!! आमची नर्मदा परिक्रमा (५५) आमचा कालचा मुक्काम पिपरी येथे होता.पिपरीपासून अगदी जवळच केवळ दीड दोन किलोमीटर अंतरावर सीतामढी नावाचे ठिकाण आहे. प्रकृती बरी नसल्याने आम्ही दुपारी उशिरा निघालो. थोड्याच वेळात सीतामढी येथे पोहोचलो. हे लवकुशचे जमस्थळ असल्याचे सांगितले जाते. परंतु अधिक माहिती घेतली असता उत्तरप्रदेशात कानपुर नावाचे शहर आहे तेथून काही अंतरावर बीटूर नावाचे गाव आहे तेथेही जन्मस्थळ असल्याचे बोलले जाते. जन्मस्थळ कोणते का असेना,आपण लवकुशबद्दल थोडी माहिती घेऊया.
प्रभू रामचंद्र यांनी सीतामातेचा त्याग केला होता. त्यावेळी सीतामाता गर्भवती होत्या. त्या वाल्मिकऋषींना शरण गेल्या होत्या. वाल्मिकऋषींनी सीतामातेची काळजी घेतली होती. लवकुश यांचे संगोपन आश्रमात झाले होते. मोठे झाल्यानंतर त्यांनी प्रभू रामचंद्र यांचा अश्व अडवला होता. बाकीचा सगळा भाग आपणाला विदित आहेच. या आश्रमात मोहनदास त्यागी नावाचे महंत आहेत. यांच्या जटा पायापर्यंत आहेत. सीतामढी येथील राम मंदिरात राम, लक्ष्मण, जानकी यांच्या समवेत भरत,शत्रुघन आणि वाल्मिकी ऋषी यांच्यामुर्ती आहेत. वाटेत निमपूर नावाचे गाव लागले. तेथे इंदोर येथील वैद्यकीय प्रतिनिधी राजेशकुमार गोयल यांची भेट झाली. त्यांनी आम्हास प्रवासात आवश्यक असणारी औषधे मोफत दिली. काही आवश्यकता वाटल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले. आमचा आजचा मुक्काम बागली तालुक्यातील रतनपूर येथे आहे. रतनपूर गाव खऱ्याअर्थाने निर्मल वाटले. मनोजकुमार गोयल यांच्यामुळे ज्या क्षेत्रात आपण कार्यरत आहोत त्याचा परिक्रमावासीयांना फायदा झाला पाहिजे असा त्यांचा हेतू आहे. आपणही ज्या क्षेत्रात प्रविण आहोत त्याचा समाजाला फायदा झाला पाहिजे असे वाटते. राजेंद्र पवार ९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा