मंगळवार, १ मार्च, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा ! (८९ )२३ फेब्रुवारी

 !! आमची नर्मदा परिक्रमा ! (८९ )२३ फेब्रुवारी

             आमचा कालचा मुक्काम सुनियामार येथे होता. तेथे रितेशकुमार मिश्रा सेवा देत आहेत. पाण्याची सुविधा अगदी जवळ असल्याने आम्ही नेहमीचे सोपस्कार पार पाडून लवकर चालण्यास सुरुवात केली. आम्हाला दुपारपर्यंत डींडोरी येथे यावयाचे असल्याने वाटेत फारसे थांबता आले नाही. डींडोरी येथे उद्योजक श्रीकांत पवार यांचे स्नेही  शक्ती छत्रे यांच्या माध्यमातून भोजनाची सोय झाली. शक्ती छत्रे यांचे नातेवाईक हरी क्षितिजा हे डींडोरी येथील  गुजराती आश्रम चालवतात त्यांनीच आमच्या दुपारच्या भोजन प्रसादाची व्यवस्था केली होती. हरी क्षितिजा हे कनिष्क कलेक्शन हे रेडिमेड कापड दुकान चालवतात. आमच्या सोबत असणाऱ्या चव्हाण  मॅडम यांचा ड्रेस खराब झाला होता त्यांना हवा असणारा ड्रेस हेमंतकुमार छाबडा यांनी भेट दिला. खर वास्तविक आम्ही त्यांचे पैसे देत होतो त्यांनी ते घेतले नाहीत. आम्हाला एवढीच सेवा करण्याची संधी तुमच्यामुळे लाभते असे ते म्हणाले. 



        अमरकंटकपासून नर्मदा मातेचे दर्शन झाले नव्हते. आज पुन्हा एकदा नर्मदा मातेचे दर्शन झाले. आम्ही दुपारी नदीत स्नानाचा आनंद लुटला. आज वाटेत  विझोरी, खरगहना, हरा, कुंडा, डींडोरी, इमलई, रहांगी ही गावे लागली. आजचा मुक्काम सलेय्या येथे आहे. आज आम्ही ३९ किलोमीटर चाललो. आम्हीच आमचे रेकार्ड आज मोडले याचा मनस्वी आनंद होत आहे. डींडोरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. हा जिल्हा आदिवासीप्रणित आहे. आजचा संपूर्ण परिसर डोंगराळ आहे. शेतीच्यादृष्टीने विचार केला तर खूप वाईट परिस्थिती आहे. आज सकाळी बुधगावचे राजेशकुमार साहू यांनी दुधाची रबडी खावयास दिली. या परिक्रमेत अनेक साहू बंधूनी आमची सेवा केली आहे. साहू परिवार ९०% व्यापारात आहे. या समाजाची सेवाभावी वृत्ती लक्षवेधक आहे. 

     गुजराती धर्मशाळा दोन महिन्यापासून सुरु झालेली आहे. व्यापारी बंधू एकत्र आले आणि ही धर्मशाळा सुरु केली आहे. परिक्रमावासीयांची भोजन व निवास व्यवस्थेची सोय त्यांनी केली आहे. आपण जर एकत्र आलो तर फार मोठे काम होते. आपणही आपापल्या भागात एकत्र येऊन मोठी कामे करायला हवीत असे वाटते.

     राजेंद्र पवार

   ९८५०७८११७८

#narmada #narmadaparikrama #narmadariver #dindori #jivashma #shivaputri #narmadamai #narmadehar #shiva


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...