतर गुन्ह्यांसाठी शिक्षा झालेले कैदी या प्रवचनांच्या रविवारच्या सभेत उपस्थित असत. त्यांमध्ये शेठ जमनालाल बजाज, गुलजारीलाल नंदा, अण्णासाहेब दास्ताने, साने गुरूजी इ. मंडळी उपस्थित असत.
             वैयक्तिक सत्याग्रहानंतर ७ मार्च १९५१ पर्यंत पवनार येथील  आश्रमातच विनोबांनी शारीरिक आणि मानसिक तपश्चर्येत जीवन व्यतीत केले. १९३६ पासून म. गांधी साबरमतीचा आश्रम सोडून सेवाग्रामला म्हणजे पवनारजवळच येऊन राहिले. त्यामुळे गांधी आणि विनोबा यांचा चिरकाल संवाद चालू राहिला. गांधीच्या देहान्तानंतर सर्वसेवासंघ व सर्वोदय समाज या संस्थांची स्थापना झाली. मार्च १९४८ मध्ये विनोबा दिल्ली येथे जवाहरलाल नेहरू यांच्या विनंतीवरून गेले. भारत-पाक फाळणी झाल्यानंतर परागंदा झालेले लक्षावधी शरणार्थी (सर्व बाजूंनी जीवन उद्‍ध्वस्त झालेले) दिल्ली, पंजाब, राजस्थान यांमध्ये आले. त्यांना धीर देण्याकरता विनोबांना पंडितजींनी बोलावून घेतले. या दौऱ्यात सर्वधर्मसमभावाचा आदेश देऊन प्रेम आणि सद्‍भावना निर्माण करण्याचा प्रयत्‍न विनोबांनी केला.
         दिनांक १५ नोव्हेंबर १९८२ रोजी सकाळी ९.४० वाजता पवनार येथे  आश्रमात सतत सात दिवस प्रायोपवेशन करून भूदाननेते आचार्य विनोबा भावे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणत्याग केला. अशा या महामानवास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

         संकलक : राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८



गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

गणेश चतुर्थी !! (१०सप्टेंबर )

 


!! गणेश चतुर्थी !! (१०सप्टेंबर )



हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव
गणेश प्रतिष्ठापना: गणेश चतुर्थीला गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा केली जाते. श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना विधीमध्ये पार्थिव मूर्तीचे आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुले, पत्री, नैवेद्य इत्यादी उपचारांनी पूजा केली जाते. यामध्ये त्याला  २१ पत्री(दुर्वा) अर्पण केल्या जातात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी तिची उत्तरपूजा करतात. मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी पुढील मंत्र म्हणतात. ’यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय पार्थिवीम् ।इष्टकामप्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च’ ।। श्री महागणपतिपूजन केलेल्या नारळावर, तसेच उमामहेश्‍वर आणि श्री सिद्धिविनायक यांच्यावर अक्षता वाहून मूर्ती स्थानापासून थोडी हलवतात. त्यानंतर जलाशयात तिचे विसर्जन करतात. काळाच्या ओघात हे व्रत कुटुंबाच्या पद्धतीनुसार दीड, पाच, सात, दहा दिवस केले जाते.
       भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत महाराष्ट्रात गणेशोत्सव साजरा होत असतो. सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी १८९४ साली केली. या काळात गणेशाच्या उपस्थितीत अनेक धार्मिक व सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम केले जात होते.
! सार्वजनिक गणेशोत्सव !
         लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीयांना एकत्र आणण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी या उत्सवाची सुरूवात केली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असं इतिहासकार बिपीन चंद्रा यांचं मत आहे.
       कोरोनामुळे  गतवर्षीप्रमाणे यावर्षीचाही  गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे नेहमीसारखा झगमगाट यावर्षी दिसणार नाही. आपणही प्रशासनाच्या सर्व सूचना विचारात घेऊन साधेपणाने गणेशोत्सव साजरा करूया. कोरोना महामारी रोखण्यासाठी सज्ज होऊया. गणपती बाप्पा मोरया!
      गणेश चतुर्थीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
       संकलक -- राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

!! हुतात्मा शिरीषकुमार मेहता स्मृतिदिन !! (९सप्टेंबर )

 


!! हुतात्मा शिरीषकुमार मेहता
      स्मृतिदिन !!    (९सप्टेंबर ) 

 



शिरीषकुमार मेहता  जन्म:२८ डिसेंबर १९२६ मृत्यू:९ सप्टेंबर १९४२ 
         नंदुरबार शहरात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात  शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले.
             महात्मा गांधीनी ब्रिटिशांना  ९ ऑगस्ट १९४२ ला "चले जाव "चा इशारा दिला होता.  देशातील  सर्व गावे, शहराप्रमाणे  नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्‌' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.
          स्वातंत्र्य आंदोलनामुळे  गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्‌'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलांच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, "गोळी मारायची तर मला मारा . ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
         स्वातंत्र्यआंदोलनात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. या शहिदांचे आपण कायम स्मरण करायला हवे. आता  देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न नाही.  देशापुढे  दारिद्रय, आरोग्य, शिक्षण यासारखे महत्वाच्या समस्या आ वासून उभ्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजेत. माझ्यासह  देशातील प्रत्येकाने  आपला देश जगात महान व्हावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करुया.
           शिरीषकुमार यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक : राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

!! आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन !! (८ सप्टेंबर )

 


!! आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन !!

 (८ सप्टेंबर )



 ७ नोव्हेंबर १९६५ रोजी युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization )ने  ८ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस घोषित केला आणि पुढच्याच वर्षांपासून ८ सप्टेंबर १९६६ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. व्यक्ती, समुदाय आणि समाजांपर्यंत साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करणे हे साक्षरता दिवसाचे मुख्य उद्दीष्ट आहे . 

      जगभराचा विचार करता पाचपैकी एक व्यक्ती आजही निरक्षर आहे. निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण दोन तृतीयांश एवढे आहे. कित्येक दशलक्ष मुले शाळाबाह्य आहेत. बरीच मुले शाळेत नियमित उपस्थिती दाखवत नाहीत आणि त्याचा परिणाम शाळा सोडण्यावर होतो.

                  युनेस्कोच्या “सर्वांसाठी शिक्षण " Eduction to all वरील जागतिक मॉनिटरींग रिपोर्टनुसार  दक्षिण आशियात सर्वात कमी  साक्षरता दर ६.५८% असून त्याखालील सब-सहारान आफ्रिका येथे साक्षरतेचा दर ७.७% एवढा आहे.  नायजर, माली येथे सर्वात कमी साक्षरतेचा दर आहे. निरक्षरता आणि तीव्र दारिद्र्य  यांचा सहसंबंध आहे. अनेक देशात स्त्रियांबद्दल पूर्वग्रह असल्याचे अहवालात नमूद केले आहे त्याचा परिणाम स्त्रियांचे शिक्षण नाकारण्यावर झाला आहे.

          आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे सर्वांसाठी शिक्षण हेच मुख्य ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी युनेस्को दरवर्षी वेगवेगळ्या थीम राबवत असते.उदा. “साक्षरता आणि आरोग्य,साक्षरता आणि सक्षमीकरण,साक्षरता आणि शांती" इत्यादी. 

             गरिबीचे उच्चाटन, बालमृत्यू, लोकसंख्या वाढ, स्त्रीपुरुष समानता, शांती आणि प्रजासत्ताक धोरण या समाज उन्नतीशी निगडीत बाबींच्या मुळाशी शिक्षण आहे व त्याचा प्रसार झाला तर अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात.

              आपल्या देशापुरता विचार करावयाचा झाला तर सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना व्यवस्थित राबवली जात आहे. कोणतेही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत."सारे शिकूया, पुढे जाऊया" या वचनानुसार आपली वाटचाल चालू आहे.

      शिक्षण प्रक्रियेत सहभाग वाढवण्यासाठी शासन स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना

१)मोफत पाठ्यपुस्तके

      (१ ते ८ वर्गासाठी)

२)मोफत गणवेश

३)शालेय पोषण आहार

४)मोफत आरोग्य सुविधा

 इतकेच नव्हे तर दिव्यांग विद्यार्थी पाठीमागे राहू नयेत यासाठी प्रोत्साहन भत्ता, मदतनीस भत्ता, उपयुक्त साधन सुविधांचा पुरवठा ही शासन करत

 आहे.शिक्षण प्रक्रियेत पालकांचा सहभागही महत्वाचा,शालेय इमारत,भौतिक सोयीसुविधांची उपलब्धता शासन स्तरावरुन केली जात आहे. थोडक्यात काय तर एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासनाबरोबर आपण सर्वांनीच सतर्क राहायला हवे. यापुढे एकही व्यक्ती निरक्षर राहणार नाही याची काळजी आपण सर्वजणच साक्षरतादिनाच्या निमित्ताने घेऊया.

       संकलक : राजेंद्र पवार

          ९८५०७८११७८

 



सोमवार, ६ सप्टेंबर, २०२१

!! क्रांतिकारक उमाजी नाईक जन्मदिन !! (७ सप्टेंबर )

 


!! क्रांतिकारक उमाजी नाईक जन्मदिन !!
     (७ सप्टेंबर )



    उमाजी नाईक जन्मदिन:७ सप्टेंबर १७९१ मृत्यू:३ फेब्रुवारी १८३२
     उमाजी नाईक हे महाराष्ट्रातील क्रांतिकारक  व स्वातंत्र्यसेनानी होते.  त्यांनी १८२६ ते १८३२ च्या सुमारास भारतात ब्रिटीश राजवटीला आव्हान दिले होते.
               उमाजी नाईक (रामोशी)यांनी
मराठा साम्राज्याचा नाश झाल्यानंतर  इंग्रजांच्या विरोधात एक लहानसे सैन्य उभे केले. त्यांच्या ब्रिटीशविरोधी जाहीरनाम्यात देशातील माणसांना परकीय राज्यकर्त्यांविरूद्ध संघर्ष करण्यास सांगितले. त्यांना पकडण्यासाठी ब्रिटीश सरकारने १०,००० रुपयांची बक्षीस जाहीर केले. उमाजीला १५ डिसेंबर १८३१ रोजी उतरवली येथे पकडले आणि ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. ब्रिटिशांनी त्याला अटक केली, चौकशी केली आणि नंतर त्याला दोषी धरले आणि ३ फेब्रुवारी १८३२ रोजी  फाशी देण्यात आले.
             मराठयांनी रामोशी समाजाला रात्रीची गस्त घालण्याचे काम दिले होते. या कामामुळे विशिष्ट गावातून कर घेण्याचा अधिकार होता. इंग्रजांनी मराठयांचा पराभव केल्यानंतर कर वसुलीच्या अधिकाराचे उल्लंघन झाले त्यामुळे रामोश्यांनी ब्रिटिशांविरुध्द संघर्ष सुरु केला. उमाजी नाईक यांनी स्वतःला राजा म्हणून घोषित केले होते. ब्रिटिश पायदळ,घोडदळ यांना ठार मारण्याची व त्यांची संपत्ती लुटण्याची आज्ञा  रामोशी समाजाला त्यांनी केली होती.
           उमाजींनी जेजुरीच्या पोलिस स्टेशनवर  हल्ला केला आणि तिथे पोलिसांचा खून केला. जे ब्रिटीश आणि ब्रिटिश राज्याशी निष्ठावान होते त्यांना रामोशी लोक शिक्षा देत असत. उमाजी ब्रिटीश सरकार आणि शेतकऱ्यांचे शोषण करणारे सावकार यांचे पैसे लुटून गरीब लोकांना देत असत. त्यांच्या चांगल्या कामामुळे उमाजींना गरीबांबद्दल प्रेम होते. यामुळे ब्रिटीश सरकारला सुरुवातीला पकडता आले नाही.त्यांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकारने अधिकाऱ्याची नियुक्ती केली. इंग्रजांनी  फोडा आणि झोडा धोरण उमाजी नाईक यांना पकडण्यासाठी राबवले.समाजातील लोक आमिषाला बळी पडले इतकेच नव्हे तर घरचेच भेदी झाले.
           सामान्य जनतेत दहशत निर्माण होण्यासाठी उमाजी नाईक यांचा मृतदेह तीन दिवस लटकत ठेवण्यात आला होता. ब्रिटिश सत्तेविरुद्ध पहिला क्रांतिकारी लढा उभारण्याचे श्रेय उमाजी नाईक यांच्याकडेच जाते. उमाजी नाईक यांच्यामुळे स्वातंत्र्यआंदोलनाला बळच मिळाले. इंग्रजी सत्तेविरुद्ध असंतोष निर्माण करण्याचे श्रेयही त्यांनाच द्यावे लागेल.
              उमाजी नाईक यांचे गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी हे असुन दरवर्षी  खासकरून रामोशी समाजातील लोक क्रांतीची ज्योत प्रज्वलित करुन आणतात व त्यांची जयंती साजरी करतात. आपण सर्वजणच
  त्यांच्या क्रांतिकारी विचारांचे पाईक होऊया.
           उमाजी नाईक यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८





रविवार, ५ सप्टेंबर, २०२१

! यश जोहर जन्मदिन !! (६ सप्टेंबर )

 


     !! यश जोहर जन्मदिन !! (६ सप्टेंबर )



यश जोहर  जन्म:६ सप्टेंबर १९२९ मृत्यू: २६ जून २००४
          हे एक भारतीय बॉलिवूड चित्रपट निर्माता होते. त्यांनी  १९७६   मध्ये धर्मा प्रॉडक्शनची स्थापना केली आणि हिंदी चित्रपट बनवले ज्यावर भव्य सेट्स आणि विदेशी स्थाने दर्शविली गेली परंतु भारतीय परंपरा आणि कौटुंबिक मूल्ये मात्र टिकवून ठेवली.
          यश आणि हिरो यशस्वी भारतीय चित्रपट दिग्दर्शक करण जोहरचे पालक आहेत . यश जोहर यांचे २६ जून २००४ रोजी मुंबईत वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झाले होते.त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा करणने धर्मा प्रॉडक्शनची सर्व जबाबदारी स्वीकारली.
         जोहरने १९६२ मध्ये बॉलीवूडमध्ये सुनील दत्तच्या प्रॉडक्शन हाऊस अजिंठा आर्ट्समधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती . ते" मुझे जीने दो , ये रास्ते है प्यार के'  दोस्ताना "या चित्रपटांशी संबंधित होते . बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानी खूपच पैसा मिळवला. यश जोहर यांनी" ज्वेल चोर , प्रेम पुजारी आणि हरे रामा हरे कृष्णा "यासारख्या चित्रपटांची निर्मिती केली .
       अग्निपथ , गुमराह आणि डुप्लिकेट यासारखे मराठी चित्रपटही त्यांनी बनवले.        
त्यांचा मुलगा करण जोहरच्या दिग्दर्शनात पदार्पण झालेल्या १९९८ च्या पुरस्कारप्राप्त फिल्म 'कुछ कुछ होता है' या कंपनीने या कंपनीला अभूतपूर्व यश मिळवून दिले . शाहरुख खान , काजोल आणि राणी मुखर्जी अभिनीत हा चित्रपट एक आलटाइम ब्लॉकबस्टर होता आणि विशेष म्हणजे परदेशी बाजारामध्ये वर्षातील सर्वाधिक हिट चित्रपट होता. ४४ व्या वार्षिक फिल्मफेअर पुरस्कार, लक्स झी सिने पुरस्कार, सन्सुई व्ह्यूअर चॉईस अवॉर्ड्स, बॉलिवूड मूव्ही अ‍ॅवॉर्ड्स आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार यासह सर्व श्रेणीतील प्रमुख पुरस्कारांसह या चित्रपटाची समीक्षक म्हणून प्रशंसा केली गेली.
              यश जोहर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.
     संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...