!! टाटा स्टील कोलकत्ता मॅरेथॉन !! (१८ डिसेंबर )
आज कोलकत्ता येथे टाटा स्टील मरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा प्रामुख्याने १० कि. व २५ कि. मी.अशा आयोजित करण्यात आल्या होत्या. मी आज २५ कि. मी. च्या प्रकारात भाग घेतला होता. माझ्याबरोबर सातारा येथून माझे मार्गदर्शक निलेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप जाधव व सदानंद दिक्षित यांनी भाग घेतला होता.
धावण्याच्या निमित्ताने पश्चिम बंगालला येता आले. दुरुनच येथील विधानभवन पाहता आले. मेट्रोने प्रवास करता आला. येथील मेट्रो पूर्णपणे भुयारी आहे. कोलकत्ता येथील प्रसिद्ध असणाऱ्या कालीमातेच्या दर्शनासाठी गेलो होतो. येथे आळंदी, पंढरपूरसारखी गर्दी असल्याने कळसाचेच दर्शन घेतले. वेळ कमी असल्याने अन्य स्थळांना भेटी देता आल्या नाहीत. स्पर्धेच्या निमित्ताने थोडंस पर्यटन झाले असेच म्हणावे लागेल.
प्रोकॅमचे चार इव्हेंट मला पूर्ण करावयाचे आहेत. बंगलोर, कोलकत्ता दोन इन्व्हेंट झाले. मुंबई आणि दिल्लीचे दोन्ही इन्व्हेंट तुमच्या शुभेच्छामुळे निश्चित पूर्ण होतील. धावण्याच्या शर्यतीत भाग घेतल्याने आपला आरोग्यावरील खर्च कमी येतो. व्यायाम करणारी व्यक्ती नेहमी उत्साही राहते. आपण सर्वांनीच व्यायाम करावा स्वतःला निरोगी ठेवावे हीच अपेक्षा. आपण सुदृढ आरोग्यासाठी व्यायामाची कास धरावी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८