शुक्रवार, ४ मार्च, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !!(९७ )३ मार्च

 !!आमची नर्मदा परिक्रमा !!(९७ )३ मार्च

                आमचा कालचा मुक्काम जबलपूरजवळील सिवनी येथे होता. काल भेडाघाटबद्दल थोडीसी माहिती दिली होती. या परिक्रमेत नर्मदेची विविध रुपे पाहायला मिळत आहेत. भेडाघाट जवळील नर्मदेचे दृश्य खूपच विहंगम आहे. येथे पर्यटकांची सतत गर्दी असते. या घाटापासून थोडे पुढे आल्यानंतर खचदरीमुळे नदी दिसतच नाही. येथे पर्यटकांसाठी बोटिंगची पण सोय आहे. याठिकाणी एका तटावरून दुसऱ्या तटावर जाण्यासाठी रोप वे ची सुविधा आहे. भेडाघाटपासून पुढचा प्रवास खूपच खडतर होता. जंगलातून आश्रम सापडत नव्हता.



                आज दुपारचे भोजन प्रसाद संत रेवाआश्रम अन्नक्षेत्र, सिध्दटेकडी न्यू भेडाघाट याठिकाणी घेतला. सध्या बऱ्याच ठिकाणी सदाव्रताचा अनुभव येत आहे. आज पुन्हा ती संधी मिळाली. दुपारनंतर फारसे चालता आले नाही. वाटेत बगराई नावाचे गाव लागले. येथे संगमरवरी दगडाच्या खाणी लागल्या. याच गावात काही ठिकाणी मूर्ती बनवण्याचे काम चालू होते. अनेक घरापुढे संगमरवरी दगडाचे ढीग पडलेले दिसून आले.

                जबलपूर जिल्हा वाटाणा शेतीसाठी प्रसिद्ध आहे येथून देशविदेशात वाटाणा जात असतो. एक हजारापेक्षा अधिक ट्रक माल जबलपूरहून रोज  बाहेर जात असल्याचे आम्हास सांगितले. शहर जवळ असले की भाजीपाला शेतीसुध्दा मोठ्या प्रमाणात असते त्याचा प्रत्ययही आज आला. सिमला मिरचीचा मोठा प्लॉट पाहण्यात आला. मिरची तोडणे, निवडणे, प्लास्टिक बॅगमध्ये तसेच बॉक्समध्ये पॅकिंग करणे हे सर्वच काम  चालले होते. आज थोडासा चांगला रस्ता वगळला तर बहुतांशी रस्ता आमची परीक्षा घेणारा होता. आज आम्ही  जबलपूर जिल्ह्यातील सेप्रा तालुक्यातील सगडा या गावी  मोहनलाल तिवारी यांच्या घरी थांबलो आहोत.








        एखाद्या गौण खनिजामुळे गावाला पूरक व्यवसायाची जोड मिळते त्यातून त्यांचा आर्थिक स्तर उंचावतो. आपल्या परिसराचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी उपलब्ध परिस्थितीचा फायदा करुन घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.

   राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८

#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

1 टिप्पणी:

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...