रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

६० वर्षावरील वयोगटात तिसरा क्रमांक - बारामती पॉवर मॅरेथॉन २०२३ !! (२६ नोव्हेंबर )

             आज बारामती स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या विद्यमाने बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. ही मॅरेथॉन ५, १०, २१ व ४२ किलोमीटरसाठी होती. यामध्ये मी फूल मॅरेथॉन म्हणजेच ४२ किलोमीटरमध्ये भाग घेतला होता. आज मी ही स्पर्धा ४:१९:१७ चार तास एकोणीस मिनिटे आणि सतरा सेकंदात पूर्ण केली.आज माझा ६० वर्षावरील वयोगटात तिसरा क्रमांक आला. मला सन्मानचिन्ह, रोख पारितोषिक व पदक देऊन सन्मानित करण्यात आले. ही मॅरेथॉन प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉन सारख्या आंतरराष्ट्रीय  स्तरावरील पात्रता निकष म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे.



              बारामतीच्या मॅरेथॉनमध्ये २८ राज्यातील धावपटूनी सहभाग घेतला होता.या मॅरेथॉनसाठी बारामती नगरी सज्ज झाली होती. ठिकठिकाणी स्वागतकमानी व स्वागत फलक  उभारले होते. जणूकाही सगळी नगरी स्वागतासाठी सज्ज होती. ही स्पर्धा पहाटे ४ वाजता आनंद पाटील आयर्नमॅन सतीश ननावरे, सुफिया खान, सादिया सय्यद यांनी फ्लॅग ऑफ करून स्पर्धेस प्रारंभ केला. 



               आज २६ नोव्हेंबर, आजच्याच दिवशी २००८ साली पाकिस्तानी आतंकवाद्यानी मुंबईवर हल्ला केला होता. त्यामध्ये निष्पाप नागरिकांचा तसेच पोलीस अधिकारी अधिकारी अशोक कामटे, विजय साळसकर, संदीप  उन्नीकृष्णन, हेमंत करकरे, तुकाराम ओंबळे यासारख्या अधिकाऱ्यांचा बळी गेला होता. या सर्वांनाच स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आदरांजली वाहिली. 

                या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी राज्याचे  क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, आय.पी.एस. अधिकारी कृष्ण प्रकाश, ऑक्सीरीच ब्रँडचे प्रमुख पुनीत बालन, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, यांची विशेष उपस्थिती होती. या स्पर्धेच्या निमित्ताने आमचे आदरातिथ्य शिवकृपा पतपेढीचे संचालक रमेश चव्हाण यांनी केले. तसेच यावेळी शिवकृपाच्या निरा व बारामती शाखेस भेट दिली.

                   आज माझ्यासमवेत साताऱ्यातील अल्मास मुलाणी मॅडम होत्या. त्यांनाही महिलांच्या कॅटेगरीमध्ये बक्षीस मिळाले. नियमित व्यायाम करुन सर्वांनीच आपले आरोग्य सांभाळावे असे वाटते.

     राजेंद्र पवार

   ९८५०७९११७८

    ८१६९४३१३०६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...