!! अक्षय तृतीया !! (३ मे )
हिंदू सणांपैकी अत्यंत महत्वाचा असलेला अक्षयतृतीया हा सण आहे. साडेतीन मुहर्तापैकी एक मुहूर्त असलेला हा सण यावर्षी मंगळवार,३मेला साजरा होत आहे. यादिवशी ग्रहांचा दुर्मिळ योग आल्याने अक्षयतृतीयेचे महत्व अधिकच वाढले आहे. या दिवशी सोने,चांदी खरेदी करणं शुभ असते असे मानले जाते.अक्षय तृतीया वर्षाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त. यादिवशी कोणत्याही मुहूर्ताशिवाय शुभ कार्य पार पाडले जाते. म्हणजे अख्खा दिवस शुभमुहूर्त आहे. जसं की, लग्न, गृहप्रवेश, वास्तूशांती, मुंज इत्यादी. या दिवशी सोने, चांदी, नव्या वस्तूची खरेदी करणं अत्यंत शुभ आहे.
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी पंच महायोग निर्माण होतोय. यादिवशी सूर्य मेष राशित, चंद्रमा कर्क राशित, शुक्र आणि गुरू मीन राशित आणि शनि स्वराशि कुंभ राशित असतील. अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रहांच्या स्थिती व्यतिरिक्त केदार, शुभ कर्तरी, उभयचरी, विमल आणि सुमुख नावाचे पाच राजयोग देखील आहेत. शोभन आणि मातंग योग ही यादिवशी खास आहे. ज्योतिषाशास्त्रानुसार असा दुर्मिळ योग येत्या १०० वर्षात येणार नाही.
शुभ योगांचा परिणाम असा असेल....
ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार या दुर्मिळ संयोगाचा प्रभाव खूप शुभ असणार आहे. यादिवशी सोने चांदिच्या वस्तू खरेदी केल्याने तुमच्या आयुष्यात सुख – समृद्धी वाढेल. जर तुम्ही महागड्या वस्तू किंवा सोन्या चांदिचे दागिने खरेदी करू शकत नसाल तर धातूने बनवलेली कोणतीही वस्तू तुम्ही घरी आणू शकता. यादिवशी खरेदी केलेल्या वस्तूचे तुमच्या आयुष्यावर दिर्घकाळापर्यंत शुभ परिणाम होणार आहेत.
एकंदरीत अक्षय तृतीया पवित्र सण आहे. या सणाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.
संकलक: राजेंद्र पवार
९८५०७८११७८