!!माधवराव सिंधिया स्मृतिदिन !!
(३० सप्टेंबर )
माधवराव जिवाजीराव सिंधिया जन्म:१० मार्च १९४५ मृत्यू - ३० सप्टेंबर २००१ एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे मंत्री होते . १९६१ मध्ये ते ग्वाल्हेरचे मराठ्यांच्या सिंधिया राजघराण्याचे वंशज म्हणून महाराजा बनले होते . त्यांचा कार्यकाळ १९६१ ते १९७१ असा होता. तथापि २६ व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय संविधानानुसार सर्व संस्थाने रद्द करण्यात आली. त्यांचे संस्थानही रद्द करण्यात आले.आपोआपच त्यांचे राजेपण गेले. माधवराव सिंधिया (शिंदे )
यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कण्हेरखेड हे आहे.त्या गावाला त्यांनी भेट दिली होती. कण्हेरखेडमध्ये त्यांचा पुतळा आहे.
सिंधियाचा जन्म ग्वाल्हेरच्या शेवटचा शासक महाराजा , जिवाजीराव सिंधिया येथे झाला . त्यांचे शालेय शिक्षण सिंधिया स्कूल , ग्वाल्हेर येथे झाले आणि त्यानंतर विंचेस्टर कॉलेज आणि ऑक्सफोर्ड येथील न्यू कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेतले .माधवराव सिंधिया लोकसभेचे ९ वेळा सदस्य झाले. ते केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे, नागरी उड्डाण ,मनुष्यबळ विकास आदि मंत्री होते.भारतीय माहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्था (आयआयआयटीएम) स्थापन करण्याचे श्रेय सिंधिया यांनाच जाते. ते भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्षदेखील होते .३० सप्टेंबर २००१ रोजी विमान अपघातात माधवराव सिंधिया यांचे निधन झाले.
माधवराव सिंधिया (शिंदे ) यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा