श्रीकांत घोरपडे श्री सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्काराचे मानकरी!
राज्यस्तरीय श्री सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन २०२२ मध्ये कृषी विभाग जिल्हा परिषद सातारा आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "श्री सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार" निसराळे येथील युवा शेतकरी श्रीकांत घोरपडे यांना माजी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री मा. आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कृषी आणि कृषी प्रक्रिया उद्योगात श्रीकांत घोरपडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी कांदा पीक, ऊसाची सुपरकेन नर्सरी, औषधी वनस्पतीमध्ये शतावरी, मधूपर्णीची लागवड करुन तरुणांनी शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
मागील महिन्यात स्वर्गीय यशवंरावजी चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त १७ व्या राज्यस्तरीय यशवंत कृषी प्रदर्शन आणि जिल्हा महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडूनही त्यांना आदर्श शेतकरी म्हणून गौरवण्यात आले होते.
शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेण्याची परंपरा आजोबापासूनच सुरू आहे. 'शेतीतील किमयागार' म्हणून आजोबांची तालुक्यात ओळख होती. हाच शेतीचा वारसा कुटुंबीय पुढे नेत आहोत.
शेती सोबत SARAS Entrepreneurs हा कृषी - अन्न प्रक्रिया उद्योग सुरू केला. 'Panchatm' (पंचात्म) या ट्रेडमार्क अंतर्गत १५ पेक्षा जास्त प्रॉडक्टची विक्री सध्या केली जात आहे.
श्रीकांत घोरपडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विशेषतः निसराळे व वर्णे पंचक्रोशीत अभिनंदन होत आहे.