abgapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
abgapur लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १९ मे, २०२२

प्रांताधिकारी मिनाज मुल्ला साहेबांनी साजरा केला वडाचा वाढदिवस

 प्रांताधिकारी मिनाज मुल्ला साहेब यांनी साजरा केला वडाचा वाढदिवस 

वाढदिवस साजरा करणे हि नियमित आहेच, परंतु एका झाडाचा ते पण वडाचा वाढदिवस आणि तो पण प्रांताधिकारी यांनी साजरा करणे हे म्हणजे नवलच....





                कोविडने जगभरात थैमान घातले त्यामधून कोणाचीच सुटका झाली नाही. याच काळात  दत्तटेकडीवर वडाचा जन्म झाला. हो जन्मच झाला. हा वड निसर्गप्रेमी अशोकराव कणसे यांचे अपत्य आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. आपण आपल्या बाळाला कडेवर, खांद्यावर खेळवतो, बापूंनी या वडाला चक्क डोक्यावर घेतले आणि टेकडीवर आणले त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. १९ मे २०२० ला या वडाचे रोपण करण्यात आले.गतवर्षी या वडाचा वाढदिवस मोठ्या इतमामाने करण्यात आला. या वडाकडे बापूंच्या प्रमाणे संपूर्ण पंचक्रोशीचे लक्ष आहे. या वडामुळे अभयवन सामाजिक संस्था उदयास आली. मला वाटते वर्णे, अंगापूर, धोंडेवाडी, फत्यापूर, खोजेवाडीचा डोंगर परिसर हिरवागार करण्याचे नेतृत्व हा वडच करत आहे. हा परिसर हिरवागार करण्यासाठी, त्यांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्ट, वर्णे -आबापुरी तसेच ग्रामस्थांनी  मोठे सहकार्य केले आहे.

                आजच्या दिवशी वडाच्या झाडाला जमिनीत पुनर्लागवड करून दोन वर्ष पूर्ण झाली. या वडाने या एका ओसाड टेकडीवर एकट्याने दोन वर्ष उन, वारा, पाऊस झेलून तो मी इथे कायम उभा राहीन अशी साक्ष देत असल्यासारखा एकटा आपली मुळे घट्ट रोवून दिमाखात उभा आहे. या वडास दोन वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त वडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला साहेब, माजी सैनिक गणेश शेडगे, डॉ माणिक काका शेडगे, वडाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नागठाणे हून आलेले कपिल साळुंखे, मधुकर खुळे आणि त्यांचे कुटुंबीय, आपल्या गावातील राहुल काळंगे, सुजित काळंगे, वैभव पवार तसेच या पंचक्रोशी मधील टेकडीवरच्या वडावर प्रेम करणारे निसर्गप्रेमी या वाढदिवसाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.

               या वडाच्या झाडापासून सुरु झालेले अभयवन संस्थेने केलेले कार्य सर्वांपर्यंत पोचावे यासाठी स्मरणिका तयार करून त्याचे वाटप करण्यात आले. अभयवनाच्या प्रत्येक कार्यात सहभागी असणारे परंतु आता आपल्यात नसणारे श्रीमंत काळंगे साहेब यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. 






चला आपण सर्वजन आपल्या जवळच्या असणाऱ्या ओसाड टेकड्या हिरव्यागार करण्यासाठी प्रयत्न करूया. 

 राजेंद्र पवार 

मोबा- ९८५०७८११७८



!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...