!!रावरंभा या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची घोषणा !! (२९ मार्च)
आज २९ मार्च, वर्णे गावचे भूमिपुत्र, टॉपगिअर ट्रान्समिशनचे संचालक, वासल्य फौंडेशनचे अध्यक्ष, धार-पवार घराण्याचे पश्चिम महाराष्ट्र संघटक शशिकांत पवार यांचा वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल प्रितीमध्ये मर्यादित लोकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
शशिकांत पवार (अण्णा) यांच्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून "रावरंभा" या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची घोषणा करण्यात आली. शशिकांत पवार या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत. या चित्रपटाची संहिता स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांनी लिहिली आहे. आज चित्रपटात काम करणारे सर्व कलाकार उपस्थित होते. वर्णे -आबापुरी येथील श्री काळभैरवनाथ देवस्थानचे शिवकळा अधिकारी श्रीप्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते कळ दाबून "रावरंभा"या ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमासाठी चित्रपट निर्माते मानसिंग पवार यांच्यासमवेत मी उपस्थित होतो. भाऊसाहेब पवार, श्रीकांत पवार यांच्या परिवारावर प्रेम करणारे, चित्रपट व्यवसायाशी संबंधित बरेच लोक या कार्यक्रमास उपस्थित होते.
टॉपगिअर परिवाराने यापूर्वी अनेक क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्येही त्यांना आई जगदंबेच्या कृपेने भरभरुन यश येईल यात संदेह नाही.
नवीन व्यवसायातील पदार्पणाच्या तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने शशिकांत पवार यांना पुन्हा एकदा शुभेच्छा.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा