!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!
आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे "आयोजन करण्यात आलले होते. स्पर्धेचे आयोजक ' गोल्ड लिफ एंटरटेनमेंट' हे होते.या स्पर्धेची थीम होती, पर्यावरण विषयक जनजागृती करणे, वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे. स्पर्धा पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला एक रोप देण्यात आले.
या मॅरेथॉनमध्ये माझ्यासह विशाल घोरपडे , सौ.प्रगती घोरपडे, शार्वी घोरपडे आणि वासुदेव शिरोडकर यांनी सहभाग घेतला होता. या ठिकाणी २१ कि.मी., १०कि.मी., ५ कि.मी., २कि.मी. अशा स्पर्धा होत्या. माझ्यासह वासुदेव आणि विशाल यांनी हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता तर शार्वीने २ किलोमिटरमध्ये आणि प्रगतीने १० किलोमीटरमध्ये भाग घेतला होता.
ही स्पर्धा सकाळी सहा वाजता मान्यवरांनी फ्लॅग ऑफ करुन झाली. स्पर्धेचा प्रारंभ झाल्याबरोबर स्पर्धकांच्या अंगावर पुष्पवष्टी झाली. हाफ मॅरेथॉनचा रूट हा तीव्र चढउताराचा होता. (Eavation gain & loss 365 ) मीटर असे होते. भल्याभल्यांना घाम फुटणारी ही स्पर्धा होती. अनेक स्पर्धकांनी ही स्पर्धा अर्ध्यातून सोडून देणे पसंत केले. ही स्पर्धा ७/७ किलोमीटरच्या तीन लूपमध्ये ही स्पर्धा झाली. स्पर्धा मार्गावर वाहतुकीचे कसलेच नियोजन नसल्याचा फटका प्रत्येकाला बसला. रूट सपोर्टमध्ये पाणी आणि एनर्जी ड्रिंकशिवाय काही नव्हते. जागोजागी स्पर्धकांना प्रेरणा देण्यासाठी कोणीच नव्हते.
आज माझ्या बाबतीत मात्र चांगलाच योग जुळून आला होता. आमच्या सौ. कुसुमताईनी स्पर्धेच्या ठिकाणी पूर्ण वेळ उपस्थित राहून प्रोत्साहित केले. असं माझ्या जीवनात पहिल्यांदा घडलं त्यामुळे ते कायम स्मरणात राहील. स्पर्धा मार्गावर मी शिक्षण घेतलेले बी. एड. कॉलेज होते. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कॉलेज प्रवेशद्वारावर छबी टिपण्याचा मोह आवरला नाही.
नुकतीच पावसाने उघडीप दिल्याने हवेत दमटपणा जाणवत होता. सहा महिन्याच्या कालावधीनंतर मी प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेतला. सराव कमी असल्याचा मलाही त्रास जाणवला. आज मी ही स्पर्धा (२:४०:४४ )दोन तास चाळीस मिनिटे आणि चव्वेचाळीस सेकंदात पूर्ण केली.
मॅरेथॉनमध्ये आपल्या शरीराचा कस लागतो. खर तर आपली शारीरिक क्षमता तपासण्यासाठी आपण अशा स्पर्धेत भाग घेतला पाहिजे असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा