बुधवार, ३१ मार्च, २०२१

एस. एम.जोशी स्मृतिदिन !! (१एप्रिल )

 

!! एस. एम.जोशी स्मृतिदिन !! (१एप्रिल )



             श्रीधर महादेव जोशी,अर्थात एस.एम. जोशी जन्म : १२ नोव्हेंबर १९०४  मृत्यू : १ एप्रिल १९८९ हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते होते. ते प्रथम समाजवादी, नंतर प्रजासमाजवादी आणि शेवटी संयुक्त समाजवादी पक्षाचे सभासद होते. पत्रकारिता, लेखन, वक्तृत्व, राजकारण व समाजकारण या क्षेत्रांतील नि:स्वार्थीपणे अन्‌ अविरतपणे केलेल्या कार्यामुळे ज्यांचे आयुष्यच ‘एक धडपडीचा इतिहास’ बनून गेले असे ते समाजवादी लढवय्ये असून मवाळ वृत्तीचे एक नेते होते.
                  एस. एम. जोशींचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी झाला. त्यांचे मूळ गाव रत्नागिरीजवळील गोळप होय. एकत्रित असलेले मोठे कुटुंब व एकटे वडील कमवते अशा स्थितीत जेमतेम भागणाऱ्या घरात त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली आणि पुढे ही स्थिती आणखीनच बिघडत गेली. १९१५ साली वडिलांचा मृत्यू झाला आणि कुटुंबाची परवड झाली. अशाही परिस्थितीत शिक्षणाविषयीची त्यांची ओढ कायम राहिली. सवलती, शिष्यवृत्ती मिळवून त्यांनी अध्ययन सुरूच ठेवले.
              एस .एम जोशींचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन काॅलेजातून झाले.
           भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्वार्थाकडे दुर्लक्ष करून, देशार्थासाठी कार्यरत राहणे एस.एम जोशींनी चालूच ठेवले. १९५७ साली ते महाराष्ट्र विधानसभेत आमदार झाले आणि १९६७ साली ते २ऱ्या लोकसभेसाठी खासदार म्हणून निवडून गेले..
             घरात दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असताना आणि स्वतःचेच दु:ख डोंगराएवढे असतानाही देशहिताच्या गोष्टी करण्याची इच्छा त्यांना लहानपणापासूनच होती. जो दुबळा आहे त्याच्या बाजूने आपल्या तत्त्वांची ताकद उभा करणारा हा लढवय्या अगदी लहानपणापासून लोकहितदक्ष असे. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इंग्रजी शिकविणाऱ्या मास्तरांनी चेहऱ्यावर देवीचे व्रण असणाऱ्या एका विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले; तेव्हाचा प्रसंग त्यांच्या इतरांसाठी लढण्याच्या आपल्या न्यायी वृत्तीचे दर्शन घडवितो. त्या मास्तरांना त्यांच्या तासाला छान दिसणाऱ्या मुलांनीच पुढे बसावे असे वाटायचे. म्हणून मास्तरांनी ‘त्या’ विद्यार्थ्याला मागे बसायला सांगितले. एस. एम. यांनी याला विरोध केला. समर्पक कारण देऊन त्यांनी त्या विद्यार्थ्याला हट्टाने पुढेच बसवायला लावले. ज्यांना समाज चुकीच्या कारणासाठी नाकारतो, त्यांना स्वीकारण्याची मानवतावादी दृष्टी एस.एम. यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भागच होती – हे सांगणारा हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे.
              देश स्वतंत्र व्हावा म्हणून आपापल्या परीने आणि मार्गाने प्रत्येक जण लढत होता. जहाल – मवाळांच्या अखंड प्रयत्नातून आशेचा किरण सामान्यांच्या नजरेच्या टप्प्यात येत होता. हे प्रयत्न, राष्ट्रभक्तीचे वातावरण या सर्वांविषयी एस.एम. यांना विलक्षण ओढ होती. चिरोल खटला लढवून परत आलेल्या लोकमान्य टिळकांची मिरवणूक पाहण्यासाठी गेल्यामुळे त्यांना छड्या खाव्या लागल्या होत्या. हा अनुभव असतानाही १९२० साली टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थींची मिरवणूक काढली गेली, त्यातही ते सामील झाले. याही वेळी त्यांना छड्या खाव्या लागल्या. पण पर्वताएवढ्या निष्ठेसमोर ती शारीरिक शिक्षा त्यांच्यासाठी नगण्य होती. पुणे येथे विद्यार्थ्यांची संघटना स्थापन करून तिच्या मार्फत स्वातंत्र्यासाठी प्रयत्न, मुंबईत यूथ लीग परिषदेचे आयोजन अशी कामे करत असताना त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
            जात-पात व धर्मभेदापेक्षा माणूस श्रेष्ठ आहे हा विचार घेऊन एस.एम. यांनी सनातन्यांचे विचार नाकारले. १९२९ मध्ये तत्कालीन अस्पृश्यांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून केलेल्या पर्वती येथील (पुणे) सत्याग्रहात त्यांनी पुढाकार घेतला. या सत्याग्रहाला विरोध करायला आलेले सनातनी हजारोंच्या संख्येत होते. पर्वती सत्याग्रहानंतर सनातन्यांनी सत्याग्रहाला विरोध म्हणून सभाही घेतली. त्या प्रचंड सभेचा रोष एस. एम. यांना स्वीकारावा लागला. पण सत्य आणि न्याय्य बाजूसाठी कोणत्याही परिणामांना सामोरे जाण्याची त्यांची तयारी होती.
              सविनय कायदेभंग चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली. या तुरुंगवासाच्या काळात ते ज्येष्ठ नेत्यांच्या सान्निध्यात आले. येथेच त्यांना मार्क्सवाद व समाजवाद या संकल्पनांचा सखोल परिचय झाला. यातूनच पुढे ते कॉंग्रेस-समाजवादी पक्षाच्या स्थापनेत व कार्यात पुढाकारासह सहभागी झाले. भारतात, प्रामुख्याने महाराष्ट्रात समाजवादी तत्त्वज्ञानाचा निष्ठेने प्रसार करण्याचा यशस्वी प्रयत्न एस.एम. यांनी यथाशक्ति केला. समाजवादी विचारसरणीचे एक प्रमुख अग्रणी, एक निष्ठावंत आधारस्तंभ म्हणूनच त्यांना ओळखले जात असे.
               देशाला स्वातंत्र्य आणि देशबांधवांना अधिकाराचे जगणे मिळावे यासाठी त्यांनी वैयक्तिक आयुष्याकडे दुर्लक्ष केले. १९ ऑगस्ट १९३९ रोजी त्यांचे लग्न झाले. पण देशाच्या संसारात गुंतलेले हात घरच्या संसाराला हातभार लावायला मिळणे कठीण होते. यानंतरचे एस.एम. यांचे आयुष्य म्हणजे वाऱ्यासारखे वेगवान होते. युद्धविरोधी चळवळीसाठी तुरुंगवास, छोडो भारत चळवळ, राष्ट्रसेवा दल अशा अनेक कार्यातल्या त्यांच्या सहभागाने प्रापंचिक कर्तव्यांना मर्यादा पडल्या.
             १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा प्रमुख सहभाग होता. आधी महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या असहकार चळवळीत भाग घेतल्याबद्दल १९३० साली एक वर्षाचा आणि नंतर 'राॅय दिना'च्या दिवशी केलेल्या भाषणाबद्दल दोन वर्षांचा असा एकूण सुमारे ३ वर्षे त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. साबरमती, नाशिक व येरवडा येथील तुरुंगांमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. या काळात त्यांना समृद्ध करणारा साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे राष्ट्रसेवा दलाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. या संघटनेच्या माध्यमातून युवकांना राष्ट्रवादाचे संस्कार देणे, त्यासाठी शिबिरे-संमेलने-मेळावे भरवणे, कलापथके स्थापन करून त्याद्वारे अस्पृश्यताविरोधी प्रचार, स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांचा पाठपुरावा अशी अनेक रचनात्मक कामे त्यांनी केली. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात वसंत बापट, राजा मंगळवेढेकर, पु.ल.देशपांडे, निळू फुले, राम नगरकर, स्मिता पाटील इत्यादी दिग्गज कलावंत त्या-त्या काळात काम करत होते. यामागे प्रमुख प्रेरणा एस.एम. जोशी यांचीच होती. स्वातंत्र्य आंदोलनात काही काळ त्यांनी भूमिगत राहूनही कार्य केले.
               एसएम जोशी हे संयुक्त महाराष्ट्र समितीचे सक्रिय सभासद होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत आणि त्यानिमित्त झालेल्या प्रत्येक सार्वजनिक सभेत एस.एम यांची हजेरी असे.
       एस. एम.जोशी यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
      संकलक : राजेंद्र पवार
              ९८५०७८११७८
     

मंगळवार, ३० मार्च, २०२१

भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना !! (३१ मार्च)

 

  !!  भारतीय रिझर्व्ह बँक स्थापना  !!
    (३१ मार्च)      

       



        
                भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.
              भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:         
१) भारतीय चलनी नोटांची छपाई
    गरजेनुसार  करणे.
२)भारताची गंगाजळी राखणे.  
३)भारताची आर्थिक स्थिती राखणे.           ४)भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण
करणे.

     संकलक: राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८

सोमवार, २९ मार्च, २०२१

!!रावरंभा या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची घोषणा !! (२९ मार्च)

 !!रावरंभा या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची घोषणा !! (२९ मार्च)



       आज २९ मार्च, वर्णे गावचे भूमिपुत्र, टॉपगिअर ट्रान्समिशनचे संचालक, वासल्य फौंडेशनचे अध्यक्ष, धार-पवार घराण्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शशिकांत पवार यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल प्रितीमध्ये मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

          शशिकांत पवार (अण्णा) यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून "रावरंभा" या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची घोषणा करण्यात आली. शशिकांत पवार या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या चित्रपटाची संहिता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी लिहिली आहे. आज चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार उपस्थित होते. वर्णे -आबापुरी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानचे शिवकळा अधिकारी श्रीप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते कळ दाबून "रावरंभा"या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी  चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांच्यासमवेत मी उपस्थित होतो. भाऊसाहेब पवार, श्रीकांत पवार  यांच्या परिवारावर प्रेम करणारे, चित्रपट व्यवसायाशी संबंधित  बरेच लोक या कार्यक्रमास  उपस्थित होते.



             टॉपगिअर परिवाराने  यापूर्वी अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्येही त्यांना आई जगदंबेच्या कृपेने भरभरुन यश येईल यात संदेह नाही.

          नवीन व्यवसायातील पदार्पणाच्या तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने शशिकांत पवार यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.

       राजेंद्र पवार

     ९८५०७८११७८

!! रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर स्मृतिदिन !! (३० मार्च )

 

!! रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर स्मृतिदिन !! (३० मार्च )





             रघुवीर शंकर मुळगावकर  जन्म १४ नोव्हेंबर  १९१८ - मृत्यू ३० मार्च  १९७६  हे मराठी चित्रकार होते. त्यांचे वडील शंकर मुळगावकर हेही चित्रकार होते. त्यांचे मूळ आडनाव राजाध्यक्ष होते. गावाच्या नावावरून त्यांनी ते मुळगावकरअसे केले. शंकररावांनी गोव्यात चित्रकलेचा एक वर्ग चालवला होता. रघुवीर मुळगावकरांचा थोरला भाऊदेखील चित्रकलेत पारंगत होता. पण दुर्दैवाने, तो अल्पायुषी ठरला. पुढे रघुवीराने वडिलांचा चित्रकलेचा वारसा सांभाळला.
                मुळगावकरांच्या शेजारी प्रसिद्ध चित्रकार ए.एक्स. त्रिंदाद(त्रिनिदाद)राहत. लहानपणी रघुवीर त्यांची चित्रे न्याहाळत बसत असे. त्रिंदादांनीही या मुलातील कलागुण हेरले व शंकररावांना रघुवीरास चित्रकला शिक्षणासाठी मुंबईला धाडण्यास सांगितले.
               रघुवीर मुळगावकर मुंबईला आले. त्या काळात चित्रकार एस.एम. पंडित यांचे नाव कलाक्षेत्रात प्रसिद्ध होते. चित्रपट, पोस्टरे, कॅलेंडरे या माध्यमांतून पंडितांची कला लोकांना परिचित होती. मुळगावकरांनी मुंबईला आल्यानंतर काही काळ एस.एम. पंडितांकडे काढला. मुळगावकरांनी एकलव्याप्रमाणे पंडितांचे काम न्याहाळत त्यांची शैली जवळून अभ्यासली.
               नंतर मुळगावकर गिरगावात स्थायिक झाले. तेथे कुलकर्णी ग्रंथागार, केशव भिकाजी ढवळे, ग.पां. परचुरे, रायकर यांच्या प्रकाशनांच्या पुस्तकांच्या वेष्टनांची कामे मिळू लागली. तो काळ मराठी साहित्यातला सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. पुस्तके, नियतकालिके यांच्यासोबत कॅलेंडरेही मोठया प्रमाणात प्रकाशित होत असत. बहुत: देवदेवतांची असणारी त्यांवरील चित्रे मुळगावकरांच्या कुंचल्याने नटू लागली. पूर्वीच्या पिढीत राजा रविवर्म्याने देवदेवतांची चित्रे काढून घरोघरी चित्रकलासंस्कार पोचवण्याचे जे काम केले, तेच मुळगावकरांनी पुढे नेले.
                   प्रल्हाद केशव अत्रे, विनायक दामोदर सावरकर, पु.ल. देशपांडे, चिं.वि. जोशी, अ.वा. वर्टी यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने सजली. त्याचप्रमाणे दीपलक्ष्मी, धनुर्धारी, वसंत, अनुप्रिता, नंदा, माधुरी, माणिक, अलका, पैंजण अशा अनेक नियतकालिकांची व त्यांच्या दिवाळी अंकांची मुखपृष्ठे मुळगावकरांच्या कुंचल्याने साकारली.                  मुळगावकरांनी दीपलक्ष्मी नियतकालिकासाठी १९५८ ते १९७६ सालांदरम्यान, म्हणजे अठरा वर्षे, मुखपृष्ठे चितारली. या कामांमधून दीपलक्ष्मीचे ग.का. रायकर व शब्दरंजन नियतकालिकाचे जयंत साळगावकर मुळगावकरांचे स्नेही बनले.
        मुळगावकरांनी देवदेवतांप्रमाणे काही व्यक्तिरेखाही अमर केल्या. बाबूराव अर्नाळकरांचे धनंजय, छोटू, झुंझार-विजया, काळापहाड, धर्मसिंग, चारुहास आदी गुप्तहेर मुळगावकरांनी साकारले होते. दरमहा सहा कथा प्रसिद्ध होणाऱ्या या मालिकांना मुळगावकरांनी अशा रितीने सादर केले, की धनंजय वगैरे पात्रे काल्पनिक असूनही वाचकांना ती खरीखुरी वाटत. मुळगावकरांनी कथाचित्रेही अमाप काढली. विशेषत: हाफटोनमधील वॉश चित्रे असोत, वा सरळ रेषांमध्ये काढलेली रेखाचित्रे, कृष्णधवल रंगांतील त्यांची कथाचित्रे देखणी असत. या कृष्णधवल रंगांमध्ये अनेक पौराणिक व ऐतिहासिक चित्रमालिका त्यांनी प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये गणेश पुराण, रामायण, महाराष्ट्रातील संत आदी मालिका लोकप्रिय झाल्या.
               संख्येने सुमारे पाच हजारांच्यावर चित्रसंपदा निर्माण करणाऱ्या मुळगावकरांची 'स्प्रे' या माध्यमावर जबरदस्त पकड होती. त्यांनी या माध्यमाचा वापर मोठया कुशलतेने केला. त्यांच्या कामाचा झपाटादेखील मोठा होता.
                       त्यांची भावजय व प्रसिद्ध   गायिका नलिनी मुळगावकर यांनी संपादलेल्या रत्नदीप दिवाळी अंकामध्ये त्यांनी कथाचित्रे व चित्रमालिका चितारणे आरंभले. पुढे त्यांनी स्वतःचा रत्नप्रभा हा अंक सुरू केला. या वार्षिकामधून त्यांनी आपल्या खासशैलीने चित्रे रसिकांसमोर आणली.
           मुळगावकरांना उतारवयात कर्करोगाच्या व्याधीने ग्रासले.३० मार्च  १९७६ रोजी दुपारी १२.२० वाजता, वयाच्या केवळ अठ्ठावन्नाव्या वर्षी मुळगावकर यांचे निधन झाले.रंगसम्राट रघुवीर शंकर मुळगावकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
  संकलक:  राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८

रविवार, २८ मार्च, २०२१

महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापना !! (२९ मार्च)


!! महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापना !!
  (२९ मार्च)





             महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी हे विद्यापीठ २९मार्च १९६८रोजी स्थापन झाले. प्रत्यक्षऑक्टोबर १९६९ मध्ये कार्यान्वित झाले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे ब्रीदवाक्य "अन्नं बहु कुर्वीत तद् व्रतम्" थोडक्यात"आम्ही मुबलक अन्न तयार करण्याचे व्रत करतो" असे आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. प्रशांतकुमार पाटील  हे आहेत.त्यांनी नुकताच कुलगुरु पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्र १० जिल्ह्यात विस्तारलेले आहे. या कार्यक्षेत्रातील बराचसा भाग कमी पर्जन्यमान असलेला आहे. शेतकऱ्यांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी संशोधन प्रकल्पावर भर असण्याचे त्यांनी सांगितले. विकेल ते पिकेल यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.नवनियुक्त कुलगुरु यांचे समवेत फुल संशोधन केंद्र  पुणे येथे कृषी विज्ञान केंद्र बोरगावच्या माध्यमातून ,डॉ.भूषण यादगीरवार यांच्यामुळे काही क्षण व्यतीत करता आल्याचा मनस्वी आनंद होत आहे.




       अहमदनगर -मनमाड या महामार्ग क्र.६ वर हे विद्यापीठ आहे. नगरपासून विद्यापीठापर्यंतचे अंतर ३५ कि. मी. एवढे आहे.महाराष्ट्राबरोबरच देशभरारातून येणाऱ्या शेतकऱ्यांना सर्व कृषी माहिती दिली जाते.
      पारंपारिक विद्यापीठामध्ये प्रामुख्याने शिक्षण कार्यावर भर देण्यात येतो. परंतु कृषी विद्यापीठामध्ये कृषी शिक्षणाबरोबरच, कृषी संशोधन आणि कृषी विस्तार शिक्षण कार्यही त्याच तोलामोलाचे चालते.विद्यापीठांतर्गत ७३ घटक आणि विनाअनुदानित तत्त्वावरील कृषी व संलग्न महाविद्यालये कार्यरत आहेत. याशिवाय ९७ अनुदानित आणि विनाअनुदानित कृषी तंत्र विद्यालये कार्यरत आहेत.सातारा जिल्ह्यात बोरगाव येथे कृषी तंत्र विद्यालय आहे.तसेच याचठिकाणी कृषी विज्ञान केंद्रही कार्यरत आहे.
      विद्यापीठातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,विभागीय विस्तार केंद्रे,जिल्हा विस्तार केंद्रे, माहिती केंद्रे,प्रसारण केंद्र,कृषी विज्ञान केंद्रे, कृषी महाविद्यालय विस्तार गट,शेतकरी शास्त्रज्ञ मंच इत्यादी मार्फत विस्तार शिक्षण पद्धतीद्वारे प्रयत्न केले जात आहेत.
          या विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी राज्य तसेच केंद्र सरकारच्या  प्रशासकीय सेवेत उच्च पदावर कार्यरत आहेत तर काहीजण आपली सेवा बजावून निवृत्त झाले आहेत. त्यातील काही विद्यार्थ्यांची नावे आपल्या माहितीसाठी --
तानाजी सत्रे(आयएएस), प्रभाकर देशमुख (आयएएस), चंद्रकांत दळवी (आयएएस), उमाकांत दांगट (आयएएस), शिवाजी दौंड (आयएएस), विकास देशमुख (आयएएस), व्ही.जे. भोसले (आयएएस), राजाराम माने (आयएएस), ए.आर शिंदे ( आयएएस), शेखर गायकवाड (आयएएस) यातील अनेकजण सातारा जिल्ह्याशी संबंधित आहेत.



     यापैकी शेखर गायकवाड (राज्य साखर आयुक्त) कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्णे हायस्कूलमध्ये आले होते.आपल्या माहितीसाठी विद्यापीठाची वेबसाईट देत आहे.
    www.mpkv.ac.in अशी आहे. अधिक माहितीसाठी आपण या वेबसाईटवर भेट देऊ शकता.
      संकलक : राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८



शनिवार, २७ मार्च, २०२१

!! होळी सण माहिती !! (२८ मार्च )

 


         !!  होळी सण माहिती  !!
(२८ मार्च )




         होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला "होळी पौर्णिमा" असेही संबोधले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची स्थाननिहाय विभागणी होते तसेच काही ठिकाणी एकत्रितरीत्या तो साजरा होतो . फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.
                    होळी साजरी करताना लोक ह्या उत्सवाला "होलिकादहन" किंवा "होळी", "शिमगा", "हुताशनी महोत्सव", फाग,फागुन "दोलायात्रा", "कामदहन" अशा वेगवेगळ्या संज्ञा आहेत. कोकणात शिग्मो किंवा शिग्मा म्हणतात. फाल्गुन महिन्याच्या शेवटच्या दिवशी साजरा होणाऱ्या ह्या लोकोत्सवाला "फाल्गुनोत्सव",आणि दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त "वसंतागमनोत्सव" किंवा "वसंतोत्सव" असेही म्हणण्यात येते. देशीनाममाला या ग्रंथात हेमचंद्र याने याला सुग्रीष्मक असे नाव दिले आहे.यातूनच ‘शिमगा’ असा अपभ्रंश तयार झाला असावा असे मानले जाते.
          महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिधा म्हणून काही लाकडे मंत्रोच्चारात जाळण्यात येतात, आणि पेटलेल्या होळीभोवती 'बोंबा' मारत लोक प्रदक्षिणा घालतात. होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य दाखविला जातो. महाराष्ट्रात पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची पद्धती रूढ आहे. होळी नंतर ५ दिवसांनी रंगपंचमी हा सण साजरा केला जातो.होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदनाचा सण साजरा केला जातो याला' धुळवड' असेही म्हणतात. एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधुभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पहिले जाते.
            भारतातील शेतकरी वर्गात होळी या सणाचे विशेष महत्त्व आहे. पौराणिक इतिहास पाहता या सणाचे आणि कृष्ण-बलराम यांचे नाते दिसून येते. होळीच्या निमित्ताने या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा करतात. या दिवशी हाती आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्यासाठी प्रार्थना करतात. होळीच्या दुसऱ्या दिवशी गव्हांच्या ओंब्या भाजण्याची प्रथा आहे. या दिवसात गव्हाचे पीक तयार होते हे त्यामागील कारण असू शकते. नवीन पीक अग्नी देवतेला समर्पित करण्याचीही प्रथा आहे.
              विद्वानांच्या मते हा उत्सव प्राचीन अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे. होळीच्या सणाचे आज सगळीकडे प्रचलित असलेले स्वरूप पाहिले तर लक्षात येते ते असे की हा सण मुळात लौकिक पातळीवरचा असावा. त्यात कालांतराने उच्च संस्कृतीच्या लोकांकडून धार्मिक/सांस्कृतिक विविध विधानांची भर पडली असावी.
                    पुरणपोळी
महाराष्ट्रात होळीच्या अग्नीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्याची प्रथा आहे.तसेच समस्त समुदाय होळीची विधियुक्त पूजन करतो.होळी समोर गार्‍हाणे, नवस बोलण्याची परंपरा आहे.
    कोरोना प्रादुर्भावामुळे,होळी,धुलीवंदन व रंगपंचमी हे उत्सव  अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत. आपण सर्वजण आदेशाचे पालन करुया व हे सण साधेपणाने साजरे करुया.
  संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

राजा गोसावी जन्मदिन !!(२८ मार्च)

 

     !!  राजा गोसावी जन्मदिन !!(२८ मार्च)




      राजा गोसावी - पूर्ण नाव - राजाराम शंकर गोसावी जन्म:२८ मार्च १९२५(फलटण - सातारा) मृत्यू ०१ मार्च १९९८ हे मराठीतले नाट्य-चित्रपट अभिनेते होते. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणत. मराठीचे ते डॅनी के होते. राजा गोसावी यांचे धाकटे बंधू बाळ गोसावी हेही नाट्य‍अभिनेते होते. नाट्यअभिनेत्री भारती गोसावी या बाळ गोसावी यांच्या पत्‍नी होत.
                  राजा गोसावी हे मास्टर विनायकांच्या घरी ते घरगड्याचे काम करीत. प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्त्यांनी आधी ऑफिसबॉयचे व नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. पुढे दामुअण्णा मालवणकर यांच्या प्रभाकर नाट्य मंदिरात ते ’प्रॉम्प्टर’ झाले. त्यांना ’भावबंधन’ या नाटकात रखवालदाराची भूमिका मिळाली. तीच त्यांची नाटकातली पहिली भूमिका. नंतर ते पुण्याच्या भानुविलास चित्रपटगृहात चित्रपटाची तिकीटबारीवर तिकिटे विकायचे काम करू लागले ,त्यांनी भूमिका केलेला पहिला मराठी चित्रपट ’अखेर जमलं’ आणि ’लाखाची गोष्ट’ जेव्हा पुण्यातल्या भानुविलास चित्रपटगृहात लागले, तेव्हाही राजा गोसावींनी आपल्याच चित्रपटाची तिकिटे विकली होती.
                 राजा गोसावी यांचे शिक्षण मराठी चौथीपर्यंत झाले असले तरी त्यांच्या शब्दांत ते बी.ए.(बॉर्न आर्टिस्ट) होते. ते सुरुवातीला कामगार म्हणून नाट्य क्षेत्रात शिरले आणि ’नटसम्राट’ म्हणून बाहेर पडले. राजा गोसावी यांनी १००हून अधिक चित्रपटांतून कामे केली आणि जवळपास ५० नाटकांत. ’भावबंधन’ मधील रखवालदाराच्या भूमिकेनंतर त्याच नाटकात ’धुंडीराज’ची भूमिका मिळाली. दुसरीकडे ते नाटकाची पोस्टर्स चिकटवायचे काम करीत.
         मराठी सिनेमात निरोगी विनोदाची मुहूर्तमेढ मास्टर विनायकांनी रोवली असली, तरी ती पुढे समर्थपणे चालवली राजा गोसावी यांनी. राजा गोसावी खर्‍या अर्थाने चतुरस्र कलावंत होते. त्यांनी रंगविलेला मध्यमवर्गीय/शहरी नायक रसिकांना मनापासून भावला. त्यांच्या चित्रपटाची घोडदौड एकोणीसशे पन्नासच्या दशकापासूनच सुरू होती. त्यांचा बोलबाला एवढा होता की, १९५८ मध्ये पुण्याच्या बाबुराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत ’राजा गोसावीची गोष्ट' हा चित्रपट काढला होता. साठच्या दशकात राजा गोसावी यांनी शरद तळवलकर, दामुअण्णा मालवणकर यांच्यासमवेत अनेकानेक उत्तमोत्तम सिनेमे दिले. त्यांच्या अभिनयातील विनोदात निरागसता आणि नैसर्गिकता होती.
              राजा गोसावी यांना मेकअपच्या खोलीतच चेहर्‍याला रंग लावताना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा इहलोकीचा प्रवास आटोपला .
  राजा गोसावी यांचे चित्रपट
अखेर जमलं
अवघाची संसार (१९६०)
आंधळा मागतो एक डोळा
आलिया भोगासी
उतावळा नवरा
कन्यादान (१९६०)
काका मला वाचवा
कामापुरता मामा (१९६५)
गंगेत घोडं न्हायलं
गाठ पडली ठकाठका
गुरुकिल्ली (१९६६)
चिमण्यांची शाळा (१९६२)
देवघर
दोन घडीचा डाव
पैशाचा पाऊस (१९६०)
बाप माझा ब्रह्मचारी (१९६२)
येथे शहाणे राहतात (१९६८)
लग्नाला जातो
लाखाची गोष्ट
वरदक्षिणा (१९६२)
वाट चुकलेले नवरे (१९६४)
सौभाग्य
हा खेळ सावल्यांचा
राजा गोसावी यांना नटसम्राट मध्ये ’गणपतराव बेलवलकरांची’ भूमिका करण्याचा मान मिळाला होता. १९९५ साली बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद  भूषवण्याचा सर्वोच्च सन्मानही प्राप्त झाला होता. राजा गोसावी यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
   संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८


शुक्रवार, २६ मार्च, २०२१

जागतिक रंगभूमी दिन !! (२७ मार्च )

 

!! जागतिक रंगभूमी दिन !! (२७ मार्च )



World Theater Day: जागतिक रंगभूमी दिनाचे महत्व
२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
         व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली.
      विष्णुदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाने मराठी रंगभूमीची सुरुवात झाली. १८४३ मध्ये सांगली येथे मराठीतल्या या पहिल्या संवाद व संगीत नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्त्वूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. दरम्यान, अगोदर चित्रपट, त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, संगणक यांच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का? अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यात गुरफटलेली आहे. पण, या सर्व माध्यमांकडे शत्रू म्हणून नपाहता मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्याची गरज आहे.
   आपणास जागतिक रंगभूमीदिनाच्या
हार्दिक शुभेच्छा.
       संकलक : राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

..

बुधवार, २४ मार्च, २०२१

हिंदी कवी महादेवी वर्मा जन्मदिन !! (२६ मार्च)

 

  !! हिंदी कवी महादेवी वर्मा जन्मदिन !!
     (२६ मार्च)



महादेवी वर्मा  यांचा जन्म २६ मार्च १९०७ मृत्यू ११ सप्टेंबर १९८७  त्या हिंदी कवी, स्वातंत्र्यसेनानी आणि भारतातील शिक्षणतज्ज्ञ होत्या . त्यांना "आधुनिक मीरा "असे म्हटले जाते.त्या एक आधुनिक कवी होत्या तसेच लघुकथा लेखक, कादंबरीकार म्हणूनही त्यांची विशेष ओळख होती.
           महादेवी वर्मा यांनी प्राचार्य म्हणून देखील काम केले होते.त्या तत्कालीन प्रयाग महिला विद्यापीठ या अलाहाबादमधील महिला निवासी महाविद्यालयाच्या कुलगुरू होत्या.
        त्यांना १९५६ मध्ये पदमभूषण,१९८२ मध्ये भारतीय ज्ञानपीठ,१९८८ मध्ये पदमविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचा मृत्यू ११ सप्टेंबर १९८७ रोजी झाला.
     महादेवी वर्मा यांची एक रचना
          जो तुम आ जाते एक बार
          जो तुम आ जाते एक बार
          कितनी करुणा कीतने संदेश
          पथ में बिछ जाने बन पराग
          गातो प्रानों का तार तार
          अनुराग भरा उन्माद राग
          आंसू लेते वे पथ पखार
          जो तुम आ जाते एक बार
          हॅन्स उठते पल में आद्र नयन
          धुल जाता होठोसें विषाद
          छा जाता जीवन मे वसंत
         लुट जाता चिर संचित विराग
        आँखे देती सर्वस्व बार
         जो तुम आ जाते एक बार
         संकलक: राजेंद्र पवार
                ९८५०७८११७८

व.पु.काळे जन्मदिन !!(२५ मार्च)

 

!! व.पु.काळे जन्मदिन   !!(२५ मार्च)



         वसंत पुरुषोत्तम काळे (२५ मार्च १९३२ -  मृत्यू -२६ जून २००१; व.पु. काळे नावाने प्रसिद्ध, हे मराठी  भाषेतील  लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार होते.व. पु काळे यांचे विचार साहित्य रसिकांमध्ये खूप प्रसिध्द होते. वसंत पुरुषोत्तम काळे पेशाने वास्तुविशारद  होते.२६ जून २००१ रोजी हृदयक्रिया बंद पडून त्यांचे निधन झाले.
       वपुंना महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा सन्मान, ‘पु.भा.भावे’ पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार आणि अमेरिकेत भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले गेले.   
               !!     व.पु.विचार !!
           १)  मैत्रीचे धागे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात..! तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातेनेही तुटणार नाहीत..!!
        २)  संवाद दोनच माणसांचा होतो, त्याच्यात तिसरा माणूस आला की त्या गप्पा होतात..!!
         ३)  कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं कोमलता म्हणजे दुर्बलता नव्हे ..! म्हणूनच खडक झिजतात प्रवाह रुंदावत जातो..!!
              ४)  जाळायला काही नसलं तर पेटलेली काडीसुद्धा आपोआप विझते..!!
            ५)  खर्च झाल्याच दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो..!!
         ६) प्रॉब्लेम्स नसतात कुणाला..? ते शेवटपर्यतअसतात..! पण प्रत्येक प्राॅब्लेमला उत्तर हे असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो,कधी पैसा तर कधी माणस..!या तिन्ही गोष्टी पलीकडचा प्राॅब्लेम अस्तित्वातच नसतो..!!
              ७)  आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!
           ८)  शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो..!!
            ९)  घेणाऱ्याच्या अपेक्षेपेक्षा देणार्‍याची ऐपत नेहमीच कमी असते..!!
            १०)  माणूस अपयशाला भीत नाही.अपयशाचं खापर फोडायला काहीच मिळालं नाही तर..? याची त्याला भीती वाटते..!!
     ११)  बोलायला कुणीच नसणं यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण..!!
      १२)  कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
        १३)  पाण्यात राहायचे तर माश्यांशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वत:ला मासा बनावे लागते.
          १४) वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा.
              १५) कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगन भरारीचं वेड रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही .
            १६)आकाशात जेव्हा एखादा कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पिटाळुन लावेपर्यतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.
           १७)  समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.

संकलक : राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८


मंगळवार, २३ मार्च, २०२१

यशप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण काम आवश्यक-डॉ. आबासाहेब पवार



 यशप्राप्तीसाठी सातत्यपूर्ण काम आवश्यक- डॉ. आबासाहेब पवार 



      अंगापूर येथे शहीददिनाचे औचित्य साधून स्वामी विवेकानंद ग्रंथालयात अंगापूर वंदन,अंगापूर तर्फ तारगाव आणि वर्णे येथील ग्रामपंचायत सदस्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रशिक्षण वर्गासाठी तिन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य,  माझ्यासह डॉ.विक्रम कणसे, ओंकार देशमुख,निलम कणसे तसेच संबंधित गावचे ग्रामसेवक उपस्थित होते.

        आम्हीच करणार आमच्या गावचा विकास हे ब्रीद घेऊन सर्वांनी काम केले तर गावाचा कायापालट होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन कराड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.आबासाहेब पवार यांनी केले.

          ते पुढे म्हणाले की, प्रथम आपणआपले  सरकार सेवा केंद्रामधून योजना  समजून घेतल्या पाहिजेत. योजना समजून घेतल्यानंतर त्याच्या कार्यवाहीचे टप्पे जाणून घेऊन प्रत्यक्ष कृती करायला हवी. ग्रामपंचायतीला साधारण ७९ विषयावर काम करता येते. समाजाचा विचार केला तर यशप्राप्ती लवकर होते यासाठी आपण कुटुंबनिष्ठ न होता समाजनिष्ठ व्हायला हवे.

           प्रत्येक जण काम करत असतो पण माझे काम सर्वोत्तम झाले पाहिजे असाच प्रयत्न करा.प्रत्येक व्यक्तीमध्ये जे चांगले आहे ते इतरांना कसे मिळेल यासाठी प्रयत्न करायला हवा. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होत नाही. गुणात्मक शिक्षण मिळण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका खूप महत्वाची आहे. शिक्षकाना अध्यापनाशिवाय अन्य काम असू नये. पूर्वप्राथमिक शिक्षण खूप महत्वाचे असते. वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत बालकाचा ८०% विकास होत असतो म्हणून मातांनी बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे.

      शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. सदरच्या योजना राबवत असताना ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या भूमिकाही स्पष्ट केल्या.दुपारच्या सत्रात ग्रामसेवक रावसाहेब भोकरे यांनीही शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी कशी करायची याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक ओंकार देशमुख यांनी केले तर आभार राजेंद्र पवार यांनी मानले.

    चला तर आपण सर्वजण आपल्या गावच्या विकासासाठी कटिबद्ध होऊया.

      राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

जागतिक क्षयरोग दिन !!(२४ मार्च)

 

!!   जागतिक क्षयरोग दिन  !!(२४ मार्च)




                            क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात.
                            क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो.
                      संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.
         संकलक: राजेंद्र पवार
                        ९८५०७८११७८

सोमवार, २२ मार्च, २०२१

!! शहीद रन !!(२३ मार्च )

 !! शहीद रन !!(२३ मार्च )

  आज २३ मार्च, शहीद दिन या दिवसाचे औचित्य साधून शहीद रनचे आयोजन करण्यात आले होते. आज मी फक्त १० कि. मी.च्या स्पर्धेत भाग घेतला होता.



         स्पर्धेचा रुट वर्णे-अपशिंगे असाच होता.स्पर्धेचा प्रारंभ वर्णे हायस्कूलपासून करण्यात आला. आज  मी ही स्पर्धा००.५३.५४ (त्रेपन्न मिनिटे चोपन्न सेकंदात) पूर्ण केली. या स्पर्धेच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली वाहिली जाते. यासाठी रूट सपोर्ट दादासो सुतार यांनी दिला. 

       देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले आहे. या सर्वामध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान कधीच विसरण्यासारखे नाही. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने हौतात्माच्या त्यागाला सलाम केला जातो.

     आपला देश एकसंघ राहण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्न करुया. देशाच्या ऐक्याचा प्रयत्नच शहिदांना आदरांजली ठरेल असे मला वाटते.

     राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८

शहीद दिन !!(२३ मार्च)

 

   !! शहीद दिन !!(२३ मार्च)



          समाजवादी विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांनी देशव्यापी क्रांतिकारी संघटना उभी करण्याचे ठरवले.चंद्रशेखर आझाद,भगतसिंग, राजगुरू, सुखदेव इत्यादी तरुण यामध्ये प्रमुख होते. हे सर्व क्रांतिकारक धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे होते.१९२८ साली दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर झालेल्या बैठकीत या तरुणांनी 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या संघटनेची स्थापना केली. भारताला ब्रिटिशांच्या शोषणातून मुक्त करणे हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. त्यांच्याबरोबर दिलेल्या शेतकरी-- कामगारांचे शोषण करणारी अन्यायी सामाजिक-आर्थिक व्यवस्थाही उलटून टाकायाची होती.सामाजिक न्यायावर व समतेवर आधारित समाज निर्माण करायला भगतसिंग यांनी महत्व दिले.
                  शस्त्र गोळा करणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे ही कामे या संघटनेच्या स्वतंत्र विभागाकडे सोपवली होती. या विभागाचे नाव होते 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी'आणि तिचे प्रमुख होते चंद्रशेखर आझाद.
             या संघटनेच्या सदस्यानी अनेक क्रांतिकारक कृत्ये केली. भगतसिंग व राजगुरू  यांनी लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सँडर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले.
       नागरी हक्काची पायमल्ली करणारी दोन विधेयके यावेळी सरकारने मध्यवर्ती विधिमंडळात दाखल केली होती. त्यांचा निषेध करण्यासाठी भगतसिंग व बटूकेश्वर दत्त यांनी मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले.
            सरकारने तत्काळ ही हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मीच्या केंद्रावर धाडी घातल्या. त्यातून सँडर्सच्या हत्येचे धागेदोरे ही पोलिसांच्या हाती लागले.सरकारने क्रांतिकारकांची धरपकड सुरु केली. त्यांच्यावर राजद्रोहाच्या आरोपाखाली खटले भरले. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले. हा दिवस शहीद दिन म्हणून देशात सर्वत्र साजरा केला जातो.
     शहिदांना विनम्र अभिवादन.
    संकलक: राजेंद्र पवार
           ९८५०७८११७८

रविवार, २१ मार्च, २०२१

जागतिक जलदिन !! (२२ मार्च )

 

!! जागतिक जलदिन !! (२२ मार्च )




        जलसाक्षरता --काळाची गरज
               पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्गचक्र,पावसाची अनियमितता इत्यादीमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. भारतात देखील आगामी भविष्यकाळात तीव्र पाणीटंचाईची समस्या जाणवणार  हे भारतातील जलउद्योगांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
         भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश आहे. भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळते. उपलब्ध झालेले पाणी अडवून त्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. छोटे छोटे बंधारे,कालवे,शेततळी बांधणे, जलपुनर्भरण करणे,पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणे,उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे,इत्यादी उपायातून आपणास योग्य जलव्यवस्थापन करता येते.
                 आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीतकमी वापर असा नियम करुन घेतला तरीही पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता येऊ शकेल.जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.
        संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

शनिवार, २० मार्च, २०२१

!! शाळेसाठी आवाहन !! (२१ मार्च )

 

         !! शाळेसाठी आवाहन !! (२१ मार्च )


    श्री काळभैरव विद्यालय वर्णे हे विद्यालय वर्णे ग्रामविकास मंडळ, मुंबई या स्थानिक संस्थेद्वारा उद्योजक श्रीकांत पवार, मानसिंग पवार ,राजकुमार काळंगे, सुनील काकडे, विकास पवार  तसेच अन्य  मुंबईस्थित व वर्णे येथे वास्तव्यास असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालवली जाते. ग्रामविकासात  विद्यालयाचा मोलाचा वाटा आहे.शाळेचे असंख्य विद्यार्थी आज विविध क्षेत्रात कार्यरत आहेत त्याचा शाळेला अभिमान आहेच.
          आजमितीला शाळेत ५ वी ते १० वीचे वर्ग आहेत. गतवर्षांपासून कोविड १९ मुळे शाळेचे वर्ग व्यवस्थित भरत नाहीत. शाळा बंद पण शिक्षण चालू असे जरी म्हटले असले तरी खऱ्याअर्थाने शिक्षण होत नाही असे मला वाटते.सध्या शासन कौशल्य विकासावर भर देत आहे. आपण २०१३ पासूनच  आपल्या विद्यालयात कौशल्य शिक्षण सुरु केले आहे. कौशल्य शिक्षण देत असताना प्रात्यक्षिक शिक्षणावर भर असतो. त्यासाठी आधुनिक यंत्रसामग्रीची गरज असते. स्वतंत्र कार्यशाळा अपेक्षीत असते. या सर्व सुविधा पुरवण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहेच. परंतु निधी संकलनात मर्यादा येतात. गतवर्षी विकास पवार (शेठ) यांनी ५१०००/-रुपये देणगी देऊन मदत केली होती. कार्यशाळेच्या बांधकामाबरोबर कंपाऊंड, गेट आदि गोष्टी करावयाच्या आहेत. नुसत्या कार्यशाळेचे बांधकाम पूर्ण होणेसाठी साधारण अडीच लाख रुपयांची  अजून गरज आहे.  कंपाऊंड व गेटसाठी  वेगळ्या निधी अपेक्षित आहे.खासकरून शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी निधी संकलनात भरीव योगदान द्यावे. आपण वस्तूरुपाने मदत केली तरी आनंदच आहे.







       
       शाळा विकासासंबंधी आपल्या काही सूचना असतील तर त्याचा स्वीकार केला जाईल.चला तर आपण सर्वजण आपल्या शाळा माऊलीला  सर्वतोपरी सहकार्य करुन मोठी करुया.
      राजेंद्र पवार
    ९८५०७८११७८

जागतिक वन दिन !!(२१ मार्च)

   !!जागतिक वन दिन !!(२१ मार्च)



        दृष्टीआड असलेल्या सृष्टीचे महत्व

   मानवाला समजत नाही. शुध्द हवा पिण्याचे पाणी आपल्याला जंगलामुळे मिळते.मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणाऱ्या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले त्यातूनच जंगल वाचवण्याची संकल्पना पुढे आली.

      संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा "जागतिक वन दिवस" साजरा करण्यास सुरुवात केली.

      वन दिन साजरा करण्यामागे  महत्वाचे मुद्दे

१)अनावश्यक जंगलतोड टाळणे.

२)अधिक झाडे लावणे.

३)जंगलापासून मिळणारी उत्पादने आणि

    होणारे फायदे लोकांच्या निदर्शनास आणून देणे.

४)जंगलास  भेट दिल्याने अधिकची मिळणारी  माहिती अधिक लोकांपर्यंत पोहोचवणे.

        जंगलाबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणाऱ्या हवामानातील बदलाबाबत चिंता वाटत असणाऱ्या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हादेखील वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे.

     चला तर निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी झाडांचे संरक्षण व संगोपन करण्यासाठी कटिबद्ध होऊया.

 संकलक: राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८


गुरुवार, १८ मार्च, २०२१

जागतिक चिमणी दिवस !!(२० मार्च)

 

!! जागतिक चिमणी दिवस !!(२० मार्च)




      चिमणी हा पक्षी जगाच्या सर्व भागात आढळतो. हा एक छोटासा पक्षी आहे ज्याची लांबी १६ सेमी (६.३इंच) असते. मादी पक्षाचा रंग फिकट तपकिरी आणि करडा असतो.आणि नर चमकदार काळा, पांढरा आणि तपकिरी असतो.चिमणीच्या साधारण २५ प्रजाती आहेत.
        चिमण्या मानवी वस्तीशी संबंधित आहेत त्या  शहरी तसेच ग्रामीण भागात राहू शकतात.  चिमण्या मुख्यतः धान्य आणि तणांवरील बिया खातात.
      संकलक : राजेंद्र पवार
          ९८५०७८११७८



!जे.बी. कृपलानी स्मृतिदिन !! (१९ मार्च )

 



  !!जे.बी. कृपलानी स्मृतिदिन !! (१९ मार्च )



      जीवतराम भगवानदास कृपलानी जन्म ११ नोव्हेंबर १८८८ मृत्यू - १९ मार्च १९८२ हे आचार्य कृपलानी म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय राजकारणी होते. खासकरुन म्हणजे १९४७ च्या सत्ता हस्तांतरण दरम्यान ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि सुचेता कृपलानी यांचे पती होते . कृपलानी हे गांधीवादी समाजवादी, पर्यावरणवादी, रहस्यवादी आणि स्वातंत्र्यवादी कार्यकर्ते होते .

          जीवतराम भगवानदास कृपलानी यांनी गांधींशी जवळीक साधली ते एके काळी  गांधींचे सर्वात उत्कृष्ट  शिष्य होते. त्यांनी जवळपास एक दशकासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. त्यांना शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आला आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी त्यांना अध्यक्ष बनविण्यात आले.

    जे.बी.कृपलानी यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

   संकलक :राजेंद्र पवार

        ९८५०७८११७८







बुधवार, १७ मार्च, २०२१

! वीर वामनराव जोशी जन्मदिन !! (१८ मार्च )

 

!! वीर वामनराव जोशी जन्मदिन !!
    (१८ मार्च )



वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी) जन्म :  १८ मार्च १८८१ मृत्यू :  ३ जून १९५६ हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती.
     वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.वीर वामनराव जोशी यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन
     संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

मंगळवार, १६ मार्च, २०२१

विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृतिदिन !! (१७ मार्च)

 

!! विष्णुशास्त्री  चिपळूणकर स्मृतिदिन !!
   (१७ मार्च)



                 विष्णुशास्त्री चिपळूणकर हे एक मराठी लेखक होते, ज्यांचे लिखाण आधुनिक मराठी गद्य शैलीवर निर्णायक प्रभाव टाकत होते. ते लेखक व अभ्यासक कृष्णाशास्त्री चिपळूणकर यांचे पुत्र होते .
                   विष्णुशास्त्री यांचा जन्म पुणे येथे  चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.ते पुणे येथील डेक्कन कॉलेजमधून  बी. ए. झाले.काही काळ त्यांनी सरकारी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी  गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांच्यासमवेत  केसरी  आणि मराठा या वर्तमानपत्रांची स्थापना केली .पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ते सह-संस्थापक देखील होते .देशप्रेमाने  प्रेरित होणारे नागरिक तयार करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता.त्यांचे निधन आजच्याच दिवशी १८८२ रोजी झाले.
      विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
           संकलक: राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८




सोमवार, १५ मार्च, २०२१

!! सरन्यायाधीश पी.बी.गजेंद्रगडकर जन्मदिन !! (१६ मार्च )

 

!! सरन्यायाधीश पी.बी.गजेंद्रगडकर जन्मदिन !! (१६ मार्च )



प्रल्हाद बालाचार्य गजेंद्रगडकर  जन्म:१६ मार्च  १९०१ सातारा,मृत्यू: १२ जून  १९८१ हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. यांनी फेब्रुवारी, १९६४ पासून मार्च १९६६ रोजी निवृत्त होईपर्यंत सरन्यायाधीशपद भूषविले. न्यायव्यवस्थेत केलेल्या बहुमोल कामगिरीबद्दल १९७२ साली भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
       सरन्यायाधीश पी.बी.गजेंद्रगडकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक: राजेंद्र पवार
     ९८५०७८११७८

रविवार, १४ मार्च, २०२१

जागतिक ग्राहक दिन !!(१५ मार्च )

 

!! जागतिक ग्राहक दिन !!(१५ मार्च )   





                ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा. आजच्या जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे. ग्राहक हा बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू आहे. पण अनेकदा एक वस्तू खरेदी करा आणि दुसरी मोफत मिळवा, अमुक खरेदीवर सोने चांदीचे नाणे मोफत मिळेल, चेहरा ओळखा आणि लाखांची बक्षिसे जिंका, भाग्यवान विजेत्यांना कार मिळेल, अशा जाहिराती दाखवून ग्राहकांची फसवणूक केली जाते. त्यामुळे ग्राहकांनो, वस्तू खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता ही तिच वस्तू असल्याचं नीट पारखून घ्या. 
            'इथं' तक्रार करा
           ग्राहक संरक्षण कायदा १९८६ नुसार ग्राहकांना वस्तू निवडणे, त्याची गुणवत्ता आणि दर्जा याचं प्रमाण जाणून घेण्याचा अधिकार आहे. आणि ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी जिल्हा ग्राहक मंच, ग्राहक न्यायालय आणि जिल्हा तक्रार निवारण ही प्रणाली राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहे.  
            ऑनलाईन वस्तूंची खरेदी करताना ग्राहकांनी सावधानता बाळगायला हवी. फसवणूक झाल्यास ग्राहकांनी ग्राहक न्यायालय किंवा जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी. आता रेरा कायदाही अमलात आला आहे. आणि जागतिकीकरण स्पर्धात्मक युगात ग्राहकांसाठी हा दिन साजरा होणे गरजेचं आहे. 
         म्हणून साजरा होतो ग्राहक दिन 
            ग्राहकांना सेवा पुरवताना होणाऱ्या हलगर्जीपणामुळे १९६० मध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीमध्ये ग्राहक चळवळीचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन. एफ. केनेडी यांनी ग्राहकांच्या प्रश्नांचे निवारण करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलं आणि याबाबत जागतिक स्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्याला युनेस्कोकडूनही मान्यता मिळाली. त्यानुसार दरवर्षी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून पाळला जातो.
      वस्तू खरेदी करताना 'ही' काळजी घ्या.
१)फसव्या जाहिरातींना बळी पडू नका.
२)वस्तू खरेदी करताना एम.आर.पी पेक्षा जास्त रक्कम देऊ नका.
३)वस्तूंची खरेदी करताना बिल मागणे हा
  ग्राहकांचा अधिकार आहे.
४)सोने खरेदी करताना हाॅलमार्ककडे लक्ष द्या.
५)डबाबंद खाद्य पदार्थांची व्यवस्थित पाहणी करा.
६)वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट
   तपासा.
७)पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य तपासा आणि त्यानंतरच पेट्रोल भरा.
८)ऑनलाइन खरेदी करताना सजग राहा.
९)वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.
                ग्राहकांना संरक्षणाचा, माहिती मिळवण्याचा, निवड करण्याचा अधिकार ग्राहकांना आहे. अनेकदा खरेदी करतांना किंवा सर्विसेसचा वापर करतांना ग्राहक बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि याचाच फायदा विक्रेते घेतात. त्यामुळे 'जागो ग्राहक जागो'.

संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

शनिवार, १३ मार्च, २०२१

सुरेश भट स्मृतिदिन !! (१४ मार्च)

 

!! सुरेश भट स्मृतिदिन !!  (१४ मार्च)



सुरेश भट जन्म:१५ एप्रिल १९३२
       मृत्यू:१४ मार्च २००३
                  सुरेश भट हे मराठीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला. त्यामुळे त्यांना 'गझल सम्राट' असे मानाने संबोधले जाते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्याचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
              सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. बी.ए. ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले. अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फुटपाथवर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या.
                 त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर,आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.
  सुरेश भट यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

संकलक : राजेंद्र पवार
      ९८५०७८११७८


शुक्रवार, १२ मार्च, २०२१

नाना फडणवीस स्मृतीदिन !! (१३ मार्च )

 

!!नाना फडणवीस स्मृतीदिन !!
    (१३ मार्च )




  नाना फडणवीस जन्म:१२ फेब्रुवारी १७४२ मृत्यू:१३ मार्च १८००
            नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणविशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.
             आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.
                  थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा रुळावर आणली आणि दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. सवाई माधवराव पेशव्यांच्या अपघाती निधनानंतर सात-आठ महिने नानांनी तुरुंगवासही भोगला. पुढे आजारपणात१३ मार्च १८०० रोजी त्यांचा अंत झाला.  मेणवली ता.वाई येथे नाना फडणीसांचा वाडा आजही आहे.या वाड्याला भेट देण्याचा योग वर्णे येथील राजकुमार काळंगे यांच्यामुळे आला होता. पुण्यातही नानावाडा आहे.नाना फडणवीस यांना स्मृतिदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
   संकलक: राजेंद्र पवार
        ९८५०७८११७८

गुरुवार, ११ मार्च, २०२१

!! यशवंतराव चव्हाण जन्मदिन !! (१२ मार्च)

 

   !!     यशवंतराव चव्हाण जन्मदिन !!
   (१२ मार्च)


  यशवंतराव चव्हाण जन्म:१२ मार्च १९१३   मृत्यू:२५ नोव्हेंबर १९८४
     यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. “युगांतर”, “सह्याद्रीचे वारे”, “कृष्णाकाठ”, “ऋणानुबंध” ही त्यांची साहित्यसंपदा आहे.   
                   यशवंतराव चव्हाण
  महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री
१९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. १९६२ मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान    पंडित नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्रीपदावर केली. हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, 
परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (१९७७-७८) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या .
             यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.
           यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे. म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीचा एक ते दोन टक्के जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनुत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीखाली आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजेत. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
               यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. म्हणून विकास योजना आखताना अविकसित विभागांचा आधी विचार केला पाहिजे. ग्रामीण औद्योगिकीकरणाबाबत ते म्हणतात की, ग्रामीण भागात उद्योग सुरु करून शेती आणि उद्योगांची सांगड घातली जावी. शहरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची सांगड घालून शहरांकडे धाव घेणारा श्रमिकांचा लोंढा थोपविता येईल. औद्योगिक विकासासाठी नियोजन महत्वपूर्ण आहे. देशाचा संतुलित आर्थिक विकास व्हावा यासाठी ते औद्योगिक विकासाच्या मास्टर प्लानची कल्पना मांडतात. अविकसित भागात विकासासाठी त्यांनी संयुक्त औद्योगिक क्षेत्राची कल्पना मांडली. याशिवाय, राष्ट्राच्या आर्थिक विकासासाठी ते सहकाराचा पुरस्कार करतात. भारतासारख्या कृषिप्रधान देशाच्या विकासासाठी सहकारी तत्वे फार उपयुक्त ठरतात.
   यशवंतराव चव्हाण यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
संकलक: राजेंद्र पवार
            ९८५०७८११७८

बुधवार, १० मार्च, २०२१

महाशिवरात्री !! (११ मार्च)

 

!! महाशिवरात्री !! (११ मार्च)




महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक प्रमुख सण आहे. हा सण  शिव शंकराच्या  सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जातो.महाशिवरात्री ही शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची रात्र.या दिवशी   लोक उपवास करतात.  जीवनात आणि जगात अज्ञान अंधकार आहे त्यावर मात करणे महत्वाचे आहे. या दिवशी प्रार्थना, व्रत,दान, क्षमा,  प्रामाणिकपणा, इतरांना दुखापत न करणे याबाबीना विशेष महत्त्व दिले जाते.
       महाशिवरात्रीदिवशी लोक शिवमंदिराला भेट देतात. सातारा शहरापासून अगदी जवळ फक्त ८ कि. मी.अंतरावर देगाव (पाटेश्वर) येथे भव्य शिवमंदिर आहे तेथे एकदा तरी भेट द्यावयास हवी असे वाटते.
        संकलक : राजेंद्र पवार
         ९८५०७८११७८

मंगळवार, ९ मार्च, २०२१

बाळासाहेब देसाई जन्मदिन !! (१० मार्च )

 

!! बाळासाहेब देसाई जन्मदिन !!
  (१० मार्च )




दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई जन्म : १० मार्च १९१० मृत्यू: २४ एप्रिल १९८३ महाराष्ट्राचे माजी मंत्री व लोकनेते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील विहे ता. पाटण येथे झाला. ते दीड वर्षांचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडील श्रीपतराव अशिक्षित असल्यामुळे व घरच्या गरिबीमुळे लहानपणापासूनच त्यांना प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जावे लागले. यातून मार्ग काढण्यासाठी ते कोल्हापुरात आले. तेथे वसतिगृहात राहून शिक्षण घेता येईल, असे त्यांना वाटले; परंतु सुरुवातीला त्यांना तेथे प्रवेश मिळाला नाही. तेव्हा त्यांनी दवाखान्यातील झाडलोट व इतर मिळेल ती कामे स्वीकारून आपले शिक्षण सुरू ठेवले. इंग्रजी चौथीच्या परीक्षेत १५० विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळे त्यांना प्रिन्स शिवाजी वसतिगृहात प्रवेश मिळाला. एल. एल. बी. होईपर्यत ते तेथेच राहिले. करवीर पीठाचे क्षात्रजगद्गुरू सदाशिव पाटील यांचे बंधू दाजीराव यांची कन्या बानुताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला (१९३०).
        बाळासाहेबांनी १९३७-४० मध्ये कराडमध्ये वकिलीचा व्यवसाय केला. पुढे ते सातारा जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य (१९३९) आणि अध्यक्ष झाले (१९४१-५२). बोर्डाची आर्थिक स्थिती ढासळलेली असताना सरकारी मंजुरीच्या अपेक्षेवर काढलेल्या ५५ शाळा व ३८८ शिक्षकांचा प्रश्न त्यांनी कौशल्याने सोडविला. याशिवाय सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना अमलात आणणारे मुंबई प्रांतातील सातारा जिल्हा लोकल बोर्ड हे पहिले बोर्ड ठरविले.
                द्विभाषिक मुंबई राज्यात यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री व बाळासाहेब बांधकाम खात्याचे कॅबिनेट मंत्री झाले (१९५७-६०). त्यांनी या खात्याचा बारकाईने व तौलनिक अभ्यास केला. ज्यावेळेस अर्थसंकल्पात रस्ते खर्चासाठी सोळा कोटींमधील फक्त दोन कोटी महाराष्ट्रासाठी व चौदा कोटी गुजरातसाठी ठेवले गेले, तसेच गुजरातमधील पाटबंधारे कालव्यांची (कॅनॉल्स) कामे शोभीवंत फरशी (टाइल्स) बसवून करण्याचे ठरले, तेव्हा हा महाराष्ट्रावर होणारा अन्याय त्यांनी कणखरपणे पुराव्यांसह मांडला. परिणामी महाराष्ट्रातील रस्त्यांसाठी चौदा कोटी रु. तसेच इतर योजनांवरही खर्च करण्याचा निर्णय झाला. मुंबई-गोवा हमरस्ता, भुईबावडा व करूळसारखे घाट रस्ते, किल्ले व खेड्यांकडे जाणारे रस्ते, पूल, कालवे इ. कामे त्यांनी केली. कोयना धरण योजनेला आर्थिक, प्रशासकीय, मनुष्यबळ इ. सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
        महाराष्ट्र राज्याचे पहिले शिक्षणमंत्री असताना त्यांनी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले (१९६०-६२). ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. १२०० च्या आत आहे, अशा आर्थिकदृष्ट्या मागास पालकांच्या मुलांना सर्व शिक्षण मोफत देण्याची योजना (ई. बी. सी.) त्यांनी १३ जून १९६० रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली. शिक्षण घेताना गरिबी आड येऊ नये, हा या योजनेचा हेतू होता. कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. याशिवाय त्यांनी सैनिकी, तांत्रिक ग्रामशिक्षणास महत्त्व दिले. प्राथमिक व माध्यमिक शाळा खेड्यापाड्यांत, तंत्रशिक्षणाच्या शाळा जिल्ह्याजिल्ह्यांत सुरू केल्या.
                     कसेल त्याची जमीन या दृष्टिकोनातून कृषी खात्याचे मंत्री असताना त्यांनी शेती सुधारणेच्या योजना कार्यान्वित केल्या (१९६२-६३). शेतीसाठी बडींग योजना, विहीर खोदाई, पाणी उपसण्यासाठी तगाईवर इंजिन देणे, नव्या जातीच्या पिकांचे संशोधन, अन्नधान्ये, कडधान्ये, फळबाग व नगदी पिके वाढविणे, देविराज लांब धाग्याच्या कापसाची योजना इत्यादींमधून त्यांनी शेतकऱ्यांना फायदा करून दिला. कृषी, पशुसंवर्धन पदवीधरांची वेतनश्रेणी वाढवून अभ्यासू व कर्तव्यदक्ष लोक कृषी खात्याकडे वळविले. तसेच त्यांनी कोल्हापूर येथे कृषी महाविद्यालयाची स्थापना केली (जून १९६३).
            १९६३ ते १९६७ या काळात बाळासाहेब गृहमंत्री झाले. त्यांनी मधुसूदन गोळीबार, औरंगाबाद स्फोट इत्यादी प्रकरणांत विघातक शक्तींना कठोर शासन दिले. पुणे, नागपूर, औरंगाबाद अशा नव्या पोलीस आयुक्तालयांची निर्मिती केली. पोलीस निवासव्यवस्था, पोलीस उपनिरीक्षकांच्या जागा वाढविल्या. महसूल खात्याचे मंत्री असताना (१९६७-७०) कुळ कायद्याची अंमलबजावणी, धान्योत्पादनाच्या विविध योजना, जमीनधारकांना खाते पुस्तकांचे वाटप, आधुनिक पद्धतीने शेती, शेतीशिक्षण व संशोधनावर भर, कोल्हापूर येथे महसूल न्यायालयाची स्थापना, नवा जमीन महसूल कायदा व ६०० वाड्यांचे स्वतंत्र महसूली गावांत रूपांतर हे त्यांचे निर्णय महत्त्वपूर्ण होते. प्रशासनामध्ये दरारा व कडक शिस्त निर्माण करणारे ‘लोकमंत्री’ म्हणून त्यांची ख्याती होती.
          ११ डिसेंबर १९६७ रोजी कोयना परिसर भूकंपाने हादरून गेला. यावेळी भूकंपग्रस्तांना सर्व प्रकारचे साह्य करून शासकीय मदत मिळवून दिली. पाटण परिसरात  विविध संस्था, कार्यालये, रस्ते, सहकारी साखर कारखाना, कोयना एज्युकेशन सोसायटी, माध्यमिक शाळा व महाविद्यालय इत्यादींची उभारणी केली. तर कोल्हापूर येथील भुयारी गटार योजना, एस. टी. स्थानक, गुळ संशोधन केंद्र, जोतिबा डोंगरावर सुविधा, रस्ते, धरण इमारती, सरकारी कार्यालये इत्यादींची उभारणीत योगदान दिले.
          बाळासाहेबांनी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया व शिवाजी पार्क या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळे उभे केले. मल्लविद्या व तमाशा या कलांना त्यांनी प्रोत्साहन दिले. कुस्ती परिषदेचे ते अध्यक्ष होते. परिषदांना अनुदान, पैलवानांना बक्षिसे व मानसन्मान, कुस्ती प्रशिक्षण, कुस्ती पंचांची शिबिरे इ. माध्यमांतून त्यांनी कुस्ती कलेचा विकास साधला. कुस्तीच्या मैदानावरील करमणूक कर त्यांनी रद्द केला. त्यांच्या प्रयत्नामुळे तमाशाचा जाचक करमणूक कर माफ झाला. बाळासाहेब उच्च अभिरुचीचे रसिक होते. साहित्य, नाटक, संगीत इत्यादींमध्ये  त्यांना स्वारस्य होते.
मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराज देसाई राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थराज्य मंत्री आहेत. बाळासाहेब देसाई यांच्याप्रमाणेच सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी  ते प्रयत्नशील आहेत.त्यांच्या प्रयत्नामुळे पाटण येथे पोलीस प्रशिक्षण केंद्र होणार आहे त्यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
     बाळासाहेब देसाई यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
     संकलक : राजेंद्र पवार
       ९८५०७८११७८

                                                                                                                                                                                  

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...