!! आमची नर्मदा परिक्रमा !! (७७ )
आमचा कालचा मुक्काम भेडाघाट येथील जनहित जनसेवा समितीच्या जंगलातील आश्रमात होता.महाराजांनी अगदी कुटुंबियांसारखी सेवा केली. आज सकाळी जबरदस्त धुकं पडले होते. आम्ही साडेआठला बाहेर पडलो.नऊ वाजेपर्यंत वाहने लाईट लावून चालली होती.आम्ही भाऊ महाराज आश्रम तीलवारा येथे दुपारचा भोजन प्रसाद घेतला.कल्पना इंगलकर, प्रविण इंगलकर यांनी आम्हाला घरच्यासारखे भोजन दिले. नंतर पुढील मार्गक्रमण करण्यासाठी मार्गस्थ झालो. नदीकाठी सर्वत्र गाळपेर आहेच. येथे मात्र भाजीपाला पिकावर जोर असलेचा दिसून आले. जबलपूर येथे मोठे घाट आहेत. आमचा मुक्काम जिलहारी घाट येथे आहे. जबलपूर येथे भरपूर घाट आहेत. त्याचीही माहिती आपणास दिलीच पाहिजे.
ग्वारी घाट: ग्वारीघाट हे एक सुंदर ठिकाण आहे जिथे आपल्याला नर्मदा नदीचे अनेक घाट आणि जादुई वातावरण पाहायला मिळते. ग्वारीघाट हे खूप छान ठिकाण आहे ग्वारी घाटाला घाटांची मालिका आहे. आपल्याला येथे नर्मदा मैयाचे दर्शन मिळते. तिचा प्रसादही मिळतो. आम्हालाही प्रसाद मिळाला. ग्वारीघाटातील आरती सगळ्यात मोठी असते. आज याठिकाणी आम्हाला आरती प्रज्वलित करणे तसेच प्रत्यक्ष आरती ओवाळणे यासाठी संधी मिळाली. आज आम्ही कृतकृत्य झालो अशीच आमची भावना आहे.
सिद्ध घाट : ग्वारीघाटातील पहिला घाट म्हणजे सिद्ध घाट. सिद्ध घाटावर शंकराचे मंदिर पाहायला मिळाले.तिथे तुम्हाला गोमुखाचे दर्शन झाले. या गोमुखातून वर्षातील १२ महिने आणि २४ तास सतत पाणी वाहत असते. हा घाट अतिशय सुंदर आणि अतिशय सुरेख बांधलेला आहे. गोमुखाजवळ शंकरजींचे मंदिर आहे, ज्यामध्ये शंकराचे शिवलिंग विराजमान आहे. गोमुखाजवळ शंकरजींची मूर्तीही विराजमान आहे, जी अतिशय सुंदर आहे, इतर मूर्ती गोमुखाजवळ बसलेल्या आहेत जसे की कालीजीच्या दुर्गाजी आणि गणेशजींच्या इतर मूर्ती विराजमान आहेत.
उमा घाट: ग्वारीघाटावरील दुसरा घाट म्हणजे उमा घाट, सिद्ध घाटाच्या पुढे गेल्यास हा घाट पाहायला मिळतो. उमा घाट हा खूप छान घाट आहे. या घाटात भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांच्या मूर्तीही स्थापन केलेल्या आहेत.
जिलहरी घाट: जिलहरी घाट हा देखील ग्वारीघाटाचा घाट आहे. हा घाट ग्वारीघाटाच्या मुख्य घाटापासून हाकेच्या अंतरावर आहे, याठिकाणी आम्ही मुक्कामासाठी थांबलो आहोत.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar #जबलपुर #jabalpur
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा