गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (८७ )२१ फेब्रुवारी

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (८७ )२१  फेब्रुवारी

      आमचा कालचा मुक्काम आरुंडी गुफा आश्रम, अमरकंटक येथे होता. येथील मुक्कामाची व्यवस्था उद्योजक श्रीकांत पवार यांचे स्नेही शक्ती छत्रे यांचेकडून झाली. अमरकंटक थंड हवेचे ठिकाण असल्याने अतिशय बोचरी थंडी होती. कडाक्याची थंडी नेमकी काय असते याचा चांगलाच अनुभव घेतला. सुरुवातीचा बराचसा भाग जंगलमय होता. उंचच उंच झाडे जणूकाही एकमेकांशी स्पर्धा करीत आकाशाकडे झेपावत असल्यासारखे वाटत होते. घाटाचा रस्ता संपल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा करंजाची झाडे लावली होती. या झाडांची सुंदर स्वागत कमान झाली होती. आज अनुपपूर जिल्ह्यातून डींडोरी जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आज दुपारी करंजिया येथे भोजन प्रसाद घेतला. बऱ्याचवेळा सदाव्रताचा अनुभव घेतला जातो. आजही ती संधी मिळाली. कपडे धुणे सुध्दा नित्याचेच झाले आहे.






 

        आज आम्ही रुसा गावात मुक्काम केला आहे. आज पुन्हा एकदा सदाव्रताचा अनुभव घ्यावा लागत आहे. आज एका वीज उपकेंद्रात सोलर पॅनल उभे केलेले दिसून आले. सोलरच्या माध्यमातून तयार झालेली वीजही ग्राहकांना वितरित होत असावी. मध्यप्रदेशात रस्त्यांचे जाळे बऱ्यापैकी विणलेले दिसले. खेडीसुध्दा पक्क्या रस्त्यांनी जोडलेली आहेत. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पक्के रस्ते तयार झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग, ग्राम मार्ग असे अनेक प्रकारचे रस्ते आहेत. मार्गाच्या प्रकारानुसार रस्त्याचा दर्जा ठरलेला आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून तयार झालेले रस्ते, त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराने करावयाची आहे. रस्त्याचे काम केल्यानंतर पाच वर्षांत टप्याटप्याने त्याचे पेमेंट ठेकेदाराला मिळणार आहे.  तसे फलक दर्शनी भागात लावले आहेत. कामाचा दर्जा चांगला ठेवला नाहीतर त्याचा ठेकेदारास त्रास होणार आहे. त्रास होऊ नये याची ते काळजी घेतात. कोणत्याही कामाची जबाबदारी निश्चित केली तर काम दर्जेदार होते. दर्जेदार कामासाठी प्रत्येक क्षेत्रात जबाबदारी निश्चित करायला हवी असे वाटते.

    राजेंद्र पवार 

   ९८५०७८११७८

#narmada #narmadamai #narmadariver #narmadaparikrama #shivaputri #shiv #satarakar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...