!! शहीद रन !!(२३ मार्च )
आज २३ मार्च, शहीद दिन या दिवसाचे औचित्य साधून शहीद रनचे आयोजन करण्यात आले होते. आज मी फक्त १० कि. मी.च्या स्पर्धेत भाग घेतला होता.
स्पर्धेचा रुट वर्णे-अपशिंगे असाच होता.स्पर्धेचा प्रारंभ वर्णे हायस्कूलपासून करण्यात आला. आज मी ही स्पर्धा००.५३.५४ (त्रेपन्न मिनिटे चोपन्न सेकंदात) पूर्ण केली. या स्पर्धेच्या माध्यमातून शहिदांना आदरांजली वाहिली जाते. यासाठी रूट सपोर्ट दादासो सुतार यांनी दिला.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले आहे. या सर्वामध्ये शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे बलिदान कधीच विसरण्यासारखे नाही. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना लाहोरच्या तुरुंगात फाशी देण्यात आले म्हणून हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाच्या निमित्ताने हौतात्माच्या त्यागाला सलाम केला जातो.
आपला देश एकसंघ राहण्यासाठी आपण सर्वजन प्रयत्न करुया. देशाच्या ऐक्याचा प्रयत्नच शहिदांना आदरांजली ठरेल असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा