!! भारताचे १३ वे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह जन्मदिन !!(२६ सप्टेंबर )
मनमोहन सिंह जन्म:२६ सप्टेंबर १९३२ हे भारताचे १३ वे पंतप्रधान होते. त्यांचा कार्यकाळ २२ मे २००४ ते २६ मे २०१४ असा होता. पी. व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात (१९९१ ते १९९६) ते अर्थमंत्री होते. त्यावेळी ते लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य नव्हते. नंतर त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून आसाममधुन घेण्यात आले.अर्थमंत्री असताना त्यांनी अनेक आर्थिक सुधारणा घडवून आणल्या.आयात निर्यात धोरणात आमूलाग्र बदल घडवून आणला. उदारीकरणाचा स्वीकार करुन देशाची आर्थिक स्थिती मजबूत केली.
राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात भारतीय नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना नियुक्त केले होते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ते १५ वे गव्हर्नर होते. भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांनी काही काळ दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिकक्समध्ये प्राध्यापक म्हणून काम केले.
डॉ. मनमोहन सिंह यांना मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान.....
१) पद्मविभूषण
२)सर्वोत्कृष्ट खासदार २००२
३)इंडियन सायन्स काँग्रेस,जवाहरलाल नेहरु पुरस्कार
३) केम्ब्रिज विद्यापीठाचा अॅडम
स्मिथ पुरस्कार
डॉ.मनमोहन सिंह यांना जन्मदिवसाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा