sachin लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
sachin लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २३ एप्रिल, २०२२

!! भारतरत्न सचिन तेंडुलकर जन्मदिन !!(२४ एप्रिल)

 !! भारतरत्न सचिन तेंडुलकर जन्मदिन !!(२४ एप्रिल)

                 सचिन रमेश तेंडुलकर (क्रिकेटचा देव ) जन्म:२४एप्रिल  १९७३:मुंबई हा क्रिकेटविश्वात डॉन ब्रॅडमन याच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. सन २००२ मध्ये आपल्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षीच, विस्डेनने डॉन ब्रॅडमन याच्यानंतर  दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील व्हिव रिचर्ड्स याच्यानंतरचा दुसरा  सर्वोत्तम फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड केली होती. २०११ च्या विश्वचषक विजेत्या भारतीय संघात तेंडुलकरचा समावेश होता. २००३ मधील क्रिकेट विश्वचषकात तो मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडला गेला होता. 



           आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक करणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकिर्दीतील ३०,००० आंतरराष्ट्रीय धावांचा टप्पा पार केला. सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचा देव मानले जाते. पद्मविभूषण आणि राजीव गांधी खेलरत्‍न या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे. सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला . हा सन्मान त्यांना त्याच्या क्रिकेटमधील निवृत्तीच्या दिवशी जाहीर झाला. भारतीय विमान दलाने त्याला ग्रुप कॅप्टन हा गौरवात्मक हुद्दा प्रदान केलेला आहे. असा मान मिळालेले ते पहिले खेळाडू आणि विमानोड्डाणाची पार्श्वभूमी नसलेले पहिले व्यक्ती आहेत. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सने आणि म्हैसूर विद्यापीठाने सचिन यांना मानद डॉक्टरेट पदव्या प्रदान केलेल्या आहेत. ६ नोव्हेंबर २०१२ रोजी सचिनला मुंबईत मेंबर ऑफ दी ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा गौरव प्रदान करण्यात आला.

                 सचिन तेंडुलकर यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.

    संकलक : राजेंद्र पवार

          ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...