!! वारी पंढरीची २०२२ !! ( दिवस पाचवा २५ जून )
आज सासवडमध्ये माऊलीचा विश्रांतीचा दिवस ,माऊलीच्या आगमनानंतर प्रस्थान होईपर्यंतच्या कालावधीत भागातील भाविकभक्त ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी साधारण अर्धा किलोमीटरची रांग होती. संपूर्ण सासवड नगरीस यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.
देवदर्शनाबरोबर संसारपयोगी वस्तू भाविक खरेदी करताना दिसत होते. सासवड हे सोपानकाकांचे समाधी स्थान, या समाधी स्थळाला भाविकांची भेट ठरलेली असते. आमचा तरी त्याला कसा अपवाद असेल. कऱ्हेच्या काठवरचे हे समाधी स्थळ भाविकांचे खऱ्या अर्थाने प्रेरणास्रोत आहे. आजच ज्ञानेश्वरांचे बंधू सोपानदेव महाराज यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. ज्ञानेश्वर माऊली व सोपानदेव या दोन पालख्यांची भेट भंडीशेगावजवळ होते.या बंधुभेटीचा सोहळा विलोभनीय असतो.
या समाधी स्थळाजवळ अनेक भाविक वाद्यांच्या तालावर फुगड्या तसेच नृत्य करताना दिसत होते.आज आम्ही सासवडमधील आमच्या स्नेही मंडळींच्या भेटी घेऊन जुन्या स्मृतींना उजाळा दिला. सासवडला येण्यासाठी मोठी दमझाक झालेली असते त्यामुळेच या नगरीत बरेच मेडिकल कॅम्प दिसून येत होते. प्रत्येक कॅम्पमध्ये आजारी असणारे वारकरी वैद्यकीय सुविधा घेताना दिसत होते. मला तर त्या वैद्य,परिचारिका आणि सपोर्टवीह स्टाफमध्ये पांडुरंगाचे रुप दिसत होते. खऱ्याअर्थाने रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा होय असे वाटते.
आपणही जनसेवा करावी. असे म्हटले जाते "Service to man is to service to God".चला तर आपणास शक्य होईल तेवढी जनसेवा करुया.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा