!!आमची नर्मदा परिक्रमा !! (५४ )
आमचा कालचा मुक्काम सुलगाव येथील राम मंदिरात होता. सकाळी थोडे उशीराच चालण्यास सुरुवात केली. आज संपूर्ण रस्ता जंगलाचा होता. आज आम्ही २८ किलोमीटर चाललो. पैकी २१ किलोमीटर ही नुसती जंगल पायवाट होती. राहिलेला भाग डांबरी रस्ता तोही वन विभागाच्या ताब्यात तर काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता. चेक पोस्ट असल्याने वनविभागाच्या ताब्यात असणाऱ्या रस्त्याने कोणतेही खाजगी वाहन जाऊ शकत नाही.
वाटेत कुंडी, बडेल, तराण्या ही गावे लागली. कोणतीच गावे मोठी नव्हती. गावे ही जंगलांनी वेढलेली होती. काही भागात भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणात घेतलेली दिसून आली. या भागात शेतीला वन्य प्राण्यांचा त्रास होत असावा कारण प्रत्येक क्षेत्राला कुंपण घातलेले होते. नर्मदा परिक्रमेत प्रत्येकाची काहींना काही शारीरिक तक्रार असतेच. त्यातून कोणाचीच सुटका होत नाही. मलाही त्या समस्येला सामोरे जावे लागले.
आज आमचा मुक्काम देवास जिल्ह्यातील उदयनगर तालुक्यातील पिपरी या गावी नर्मदा माता मंदिरात होता. याठिकाणची व्यवस्था खूप चांगली आहे.
बडवाहपासून पूर्ण जंगलाचा भाग लागलेला आहे. जंगलात सर्वत्र सागाची झाडे दिसत होती. आपल्या जिवनात वनांचे महत्व खूपच आहे. झाड आपल्या जन्मापासून अंतापर्यंत साथ देत असते. वृक्षांचे जतन करणे, नवनवीन वृक्षांची लागवड हे आपले कर्तव्य आहे. आपणही जेथे जेथे शक्य होईल तेथे वृक्षांची लागवड करावी असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा