!! टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ !! (१५ जानेवारी )
आज मुंबईमध्ये टाटा मुंबई मरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सिनिअर सिटीझन,दिव्यांग यांच्यासह हाफ मॅरेथॉन २१ किलोमीटर तसेच फूल मॅरेथॉन (४२.१९५ किलोमीटर )चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मी फूल मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.
यावेळी माझ्याबरोबर फूल मॅरेथॉनमध्ये माझे मार्गदर्शक निलेश माने, सदानंद दीक्षित,अलमास मुलाणी,दयानंद घाडगे यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सातारा येथील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आमच्या बरोबर असणाऱ्या हेमंत भोईटे, अमोल जगदाळे,आशा माने, विजया कदम, सुप्रिया मोरे, प्रशिला घाटगे, संध्या पवार या बाकीच्या स्पर्धकांनी २१ किलोमीटरमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा पहाटे ५:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु झाली.स्पर्धेचा रुट अतिशय छान होता. जागोजागी वाद्यवृंद स्पर्धकांचा उत्साह वाढवत होते. इनर्जी फूडची व्यवस्थाही ठीकठिकाणी केलेली होती. प्रेक्षक लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धकांचा जोश वाढवत होते.
मी पहिल्यांदा फूल मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा संपल्यावर आम्ही गेट वे ऑफ इंडिया या प्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली. आपण अशा स्पर्धेत भाग घेऊन आपला फिटनेस वाढवावा असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८