!! जागतिक जलदिन !! (२२ मार्च )
जलसाक्षरता --काळाची गरज
पाणी हा मानवी जीवनातील मूलभूत घटक आहे. वाढती लोकसंख्या, बदलते निसर्गचक्र,पावसाची अनियमितता इत्यादीमुळे गेल्या काही वर्षात अनेक देशांमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. भारतात देखील आगामी भविष्यकाळात तीव्र पाणीटंचाईची समस्या जाणवणार हे भारतातील जलउद्योगांच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
भारत हा नैसर्गिक साधनसंपत्तीची विपुलता असलेला देश आहे. भारतातील नद्यांना पावसापासून पाणी मिळते. उपलब्ध झालेले पाणी अडवून त्याचा काटेकोरपणे वापर करणे आवश्यक आहे. छोटे छोटे बंधारे,कालवे,शेततळी बांधणे, जलपुनर्भरण करणे,पाण्याचा पुनर्वापर, जलप्रदूषण कमी करणे,उद्योगातील सांडपाण्यावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करणे,इत्यादी उपायातून आपणास योग्य जलव्यवस्थापन करता येते.
आपण आपल्या वैयक्तिक गरजेसाठी पाण्याचा वापर करताना पाणी वाया जाणार नाही व कमीतकमी वापर असा नियम करुन घेतला तरीही पाणीटंचाईच्या समस्येवर मात करता येऊ शकेल.जलव्यवस्थापनासाठी समाजात प्रबोधन करणे ही काळाची गरज आहे.
संकलक : राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा