!! टीसीएस वर्ल्ड १० के बेंगलुरु मॅरेथॉन !! (१५ मे )
आज बेंगलुरु येथे १० के मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा जागतिक स्तरावरची होती. या स्पर्धेत मी भाग घेतला होता. आज ही स्पर्धा मी ००:५२:४२ ( बावन्न मिनिटे आणि बेचाळीस सेकंदात ) पूर्ण केली. आज या स्पर्धेत सातारा हिल मरेथॉनचे निलेश माने, सौ.आशा माने, सदानंद दीक्षित, शिवाजीराजे गालिंदे, संदीप जाधव, वैभव कोकीळ यांनी भाग घेतला होता. सर्वांनीच ही स्पर्धा उत्तमरीत्या पूर्ण केली. यापैकी वैभव कोकीळ हे एलाईट रनर म्हणून सहभागी झाले होते. परदेशी खेळाडू बरोबर ते धावले. या स्पर्धेत केनिया, एथोपिया या रनरचा वरचष्मा होता.
ही स्पर्धा कांतीरवा स्टेडियमपासून सुरु झाली होती. या स्पर्धेचे उद्घाटन कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. आर. बोमय्या यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. या ठिकाणी ५ किमीची मज्जा रन तसेच अपंगांसाठी देखील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी रूट सपोर्ट खूपच चांगला होता. बेंगलुरु येथे पहाटेच्यावेळी पाऊस पडत असल्याने बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते त्यामुळे धावताना सगळ्यांचीच कसरत होत होती. यावेळी बरेच स्वयंसेवक मुलगी वाचवा, मुलांचे बालपण जपा अशा आशयाचे फलक घेऊन समाज प्रबोधन करत होते. सुदृढ समाज निर्मितीसाठी चांगल्या आरोग्याची गरज आहे. Physical exercise is as important as mental work.
मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. प्रत्येकाने व्यायाम करुन आपलं आरोग्य चांगले ठेवावे असे वाटते.
Dear RAJENDRA PAWAR, Congratulations for completing your Open 10K at TCS World 10K Bengaluru 2022 in 00:52:42 (provisional timing). For results log on to www.sportstimingsolutions.in post 5pm. View your Badge: img.sportstimingsolutions.in/p/67028_7515.jpg STS
राजेंद्र पवार
९८५०७८११७८