शनिवार, १३ जुलै, २०२४

!! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस तेरावा १२ जुलै)

 !! पाऊले चालती पंढरीची वाट (दिवस तेरावा १२ जुलै)

               आमचा कालचा मुक्काम ज्ञानदीप कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नातेपुते शाखेत होता. ज्ञानदीप आणि शिवकृपा या महाराष्ट्रातील दोन मोठ्या संस्था. या दोन्ही संस्थामधील संबंध खूप जिव्हाळ्याचे, याचा काल पुन्हा एकदा प्रत्यय आला. ज्ञानदीपच्या भेटीला शिवकृपा असे समजून शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई या संस्थेचे अध्यक्ष गोरख चव्हाण, ज्येष्ठ संचालक शिरीष देशमुख, संचालक राजेंद्र पवार, संचालक संतोष चव्हाण या सर्वांचा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. या संस्थेचे ठेव प्रतिनिधी श्रीयुत बर्वे यांनी आमच्या स्नेह भोजनाची उत्तम व्यवस्था केली होती.


                आज साडेसहा वाजता पालखी सोहळा मार्गस्थ झाला. सकाळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोक माऊलींचे स्वागत करीत होते. माऊली, माऊली असा जयघोष होत होता. आज सकाळी माउलींनी मांडवे गावी विसावा घेतला. रस्त्यांची कामे झाल्याने जुनी ठिकाणे आम्हास सापडत नव्हती. दुपारचे भोजनाचे, विश्रांतीचे ठिकाण शोधताना आमची दमछाक झाली पण तिथे पोहोचताच आमचा थकवा दूर झाला. प्रा. प्रशांत कुंभार यांनी केलेली आमची सेवा चिरंतन स्मरणात राहण्यासारखी होती. याच ठिकाणी कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय बडदे यांची भेट झाली. वयाच्या चाळीशीनंतर त्यांनी मेडिकल चेकअप केले. डॉक्टरांनी काही औषधे सुचवली. औषधाच्या रिअँक्शनमुळे दृष्टीवर परिणाम झाला. कायमचे अंधत्व आले. योग्य उपचार झाले नाही तर शरीरावर अतिशय वाईट परिणाम होतो हे आज दिसून आले.

           आज दुपारी वारी मार्गावरील पहिलेच गोल रिंगण सदाशिवनगर येथे झाले. रिंगणात पालखी येत असताना अतिशय वाजत गाजत येते. दिंड्या टाळ, मृदंगाच्या तालावर गोल रिंगनात प्रवेश करत होत्या. पालखी  रिंगणात उभारलेल्या शामियान्यात स्थिरावली. सुरुवातीला सेवेकरी असणाऱ्या व्यक्तींनी पाच फेऱ्या मारल्या. याठिकाणी रीले खेळ प्रकाराची आठवण झाली. माऊलींचे अश्वानी प्रदक्षिणा मारताच, त्याच्या पायाखालील धूळ लोक आपल्या मस्तकी लावत होते. माऊलीप्रती असणारी श्रद्धा याठिकाणी व्यक्त होत होती.

              माऊलीचा अश्व रिंगणात आला असताना किंवा रस्त्यावरून चालत असताना लोक श्रधे पोटी त्याला स्पर्श करत असतात. पण शेवटी हा प्राणी आहे. त्याला त्रास झाल्यावर त्याचा प्रताप तो दाखवतो.

       ही वारी निर्मळ व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्न करत असते. रांगोळीच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचा अनेक ठिकाणी प्रयत्न झाला. यामध्ये विशेषत वृक्षारोपणाचे महत्व विषद केले. झाडापासून आपणास ऑक्सीजन मिळतो. पुरेशी वृक्ष छाया नसेल तर ऑक्सीजन कसा मिळणार. ऑक्सीजनचे महत्व कोरोना काळात आपणास चांगलेच समजले आहे. भविष्याचा धोका ओळखून आपण अधिकाधिक झाडे लावूया आणि ती जगवूया.

     राजेंद्र पवार 

   संचालक, शिवकृपा सहकारी पतपेढी लिमिटेड,मुंबई

९८५०७८११७८

 ८१६९४३१३०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...