आमची नर्मदा परिक्रमा !! (८८ ) २२ फेब्रुवारी
आमचा कालचा मुक्काम डींडोरी जिल्ह्यातील करंजिया तालुक्यातील रुसा या गावी होता. याठिकाणी कडाक्याची थंडी आहे, अशा ठिकाणी रात्र काढणे हेच एक आव्हान आहे. अशाही स्ठीथित लवकरच चालण्यास सुरुवात केली. वाटेत पर्यटन विकास महामंडळाचे एक हॉटेल पहावयास मिळाले.दुपारी मोहतारा येथील आश्रमात भोजन प्रसाद मिळाला. तेथे महंत शंकरपुरी महाराज सेवा देत आहेत. आज गाडासरई येथे मोठा लाकडाचा साठा पाहायला मिळाला.
ट्रकमध्ये लाकडे चढवण्याचे काम चालू होते. असा साठा मी यापूर्वी पाहिला नव्हता. डींडोरी जिल्ह्यात वनांचे प्रमाण जास्त आहे. अनेक ठिकाणी चेक नाकेही आपणास दिसतात. शासनाच्यावतीने लाकडांचा लिलाव होत असावा असे वाटते. आजच्या मार्गात गोरखपूर, कनकधारा, मोहतारा, गाडासरई, बरगाव, बोदरगाव ही महत्वाची गावे लागली.
आमचा मुक्काम सुनियामार येथे आहे. आज आम्हाला कनकधारा येथे राज शर्मा यांनी जिलेबी तर गाडासरई येथे बलरामदास माणिकपुरी यांनी जेवणासाठी ताट व दूध दिले यांची परिक्रमावासीयांविषयीची आदराची भावना या कृतीतून व्यक्त होते.
आपल्या राज्यात पर्यटना चालना मिळावी यासाठी पर्यटन विकास महामंडळ कार्यरत आहे. राज्यात महत्वाच्या ठिकाणी एम.टी.डी. सी.सुविधा देत आहे. महाराष्ट्रातील या सुविधांचाही लाभ आपण घेतला पाहिजे. पर्यटनाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक मूल्यांना चालना मिळते. पर्यटनामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. साधारण ८% लोकांना यातून रोजगार मिळतो. राष्ट्राची संपत्ती वाढते. पर्यटनामुळे आपणास आनंदही मिळतो. २७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिवस म्हणून साजरा केला जातो. पर्यटनामुळे सामाजिक, सांस्कृतिक मूल्यांची देवाण घेवाण होते. आनंदी समाज निर्मितीसाठी पर्यटन आवश्यक आहे. यासाठीच प्रत्येक राज्य प्रयत्न करताना दिसत आहे.
आपल्या ज्ञानात भर पडण्यासाठी राज्य, देश, विदेशात आपण गेले पाहिजे यातून आपोआपच पर्यटनाला चालना मिळेल असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा