!! आमची नर्मदा परिक्रमा !! (९६ ) २ मार्च
आमचा कालचा मुक्काम जबलपूर जिल्ह्यातील बरगी कॉलनी येथे होता. आम्हास सुरुवातीच्या सहा सात किलोमीटर नंतर जबलपूर नागपूर मार्गाने चालावे लागले. उन्हात डांबरी रस्त्याने चालणे खूपच अवघड वाटले. आम्ही लवकरच थकलो. फारसे चालावेसे वाटतच नव्हते. दुपारच्या भोजन प्रसादाचा प्रश्नच होता. आज एखाद्या हॉटेलमध्ये जेवावे असा विचार मनात आला. रस्त्याने आम्ही चाललोच होतो तेवढ्यात समोरच असणाऱ्या सागर ढाब्याचे मालक सागर यादव यांनी आम्हास बोलावले. भोजन करण्याचा आग्रह केला. आम्हाला गरज होतीच आम्ही तात्काळ होकार दिला. भोजन केले. उन्हाचा तडाखा मी म्हणत होता तिथेच थोडी विश्रांती घेऊन पुन्हा मार्गस्थ झालो. पुन्हा मार्गावर नारायणपूर गावाजवळ सकाळचीच पुनरावृत्ती झाली.
यादव फॅमिली ढाब्याचे मालक अंकित यादव यांनी आम्हास बोलवले, थंडपेय देऊन खऱ्या अर्थाने थंड केले. या परिक्रमेत हवामान बदलाचा चांगलाच अनुभव येतोय. कडाक्याची थंडी, मध्येच पावसाळा आणि आता कडक उन्हाळा सुरु झाला आहे. आज भेडाघाटाजवळील सिवनी येथे सुग्रीवप्रसाद पटेल यांच्या घरी थांबलो आहोत. आज मार्गात चौराई, निगरी, माणेगावं, तीलवारा आदि गावे लागली.
आम्ही भेडाघाटाजवळ थांबलो आहोत थोडीसी त्याबद्दल माहिती दिली पाहीजे...
भेडाघाट जबलपूर जिल्ह्यातील एक महत्वाचे शहर नर्मदा नदीच्या काठावर वसले आहे. भेडाघाट हे उच्च संगमरवरी खडकांसाठी प्रसिध्द आहे. या ठिकाणी धुंधर धबधबा ( धुरांचा प्रवाह) आहे. या स्थानाजवळ आणखी काही पर्यटन स्थळे आहेत.
आपण प्रथम आपल्या परिसरातील पर्यटनस्थळांना तरी भेटी दिल्या पाहिजेत. त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली पाहिजे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा