मंगळवार, ८ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०१ )७ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१०१ )७ मार्च 

                 आमचा कालचा मुक्काम कालका घाटावर होता. हा घाट बरमान घाटापासून अगदी जवळ आहे. सकाळी लवकरच सुरजकुंड जवळ आलो.

सुरजकुंडबद्दल तुम्हाला माहिती सांगितलीच पाहिजे......

             सुरज कुंड बरमान घाटाजवळ आहे. या तलावाविषयी असे म्हटले जाते की या तलावात स्नान केल्याने सर्व प्रकारचे त्वचारोग दूर होतात. या तलावात आंघोळीसाठी लांबून लोक येतात. या कुंडांना धार्मिक महत्त्वासोबतच ऐतिहासिक महत्त्वही आहे. हे कुंड पांडवांनी बांधले होते असे म्हणतात. पांडवांनी एकदा येथे नर्मदेचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले. पण ते त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होऊ शकले नाहीत, त्याचा परिणाम म्हणून त्यांनी येथे कुंड बांधले. सुरजकुंडजवळ महारुद्र व होमहवनसाठी मंडप उभारलेला आढळून आला. येथे दरवर्षी ११ दिवस महारुद्र व होमहवनचे आयोजन केले जाते. होमहवनसाठी १०८ जोड्या असतील असे नियोजन असते.







          आज दुपारचा भोजनप्रसाद अंडीया गावात घेतला. सदाव्रत आता नित्याचेच झाले आहे. सदाव्रताला सरपणासह सर्वच बघावे लागते त्यामुळे खूप थकवा येतो. दुपारनंतर आम्ही पूर्णपणे नदी किनाऱ्यावरून चाललो. नदी किनाऱ्यावरून चालणे एक मोठी कसरतच आहे. गव्हाची पिके, त्याला स्प्रिंकलरचे पाणी, निसरडे रस्ते यातून हळूहळू चालावे लागते. आज वाटेत अंडीया, घुगरौला, पिठोरा ही महत्वाची गावे लागली. आज आमचा मुक्काम कोठीया घाटावर आहे. या ठिकाणचे हनुमान मंदिर खूपच भव्य आहे.

          हनुमान शक्तीचे, स्वामी निष्ठतेचे प्रतीक आहेत. सीतेचा शोध यामध्ये हनुमानाची भूमिका आपणास विदित आहेच. आपण एखाद्या ठिकाणी काम करतो त्या कामावरची निष्ठा असेल, वडीलधाऱ्याबद्दलची निष्ठा असेल ती खूपच महत्वाची असते. अशी निष्ठा असेल तरच आपल्या हातून चांगले काम होते. आपणास मोठे व्हायचे असेल तर आपली निष्ठा आपल्या स्वामीवर असलीच पाहिजे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...