!! आंतरराष्ट्रीय वृध्द दिवस !!
(१ ऑक्टोबर )
वृद्धांना होणाऱ्या त्रासाविषयी जागरूकता निर्माण करणे. त्यांच्यामध्ये सुसंवाद वाढविणे .त्यांनी समाजाप्रती दिलेल्या योगदानाचे कौतुक करणे यासाठी १ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय वृध्द दिवस( आजी- आजोबा दिवस ) म्हणून साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय वृध्द दिवस (आजी आजोबा दिवस कसा साजरा करावा.
१) आजी आजोबांसमवेत वेळ घालवावा. २)वृद्धाश्रम आणि स्वयंसेवी संस्थांना भेट द्यावी.
३)त्यांच्यासाठी वाढदिवस साजरा करुन
केक कापावा.
४) वृध्दाना भेट कार्ड द्यावीत.
आजी आजोबा संस्कारपीठ आहे. खासकरून नातवंडांना चांगली दिशा देण्याचे काम ते करत असतात. आदर्श समाजनिर्मितीसाठी आजी आजोबा यांची गरज आहे.भारतीय कुटुंबसंस्था जगात आदर्श मानली जाते. आजही तीन तीन पिढया सुखाने एकत्र नांदताना दिसतात.
एखाद्या घरात दोघेच राहणार असतील, त्यांच्यात काही विसंवाद झाल्यास त्यांना कोण मार्गदर्शन करणार. विस्कटलेली घडी व्यवस्थित करण्याचे काम घरातील वृध्दच करीत असतात. चला आपण आपल्या आजी आजोबांची काळजी घेऊया. हा दिवस आनंदात साजरा करुया.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा