!! आमची नर्मदा परिक्रमा !! ( १०० )६ मार्च
आमचा कालचा मुक्काम नरसिंहपूर जिल्ह्यातील गुडवारा या गावात होता. आम्ही आज सकाळी लवकर चालण्यास सुरुवात केली. पहिल्या ५ किलोमीटरमध्येच घाट पिपरिया हे गाव लागले. तेथील शिव मंदिरात मोठे शिवलिंग आहे. तेथून आम्ही कॅनॉलच्या रस्त्याचा स्वीकार केला. नरसिंहपूर जिल्हा गुऱ्हाळासाठी प्रसिध्द आहे. ठिकठिकाणी आपणास गुऱ्हाळघरे पाहण्यास मिळतात. इमलिया गावात राजकुमार पटेल यांच्या गुऱ्हाळ घरास भेट दिली. तेथे आम्ही ऊसाचा रस घेतला.
आज मार्गात घुगरी, पिपरिया, इमलिया, उमरिया, ग्वारी(सगुण घाट ) ही महत्वाची गावे लागली. आज आम्ही नेमानगर कालका घाट येथे थांबलो आहोत. याठिकाणी मोठी गोशाळा आहे. सगुण घाट येथे शेर आणि नर्मदा नदीचा संगम आहे. या संगमावर आम्ही स्नानाचा आनंद लुटला. शेर नदी ओलांडून जाण्यासाठी बोटीचा आधार घ्यावा लागला. वाटेत अनेक लोक परिक्रमावासीयांचे आदरातिथ्य करतात. उन्हाचा चटका लागत असल्याने आम्ही ताक मिळते आहे का याचा विचार करत होतो. तोपर्यंत आम्हाला उमरिया गावात मदन चौरासिया यांनी ताक देऊन खऱ्या अर्थाने थंड केले.
नर्मदा किनाऱ्यावर अनेक गोशाळा आहेत. गोशाळेत असणाऱ्या गायींची स्थिती जरा बरी आहे. मोकाट जनावरेही पाहायला मिळतात. विशेषतः देशी गायींची आपण सर्वांनी मिळून काळजी घेतली पाहिजे. गोशाळा गोवंश टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. आपण आपल्या घरीही गाय पाळली पाहिजे तसेच गोशाळांना मदतही केली पाहिजे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा