environments लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
environments लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ४ जून, २०२२

!! जागतिक पर्यावरण दिन !!(५ जून )

 !! जागतिक पर्यावरण दिन !!(५ जून )

          जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी ५ जूनला जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी यादिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी त्या गोष्टी बद्दल जागरूक केले जाते. ज्यांचा जगावर आणि पर्यावरणावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतात. हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या आपल्या जबाबदारीचे आपल्याला जाणीव आणि दृष्टीकोन देतो. 



  

        १९७४ मध्ये प्रथमच जागतिक पर्यावरण दिन साजरा केला गेला, त्याचा मुख्य उद्दिष्ट उद्योनमुख पर्यावरणविषयक समस्यांबाबत जनजागृती करणे हा होता. यात पर्यावरणीय मुद्यांवर जसे की समुद्री प्रदूषण, वाढती लोकसंख्या, ग्लोबल वार्मिंग इ. घटकांबाबत चर्चा केली जाते. 

             प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिन एक प्रमुख थीम घेऊन येतो, यामध्ये  पर्यावरणाविषयी कारणांची चर्चा केली जाते.  २०२१ मध्ये पर्यावरण दिनाची थीम होती  "Air Pollution( वायू प्रदूषण )". यावर्षीचे यजमानपद स्वीडन कडे आहे.

जागतिक पर्यावरण दिवस महत्व : आजच्या दिवशी म्हणजेच ५ जून रोजी जगभर पर्यावरण दिवस अगदी थाटा माटाने साजरा केला जातो. त्यादिवशी पुढील जीवनातील परिस्थिती किती बिकट होईल ते पाहता त्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. प्रत्येक ठिकाणी उपक्रम करून भाषणे करून, झाडे लावा उपक्रम राबवून पुढील धोका टाळण्याचे आज कार्य केले जाते. या सर्वांतूनच या दिवसाची जागरूकता निर्माण होते.

लक्षात ठेवा : आपल्या मातेसमान पृथ्वी आहे आणि तिच्या पर्यावरणाची काळजी आपण घेतली पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी आपण सर्वजणच प्रयत्न करुया.

 पर्यावरण दिनाविषयी काही घोषवाक्ये...

१) वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण

    यामुळे कमी होते प्रदूषण.

२) पर्यावरण वाचेल तरच जग वाचेल.

३) पर्यावरणाचा करुया सन्मान, कारण

   हेच आहे आपल्यासाठी वरदान.

४) झाडे लावा झाडे जगवा,

    भविष्य वाचवा जीवन फुलवा.

५) काम करा लाख मोलाचे,

    निसर्ग संवर्धनाचे.

६) उन्हातान्हात हवी असेल सावली 

    तर वृक्ष लावा पावलोपावली.

७) स्वच्छ सुंदर परिसर,

     आरोग्य नांदेल निरंतर

           आमच्या परिसरात अभयवन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाचे जोरदार काम चालू आहे, खूप मोठया प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. आजही झाडे लावणे तसेच झाडासाठी खड्डे काढण्याचे नियोजन आहे. वेळ मिळेल तेंव्हा आपण कामात सहभागी व्हायला हवे, त्यांच्या कामात सहयोग द्यायला हवा असे मला वाटते. चला तर जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने उघडे, बोडके डोंगर हिरवे करुया. या धरणी मातेला नटवूया.

     संकलक : राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...