शनिवार, ५ फेब्रुवारी, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (५८ )

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (५८ )

     आमचा कालचा मुक्काम खंडवा जिल्ह्यातील पामाखेडी येथे होता. आज थोडे उशीराच चालण्यास सुरुवात केली. पामाखेडी ते धरमेश्वर धाम ही दोन्हीही गावे राज्य मार्ग ४१ ला जोडणारी होती. रस्त्याच्या दुतर्फा वृक्षराजी होती. मात्र पुर्वीसारखे घनदाट जंगल निश्चितच नव्हते. जागोजागी वनसुरक्षा समितीचे फलक पहायला मिळत होते. आपल्याकडेही अशा समित्या असतात








त्यांचे कार्य आपल्या माहितीसाठी...

१)वनेआगीपासून  वाचवा. आग विझवण्यासाठी सहकार्य करा.

२)वन्य प्राणी करंट देऊन मारणे हा गुन्हा आहे. 

३) शिकार केल्याची आढळून आल्यास तीन वर्षांपर्यंत सजा होऊ शकते.

३)उन्हात झाडेच आपणास सावली देतात.

       राज्य मार्ग असला तरी फारसी वाहतूक मार्गावर वाटलीच नाही. आज दुपारी पोखर बुजुर्ग येथील धरमेश्वर धाम येथे पोहोचलो. हे पुरातन महादेव मंदिर आहे. येथेच दुपारचा भोजन प्रसाद घेतला. वेळ असल्याने कपडे धुण्याचा आनंदही लुटला.

       आज दुपारी लवकरच चालण्यास सुरुवात केली. वाटेत बांई जगवाडा हे मोठे गाव लागले. या गावात मोठी बाजारपेठ होती. येथून मात्र आमचा राज्य मार्गाचा संपर्क तुटला. बांई जगवाडापासून पुढे नामनपुर नावाचे गाव ५ किलोमीटर अंतरावर होते. दोन्ही गावाच्या दरम्यान  रस्त्याच्या दुतर्फा मोठे जाळीचे कुंपण होते. शेतात जाण्यासाठी  ठिक ठिकाणी गेट होती. सर्वत्र गव्हाची शेती होती. येथे गव्हाचे एकरी उत्पादन २०/२२क्विंटलपर्यंत निघते.हा गहू शासन खरेदी करते.

      आमचा आजचा मुक्काम टीमरस नावाच्या गावात आहे. शेतीबाबत सांगायचे म्हटले तर सलग पीकपद्धतीचा निश्चितच सगळ्यांना फायदा होतो. आपणही सर्व शेतकऱ्यांनी मिळून सलग पीक पध्दतीचा अवलंब केला पाहिजे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

    ९८५०७८११७८


 #shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...