गुरुवार, ३ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (९५ )१ मार्च

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (९५ )१ मार्च

             आमचा कालचा मुक्काम सिवनी जिल्ह्यातील दलका या गावात होता. सुरुवातीलाच जंगलाचा भाग असल्याने आम्ही थोडं उशीराच चालण्यास सुरुवात केली. जंगलातून जाताना खूपच त्रास होत होता. जंगलातून एकेक पाऊल जपून टाकावे लागत होते. येथील जंगलात सागाचेच साम्राज्याच आहे. आपल्याकडे साग पाहायला मिळत नाही येथील लोक सरपण म्हणून सागाचाच वापर करतात. आज वाटेत गोरखपूर ,दुर्जनपूर, पनारझिर, दिवारा, साल्हेवाडा, तुनिया ही महत्वाची गावे लागली. आज आमचा मुक्काम जबलपूर जिल्ह्यातील  बरगी कॉलनी येथे आहे. बरगी धरणाचे दृश्य विलोभनीय आहे. आज महाशिवरात्री असल्याने आम्हाला दुपारचा फलाहार  मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यातील भजनलाल विष्णोई यांनी दिवारा गावात दिला.




       बरगी धरण हे नर्मदा नदीवरील महत्वाचे धरण आहे त्याची थोडीशी माहिती आपणास दिलीच पाहिजे.....

     नर्मदा नदीवर लहानमोठी अनेक धरणे आहेत. या सर्व धरणांपैकी हे एक महत्वाचे धरण आहे. या धरणाची १९७४ ला सुरुवात होऊन १९९० ला पूर्ण झाले. हे धरण जबलपूर परिसरातील पाणीपुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे. येथे अनेक सिंचन प्रकल्प असून त्यापैकी दोन मोठे प्रकल्प आहेत. याठिकाणी ९० मेगावॉट क्षमतेचा वीज प्रकल्प आहे. हे धरण  नुसतेच पर्यटकांचे आकर्षण केंद्र नसून विविध प्रकारचे पक्षीही  येथे पाहायला मिळतात. हे धरण पक्षी निरीक्षकांना एक मोठी सुवर्णसंधी आहे.

    धरणामुळे सोबतचाच परिसर विकसित होतो असे नाही तर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागाची समस्याही सुटली जाते. आपल्या सातारा जिल्ह्यापुरता विचार केला तर आपल्याकडे धरणे भरपूर आहेत पण आजही काही गावे पाण्यापासून वंचित आहेत. त्या सर्वच गावांना पाणी कसे मिळेल हे पाहीले पाहिजे काही ठिकाणी उचलून पाणी द्यावे लागले तरी ते द्यायला हवे. कोणीच पाण्यापासून वंचित राहू नये असे वाटते.

    राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८

#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...