शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (५७ )

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (५७ )

     आमचा कालचा मुक्काम जयंती माता सिध्दपीठ,कनेरी ता.पुनासा जि. खंडवा येथे होता. येथून आम्ही आज सकाळी ७ वाजता चालण्यास सुरुवात केली. जयंती माता ते पामाखेडी हे अंतर वीस किलोमीटरचे आहे.संपूर्ण जंगल आहे. वीस किलोमीटरमध्ये एकही गाव नाही, पिण्यायोग्य पाणी नाही. थोडक्यात हे अंतर एका दमात पार करणे गरजेचे आहे.









      वाटेत एका ठिकाणी मोठमोठ्या मशिनरीचा आवाज येत होता. मोठया पाईपलाईनचे काम चालले होते. हे काम शासकीय स्तरावरचे असावे. आपल्याकडे जशी जिहे कठापूर योजना आहे त्यापेक्षा ही योजना मोठी असावी असे वाटते. नर्मदा नदी किती लोकांचे जीवन समृध्द करते हेच यातून दिसून येते.

        मार्गात साधारण १० किलोमीटर अंतरावर हनुमानाचे छोटेखाणी मंदिर पहावयास मिळाले. तेथे आम्ही थोडा वेळ विश्रांती घेतली. तेथे आम्हाला पामाखेडी आश्रमाचावतीने अल्पोपहार मिळाला. पामाखेडी गाव राज्यमार्गावर आहे. आता जंगलाचा भाग संपला आहे.आजचा मुक्काम मा रेवा सेवा कुटीर आश्रमात आहे. आश्रम परिसर छान आहे.

   आज प्रतिकूल परिस्थितीत कशी वाटचाल करावी याचे प्रशिक्षणच मिळाले. देशात ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे, शेतीला पाणी नाही त्यासाठी नदी जोड प्रकल्प राबवणे गरजेचे आहे असे वाटते.

     राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...