!! गरवारे वाई हाफ मॅरेथॉन !! (२० नोव्हेंबर ) ५५ वर्षावरील वयोगटात पहिला नंबर
आज २० नोव्हेंबर, टीम वाई स्पोर्ट्स फौंडेशनने गरवारे वाई हाफ मॅरेथॉनचे आयोजन केले होते. आज मी २१ कि. मी. हाफ मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा १:५३:०६ (एक तास त्रेपन्न मिनिटे आणि सहा सेकंदात) पूर्ण केली. माझा ५५ वर्षावरील वयोगटात प्रथम क्रमांक आला. स्पोर्ट्स फौंडेशनच्या वतीने सन्मान चिन्ह, पदक आणि रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
आज माझ्याबरोबर वर्णे येथील बाळासाहेब साळुंखे, माझे बंधू डॉ. दत्तात्रय भोसले, भाचे श्रीकांत घोरपडे, नागठाण्याचे मधुकर खुळे यांनीही स्पर्धेत भाग घेतला होता. वाई स्पोर्ट्स फौंडेशनने "फिट इंडिया, हिट इंडिया" ही देशव्यापी थीम घेतली होती. यामागे आरोग्यदायी चळवळ अधिक गतिमान करणे हाच मुख्य उद्देश होता.
आजच्या स्पर्धेचा प्रारंभ द्रविड हायस्कूल मैदानावरून सकाळी ६:१५ वाजता झाला. स्पर्धेचा प्रारंभ गरवारे ग्रुपचे विवेक कुलकर्णी, वैभव जोशी, टीम वाई स्पोर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक ओसवाल, रेस डायरेक्ट राजगुरू कोचले सर, गंधर्व रिसॉर्टचे सारंग फरांदे, निखिल फरांदे यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. स्पर्धेचा मार्ग महागणपती पूल, गंगापुरी, मेणवली भोगाव, वरखडवाडी, धोम, शिंदेवाडी असा होता.आजचा रूट सपोर्ट खूपच छान होता. ठिकठिकाणी वाद्यांच्या गजरात स्पर्धकांना प्रोत्साहित केले जात होते. एनर्जी फूडची व्यवस्था जागोजागी होती. धावण्यासाठी अतिशय आल्हाददायक वातावरण असल्याने मला ही स्पर्धा कमी वेळात पूर्ण करता आली.
आरोग्य चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनीच व्यायाम करायला हवा असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८