art of living training लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
art of living training लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, २१ मे, २०२२

!! वर्णे येथील युवा नेतृत्व विकसन कार्यक्रम !! (वायएलटीपी)

 !!  वर्णे येथील युवा नेतृत्व विकसन कार्यक्रम !!

  (वायएलटीपी)








     आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वायएलटीपी (Youth leadership training programme) च्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून प्रशिक्षणा दरम्यान ग्रामीण भागास भेट असा कार्यक्रम असतो. या प्रशिक्षणावेळी श्रीकांत पवार साहेबांच्या मुळे वर्णे गावाची निवड करण्यात आली होती. या प्रशिक्षणात ६३ व्यक्ती सहभागी झाले होत्या त्यामध्ये ३३ मुली होत्या, यामध्ये बहुतांशी  महाविद्यालयीन विद्यार्थी होते.

        या प्रशिक्षणात ७ गट तयार केले होते, प्रत्येक टीमला एक लीडर होता. स्वराज, शिलेदार, रेनबो, युनिक, महाराणा, अव्हेंजर अशी त्यांची नावे होती. प्रशिक्षणा दरम्यान आर्ट ऑफ लिव्हिंग करत असलेल्या कार्याची ओळख करुन देण्यात आली. श्री श्री रविशंकरजी यांच्यामुळे आर्ट ऑफ लिव्हिंगचे कार्य  २०० देशात पोहचले आहे. यामध्ये योग साधनेला खूप महत्व आहे.

          तणावमुक्त जीवन जगण्यासाठी आपण नेमके काय करायला हवे हे नाटिकेच्या माध्यमातून प्रशिक्षणार्थींनी सादरीकरण केले. सैनिकांबद्दल आदर, लसीकरणाचे महत्व, अध्यात्मातून विकास या बाबीही स्पष्ट केल्या गेल्या.

       श्रमदान हा या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग, त्यामधून हायस्कूलचा परिसर स्वच्छ केला, त्याचबरोबर आबापुरीच्या डोंगरावरील मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉकचे  काम करावयाचे असल्याने ते ब्लॉक डोंगरावर पोहचवण्याचे काम प्रशिक्षणार्थींनी केले.

    यावेळी चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांनी आजच्या तरुणाचे देशाच्या विकासातील महत्व, युवकांची सामाजिक जबाबदारी, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यासंबंधी आपण कोणती काळजी घ्यावी हे विविध उदाहरणाद्वारे मुलांना पटवून दिले.

       हा प्रशिक्षण वर्ग व्यवस्थित पार पडण्यासाठी सरपंच विजयकुमार पवार व त्यांची सर्व टीम,माजी सरपंच धैर्यशील पवार, शरद हणमंत पवार, अभिजित पवार, समाधान पवार, हायस्कूलचे  मुख्याध्यापक एस.एस.बाईंग सर आणि त्यांच्या स्टाफचे सहकार्य लाभले.

     आदर्श जीवन जगण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या अशा कोर्सची गरज आहे. लोकांनी घरबसल्या योग साधना करावी आणि निरामय जीवन जगावे असे वाटते.

    सर्वांना जय गुरुदेव .

     राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८


!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...