!! सातारा मास मॅरेथॉन !!(२ ऑक्टोबर )
आज २ ऑक्टोबर, गांधी जयंती, जागतिक अहिंसा दिन या दिवसाचे औचित्य साधून मॅनुफॅक्चर्स असोसिएशन सातारा (मास) यांनी प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे घोषवाक्य "रन फॉर हेल्थ " असे होते. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये फिटनेस जागरुकता निर्माण होऊन सशक्तीकरण व्हावे, जागतिक तापमानवाढ रोखणे व पर्यावरण संरक्षण याबाबत जागृती करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक "टॉप गिअर ट्रान्सन्मिशन" असून जोशी जम्पाला प्रा. लिमिटेड,उत्कर्ष फ्लेक्सिबल कपलिंग हे सह प्रायोजक होते.या स्पर्धेचा शुभारंभ एम.आय.डी.सी.चे अधिक्षक अभियंता राजेंद्र गावडे यांचे शुभहस्ते झाला.
या स्पर्धा ११ कि. मी.व ५ कि. मी. अशा होत्या. मी ११ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा ५६:४५ (छपन्न मिनिटे आणि पंचेचाळीस सेकंदात ) पूर्ण केली. आज माझा पंचावन्न वर्षांपुढील गटात प्रथम क्रमांक आला. टॉप गिअरचे कार्यकारी संचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या शुभहस्ते ट्रॉफी, रोख बक्षीस, मेडल देऊन गौरविण्यात आले. माझ्याबरोबर आमचे चिरंजीव डॉ. श्रीधर, भाचे श्रीकांत घोरपडे हेही सहभागी झाले होते.
आपल्या गावातील २५ मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्वांचेच प्रायोजकत्व श्रीकांत पवार यांनी स्वीकारले होते. या स्पर्धकाशिवाय टॉप गिअर परिवारातील शंभरपेक्षा अधिक जणांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा संयोजनात मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते आणि मास स्पोर्ट कमिटीचे चेअरमन श्रीकांत तोडकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
आपण सर्वजणच फिटनेसबाबत जागरुक राहूया त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ रोखणे, पर्यावरण संरक्षण मोहिमेत सहभागी होऊया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८