Vad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Vad लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ मे, २०२२

!! वाढदिवस वडाचा !! (१९ मे )

 !! वाढदिवस वडाचा !! (१९  मे )




          आपण आपल्या लाडक्या व्यक्तीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करतो. सध्या तर फ्लेक्सबाजी खूपच बोकाळलीआहे. अनेक नसलेली विशेषणे आपण लावत असतो. खरं पाहिलं तर समाजमाध्यमाचा वापर समाज प्रबोधनासाठी व्हायला हवा पण तसे होताना दिसत नाही. ज्यांचा समाजाच्या हितासाठी वापर होतो त्याला आपण अधिक महत्व द्यायला हवे. झाडांचेच उदाहरण घ्या. माणसाच्या जन्मापासून अंतापर्यंत वृक्ष आपले सोबती आहेत. बाळ जन्माला आल्याबरोबर पाळणा आपल्याला साथ देत असतो तर मृत्यूसमयी सरपणच मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरले जाते. जन्मापासून मरणापर्यंत आपण झाडाशिवाय जगूच शकत नाही. खरं तर झाडे आपला श्वास आहेत. श्वास संपलाकी शेवट ठरलेला. मग जे झाड आपल्याला सर्वाधिक ऑक्सिजन देते त्याकडे आपण किती गांभीर्याने पहायला हवे. खरं तर झाडे कार्बनडाय ऑक्साईड शोषून घेतात व ऑक्सिजन देतात. कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचे महत्व आपणास पटले आहे. यासाठी निसर्गाकडे आपण आदराने पहायला हवे. निसर्ग आपली काळजी घेतो मात्र आपणच त्याला ओरबाडत असतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे ती अशी, "Nature provide our need not greed " आपण निसर्गाची काळजी घ्यायला हवी. पर्यावरण संतुलनासाठी झाडांची भूमिका खूप महत्त्वाची आहे.  झाडापासून आपणास अन्न, वस्त्र, फळे, फुले, पाने मिळतात. अशा झाडांची आपण किती काळजी घ्यायला हवी हे प्रत्येकाने ध्यानात घेतले पाहिजे.

          वड  तर सर्वाधिक ऑक्सिजन देणारे झाड आहे. अशाच  या वडाचा वाढदिवस आपण दरवर्षी १९ मे ला साजरा करत असतो. हा वड अंगापूर गावच्या हद्दीत दत्त टेकडीपासून अगदीच हाकेच्या अंतरावर टेकडीवर डोलताना दिसत आहे.




       कोविडने जगभरात थैमान घातले त्यामधून कोणाचीच सुटका झाली नाही. याच काळात  दत्तटेकडीवर वडाचा जन्म झाला. हो जन्मच झाला. हा वड निसर्गप्रेमी अशोकराव कणसे यांचे अपत्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण आपल्या बाळाला कडेवर, खांद्यावर खेळवतो, बापूंनी या वडाला चक्क डोक्यावर घेतले आणि टेकडीवर आणले त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. १९ मे २०२० ला या वडाचे रोपण करण्यात आले.गतवर्षी या वडाचा वाढदिवस मोठ्या इतमामाने करण्यात आला. या वडाकडे बापूंच्या प्रमाणे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष आहे.  या वडामुळे अभयवन सामाजिक संस्था उदयास आली. मला वाटते वर्णे, अंगापूर, धोंडेवाडी, फत्यापूर, खोजेवाडीचा डोंगर परिसर हिरवागार करण्याचे नेतृत्व हा वडच करत आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, वर्णे -आबापुरी तसेच ग्रामस्थांनी  मोठे सहकार्य केले आहे.

"वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे,

पक्षीही सुस्वरे आळविती"!

     आपण वृक्षांना आपले नातेवाईक मानले पाहिजे, पक्ष्यांना आश्रयस्थान उपलब्ध करुन द्यायला हवे. दत्त टेकडीवरचा वड भविष्यात सिद्ध वटवृक्ष व्हावा असे वाटते. सिध्द वटवृक्ष म्हणजे ज्याच्या १०८ पेक्षा अधिक पारंब्या जमिनीकडे येतात व पुन्हा मुळे धारण करतात , जणू काही त्याचे खोडात रुपांतर करतात. देशात असे अनेक महाकाय वृक्ष आहेत. अशा वटवृक्षाखाली अनेक साधू महंत तपाला बसतात तसाच हा सिद्ध वटवृक्ष व्हावा असे वाटते. हा वड अभयवनाचे नेतृत्व करत आहे. भविष्यात या वडाची नोंद शासन दरबारी व्हावी असे वाटते.

   या वडाला इतिहासात नोंद होण्यासाठी, तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष लक्ष शुभेच्छा.

  राजेंद्र पवार

 ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...