tata लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
tata लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ जानेवारी, २०२४

वयाच्या ६५ व्या वर्षी टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ - ४२ किलोमीटर ४:२०:११ वेळेत पूर्ण

 !! टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ !!  (२१ जानेवारी)

                    आज टाटा मुंबई मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पहाटे पाच वाजता ध्वज दाखवून सुरु झाली.ही स्पर्धा ४२ कि.मी. (फूल मॅरेथॉन), २१ कि.मी.(हाफ मॅरेथॉन), १० कि.मी., ड्रीम रन(५:९ कि.मी.), सिनियर सिटिझन रन (४:२ कि.मी.), चॅम्पीअन्स  वुईथ  डीसअबिलिटी (१:३) अशी होती. 


                    मी ४२ कि.मी. म्हणजेच फूल मॅरेथॉन मध्ये भाग घेतला होता. या मॅरेथॉन मध्ये जवळपास साठ हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता, आज मी ही स्पर्धा ४:२०:११ (चार तास वीस मिनिटे व अकरा सेकंद) एवढ्या वेळेत पूर्ण केली. आजची स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून  सुरु झाली. स्पर्धेचा मार्ग हॉटेल ट्रायडंट, राजीव गांधी सी लिंक, रिक्लेमेशन फ्लायओव्हर, वरळी डेअरी, नेहरु सायन्स सेंटर, जसलोक रुग्णालय, विल्सन कॉलेज , तारापोरवाला मत्स्यालय आणि वानखेडे स्टेडियम असा होता. स्पर्धेच्या  प्रारंभाच्या  ठिकाणी जाताना धातूशोधक यंत्रातून जावे लागते. पूर्वीच्या प्राविण्यानुसार ए, बी, सी, डी, ई, एफ, जी असे  प्रवेश मार्ग होते. माझा प्रवेश मार्ग बी होता. थोडक्यात काय तर याठिकाणी स्पर्धकाशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही. 



       रनर्सना स्पर्धा मार्गावर छानपैकी सपोर्ट होता. टाटाची कोणतीही आणि कोठेही देश विदेशात मॅरेथॉन असो , सर्वत्रच रुट सपोर्ट छानच असतो. मग ते इनर्जी फूड असू देत, मेडिकल हेल्प असू देत किंवा ठीक ठिकाणचा वाद्यवृंद असू देत. वाद्यांच्या तालावर धावपटू आपले भान हरपून धावत असतात. मार्गाला जणू यात्रेचे स्वरूप आलेले असते. ही मॅरेथॉन आंतरराष्ट्रीय दर्जाची असल्याने जगभरातल्या मॅरेथॉनला पात्र होण्यासाठी येथील गुणांकन महत्वाचे असते. येथे जगभरातील स्पर्धक सहभागी होत असतात. स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी पोलिसांचे वाद्यवृंद पथक ही होते. तुतारीमुळे स्पर्धकांचा जोश वाढत होता.



                 रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना २२ जानेवारी रोजी असल्याने सर्व मार्गावर भगवे वातावरण होते. जय श्रीराम या नावाचा सर्वत्र गजर होत होता. वंदे मातरम्, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या जात होत्या.

              निवृत्तीनंतर  मला मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यायला मिळतोय याचा मला खूप आनंद होतोय. सध्या मी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई या संस्थेत संचालक म्हणून काम करत आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.गोरखजी चव्हाण, संस्थापक उपाध्यक्ष मा.चंद्रकांत वंजारी यांनी मला संस्थेचा ब्रँड ॲम्बेसेडर केले आहे.ही गोष्ट माझ्या दृष्टीने अतिशय प्रतिष्ठेची आहे. मला या स्पर्धेत शिवकृपा सहकारी पतपेढीमधील अधिकारी संदिप शिर्के यांचे विशेष सहकार्य लाभले. ते माझ्याबरोबर सहा सात किलोमीटर धावले त्यांच्यामुळे मलाही धावायला जोर आला. संदिप शिर्के यांच्या बरोबर अजित देसाई व संदिप घारे होते.त्यांच्या बरोबर मी स्पर्धेच्या ठिकाणी गेलो व त्यांच्या समवेत परत आलो. मला विशाल घोरपडे यांचा खास उल्लेख करावा लागेल. माझा सराव करुन घेण्याचे मोठे काम त्यांच्याकडून होत आहे. 



                मला वाटते आपले  उ्दिष्ट मोठे असायला हवे, ते साध्य करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. छोट्या टिप्स सुध्दा आपणास यशाकडे घेऊन जातात. पुणे येथील सीएफसी क्लबचे निलेश भालेकर, डॉ. दत्तात्रय भोसले, धनंजय नायकवडी, गुणवंत गायकवाड, सुनिल मांढरे, रामदास लावंड आदिनी या  स्पर्धेत भाग घेतला होता.

                   मी निवृत्तीनंतर स्पर्धेत भाग घ्यायला सुरुवात केली. या क्षेत्रात प्राविण्य प्राप्त करु शकलो.तुम्ही तर तरुण आहात, तुम्हाला  काहीच अवघड नाही.आपणास निरोगी आणि दीर्घायुषी आयुष्य लाभावे असे वाटत  असेल तर  नियमित व्यायाम करा. आपण सर्वजनच व्यायामाची कास धराल यात मला कसलाही संदेह नाही.

     राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

   ८१६९४३१३०६

रविवार, २६ फेब्रुवारी, २०२३

Tata Ultra Marathon 2023

 !!टाटा अल्ट्रा मॅरेथॉन, लोणावळा !!  (२६ फेब्रुवारी )



   आज टाटा अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन लोणावळा येथे करण्यात आले होते. या स्पर्धा ३५ कि. मी.व ५० कि. मी.अशा होत्या. यावेळी मी ५० कि. मी.अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मार्गात फार मोठा चढ उतार असेल तर त्याला अल्ट्रा असे म्हटले जाते. आपल्याकडील सातारा हिल मॅरेथॉन त्याच प्रकारची आहे.

      ही स्पर्धा रात्री १:३० वाजता सुरु झाली. स्पर्धेपूर्वी एक तासभर स्टारटिंग पॉईन्टला हजर राहावे लागते. नियोजनाप्रमाणे ही स्पर्धा सुरु झाली. स्पर्धा सुरु करताना फ्लॅग ऑफ करतात हे आपणास विदित आहेच. स्पर्धा कमीतकमी वेळेत पूर्ण करायची असा मनोदय आम्ही केला होता.तो आम्ही तडीस नेला. मी ही स्पर्धा ५:१४:४९ ( पाच तास चौदा मिनिटे आणि एकोणपन्नास सेकंदात ) पूर्ण केली. माझं आतापर्यंतचे हे बेस्ट रेकॉर्ड आहे. कोणतीही स्पर्धा पूर्ण करताना अनेकांचे सहकार्य लाभते.



 माझ्याकडून विक्रमी वेळात स्पर्धा पूर्ण करुन घेण्याचे सर्व श्रेय मंगळापूरचे विशाल घोरपडे यांनाच जाते.त्यांनी सराव तर करुन घेतलाच. त्यांनी स्पर्धेत भाग घेतला नव्हता. केवळ माझ्या प्रेमापोटी स्वतःच्या पायाला दुखापत असताना ते माझ्याबरोबर धावले.मला वारंवार स्पर्धेच्या टिप्स दिल्या. चढाला धावताना मदतीचा हात दिला. तरूणांना लाजवेल असेच आमच्याकडून काम झाल्याने कौतुकाचा वर्षाव आमच्यावर होत होता.

          स्पर्धेचा मार्ग खडतर होता हे वेगळे सांगायला नकोच. स्पर्धा मार्गावर २४१२ मीटर उंचीचा चढ उतार होता. त्याला Elevation gain & loss  असे म्हटले जाते. थोडक्यात आम्ही २४१२ मीटर उंचीचा चढ उतार धावलो. वेळ रात्रीची होती. प्रत्येकाच्या डोक्यावर बॅटरी होती.ठीकठिकाणी जनरेटरच्या माध्यमातून विजेची सोय केली होती. हा स्पर्धा प्रकार अवघड आहे. मलाही ३१ व्या किलोमीटरला उजव्या पायाला जबरदस्त Cramp आला. आम्हाला जागेवर थांबण्याशिवाय पर्याय नव्हता.








पण विशालजीने पाय चोळला आणि आम्ही तंदुरुस्त होऊन धावायला सुरुवात केली. आज माझेबरोबर विशाल घोरपडे नसते तर मला ही स्पर्धा अर्ध्यात सोडून द्यावी लागली असती.  त्यामुळे आजच्या यशाचे सर्व श्रेय विशाल घोरपडे यांनाच जाते. आजचं यश मी त्यांनाच समर्पित करतो.

       टाटांची प्रत्येक स्पर्धा अफलातून असते. रुट सपोर्ट खूपच छान होता. ठराविक अंतरावर इनर्जी फुडचे पॉईंट होते. मेडिकल हेल्पही लगेच मिळत होती. पुणे परिसरातील स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी  पिंपरी चिंचवड येथील सीएफसी क्लबचे सहकार्य  नेहमीच मला होते.या क्लबमधील माझे बंधू डॉ.दत्तात्रय भोसले, गुणवंत गायकवाड, रामदास लावंड, सुनिल मांढरे,निलेश भालेकर, अशोक कोचळे,सी. बी.मगर, ओंकार पाटील,दिपाली देवरे पाटील  हे सदस्य सहभागी झाले होते.

      कोणतंच यश सहजपणे मिळत नाही त्यासाठी कठोर परिश्रमाची तयारी असावी लागते. आपणास जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सातत्यपूर्ण कष्ट करावेच लागणार. आपणही कष्ट करण्याची तयारी ठेऊन जीवनात यशस्वी व्हावे असे मला वाटते.

      राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

रविवार, १५ जानेवारी, २०२३

!! टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ !! (१५ जानेवारी )

 !! टाटा मुंबई मॅरेथॉन २०२३ !!  (१५ जानेवारी )

             आज मुंबईमध्ये टाटा मुंबई मरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा सिनिअर सिटीझन,दिव्यांग यांच्यासह हाफ मॅरेथॉन २१ किलोमीटर तसेच फूल मॅरेथॉन (४२.१९५ किलोमीटर )चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मी फूल मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता.

               


यावेळी माझ्याबरोबर फूल मॅरेथॉनमध्ये माझे मार्गदर्शक निलेश माने, सदानंद दीक्षित,अलमास मुलाणी,दयानंद घाडगे यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत सातारा येथील अनेक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आमच्या बरोबर असणाऱ्या हेमंत भोईटे, अमोल जगदाळे,आशा माने, विजया कदम, सुप्रिया मोरे, प्रशिला घाटगे, संध्या पवार या बाकीच्या स्पर्धकांनी २१ किलोमीटरमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा पहाटे ५:१५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु झाली.स्पर्धेचा रुट अतिशय छान होता. जागोजागी वाद्यवृंद स्पर्धकांचा  उत्साह वाढवत होते. इनर्जी फूडची व्यवस्थाही ठीकठिकाणी केलेली होती. प्रेक्षक लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्पर्धकांचा जोश वाढवत होते.

             मी पहिल्यांदा फूल मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. स्पर्धा संपल्यावर आम्ही गेट वे ऑफ इंडिया या प्रसिद्ध ठिकाणाला भेट दिली. आपण अशा स्पर्धेत भाग घेऊन आपला फिटनेस वाढवावा असे वाटते.





     राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...