marathon 2022 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
marathon 2022 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

!! सातारा मास मॅरेथॉन !!(२ ऑक्टोबर ) पंचावन्न वर्षांपुढील गटात प्रथम क्रमांक

 !!  सातारा मास मॅरेथॉन !!(२ ऑक्टोबर )

             आज २ ऑक्टोबर, गांधी जयंती, जागतिक अहिंसा दिन या दिवसाचे औचित्य साधून मॅनुफॅक्चर्स असोसिएशन सातारा (मास) यांनी प्रथमच मॅरेथॉनचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे घोषवाक्य "रन फॉर हेल्थ " असे होते. औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांमध्ये फिटनेस जागरुकता निर्माण होऊन सशक्तीकरण व्हावे, जागतिक तापमानवाढ रोखणे व पर्यावरण संरक्षण याबाबत जागृती करण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. 






             या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक "टॉप गिअर  ट्रान्सन्मिशन" असून जोशी जम्पाला प्रा. लिमिटेड,उत्कर्ष  फ्लेक्सिबल कपलिंग हे सह प्रायोजक होते.या स्पर्धेचा शुभारंभ एम.आय.डी.सी.चे अधिक्षक अभियंता  राजेंद्र गावडे यांचे शुभहस्ते झाला.

       या स्पर्धा ११ कि. मी.व ५ कि. मी. अशा होत्या. मी ११ कि. मी.मध्ये भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा ५६:४५ (छपन्न मिनिटे आणि पंचेचाळीस सेकंदात ) पूर्ण केली. आज माझा पंचावन्न वर्षांपुढील गटात प्रथम क्रमांक आला. टॉप गिअरचे कार्यकारी संचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या शुभहस्ते ट्रॉफी, रोख बक्षीस, मेडल  देऊन गौरविण्यात आले. माझ्याबरोबर आमचे चिरंजीव डॉ. श्रीधर, भाचे श्रीकांत घोरपडे हेही सहभागी झाले होते.        



            आपल्या गावातील २५ मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. या सर्वांचेच प्रायोजकत्व श्रीकांत पवार यांनी स्वीकारले होते. या स्पर्धकाशिवाय टॉप गिअर परिवारातील शंभरपेक्षा अधिक  जणांनी या मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा संयोजनात मासचे अध्यक्ष राजेंद्र मोहिते आणि मास स्पोर्ट कमिटीचे चेअरमन श्रीकांत तोडकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

         




आपण सर्वजणच फिटनेसबाबत जागरुक राहूया त्याचबरोबर जागतिक तापमानवाढ रोखणे, पर्यावरण संरक्षण मोहिमेत सहभागी होऊया.

            राजेंद्र पवार 

           ९८५०७८११७८

शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

!! जावली जोडी रन !! (७ ऑगस्ट )

 

!! जावली जोडी रन !! (७ ऑगस्ट )




      आज जावली जोडी रनचे मेढा येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुरुष-पुरुष, स्री-स्त्री किंवा पुरुष-स्त्री असे भाग घेऊ शकतात. आम्ही पुरुष-पुरुष अशा गटात भाग घेतला होता. यामध्येही
१८ वर्षाखालील,१९ ते ४९ चा वयोगट तर पुढचा गट ५०वर्षांपुढील होता. आमच्या वयानुसार आमचा समावेश ५० वर्षावरील गटात होता. माझेबरोबर कारंडवाडीचे कुमार मेढेकर होते. मी आज ही स्पर्धा ५४मिनिटे आणि ६ सेकंदात पूर्ण केली.
    स्पर्धेचा रुट कण्हेर धरणालगत असल्याने धावताना खूपच आनंददायी वाटत होते. रुट सपोर्ट छानच होता. जावली जोडी रन ही देशातील अशी पहिलीच स्पर्धा आहे. अशा स्पर्धेमुळे कुटुंबातील सदस्यांना व्यायामाची आवड निर्माण होते.
     इंग्रजीत "Sound mind in a sound body".असे म्हटले आहे. चला तर आपण सर्वजणच व्यायामाची कास
धरुया.
      राजेंद्र पवार
  ९८५०७८११७८

रविवार, १५ मे, २०२२

!! टीसीएस वर्ल्ड १० के बेंगलुरु मॅरेथॉन !! (१५ मे )

 !! टीसीएस वर्ल्ड १० के बेंगलुरु मॅरेथॉन !! (१५ मे )

            आज बेंगलुरु येथे १० के मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जागतिक स्तरावरची होती. या स्पर्धेत मी भाग घेतला होता. आज ही स्पर्धा मी  ००:५२:४२ ( बावन्न मिनिटे आणि बेचाळीस सेकंदात ) पूर्ण केली. आज या स्पर्धेत सातारा हिल मरेथॉनचे निलेश माने, सौ.आशा माने, सदानंद दीक्षित, शिवाजीराजे गालिंदे, संदीप जाधव, वैभव कोकीळ यांनी भाग घेतला होता. सर्वांनीच ही स्पर्धा उत्तमरीत्या पूर्ण केली. यापैकी वैभव कोकीळ हे एलाईट रनर म्हणून सहभागी झाले होते. परदेशी खेळाडू बरोबर ते धावले. या स्पर्धेत केनिया, एथोपिया या रनरचा वरचष्मा होता.

        




        ही स्पर्धा कांतीरवा स्टेडियमपासून सुरु झाली होती. या स्पर्धेचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. आर. बोमय्या यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या ठिकाणी ५ किमीची मज्जा रन तसेच अपंगांसाठी देखील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी रूट सपोर्ट खूपच चांगला होता. बेंगलुरु येथे पहाटेच्यावेळी पाऊस पडत असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते त्यामुळे धावताना सगळ्यांचीच कसरत होत होती. यावेळी बरेच स्वयंसेवक मुलगी वाचवा, मुलांचे बालपण जपा अशा आशयाचे फलक घेऊन समाज प्रबोधन करत होते. सुदृढ समाज निर्मितीसाठी चांगल्या आरोग्याची गरज आहे. Physical exercise is as important as mental work.

           मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. प्रत्येकाने व्यायाम करुन आपलं आरोग्य चांगले ठेवावे असे वाटते.

Dear RAJENDRA PAWAR, Congratulations for completing your Open 10K at TCS World 10K Bengaluru 2022 in 00:52:42 (provisional timing). For results log on to www.sportstimingsolutions.in post 5pm. View your Badge: img.sportstimingsolutions.in/p/67028_7515.jpg  STS

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८




!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...