सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (७८ )

 !!आमची नर्मदा परिक्रमा !! (७८ )

    आमचा कालचा मुक्काम जबलपूर येथील जिलहरी घाट येथे होता. सध्या या परिसरात थंडीचे प्रमाण जबरदस्त आहे. अगदी थोड्याच वेळात आपलं हातपाय सुंभ पडतात. आम्ही थोडं उशिरा चालण्यास सुरुवात केली. जबलपूरपासून बरेला फक्त पंधरा किलोमीटरवर आहे. दोन्ही शहरातील अंतर कमी असल्याने रस्त्याच्या दुतर्फा गृहप्रकल्प दिसून आले.



        आज संपूर्ण मार्गावर सर्वत्र आदरातिथ्य होत होते. सकाळी प्रथम सालीवाडा येथे सुधीर पाठक यांनी गाजर हलव्याचा अल्पोपहार दिला. याचीच पुनरावृत्ती सर्वत्र होत होती. काही लोकांनी दक्षिणाही दिली. लहानापासून थोरांपर्यंत " नर्मदे हर" चा गजर होत होता. आज वाटेत सालीवाडा, बरेला, रिझई, देवरी, बमणी आदी गावे लागली.  आमचा आजचा मुक्काम धनपुरी येथे आहे. गेले तीन दिवस आम्ही जबलपूरच्या जवळपास होतो. थोडीफार माहिती जबलपूरबद्दल दिली पाहिजे.

         जबलपूर हे  मध्य प्रदेशातील महत्वाचे शहर आहे . येथे मध्य प्रदेश उच्च न्यायालय आणि राज्य न्यायिक अकादमी आहे याठिकाणी मध्य प्रदेश राज्यातील सर्व न्यायाधीशांचे प्रशिक्षण घेतले जाते. येथे राज्य विज्ञान संस्था आहे. याला मध्य प्रदेशची 'संस्कारधानी' देखील म्हणतात आणि जबलपूरला मध्य प्रदेशची न्यायिक राजधानी देखील म्हणतात. येथे मिलीटरीचा फार मोठा कॅम्प आहे. तसेच शस्त्रास्त्र निर्मितीचे कारखाने आहेत. पश्चिम-मध्य रेल्वेचे मुख्यालय देखील जबलपूर येथे आहे.

     पुराण आणि पौराणिक कथांनुसार, या शहराचे नाव पूर्वी जबलीपुरम होते, कारण ते महर्षी जबाली यांच्याशी संबंधित आहे. येथे ते वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. १७८१ नंतर हे शहर मराठ्यांचे मुख्यालय म्हणून निवडले गेले . नंतरच शहराचा विकास झाला. आजही या शहरात १०% लोक मराठी भाषिक आहेत. जबलपूरची नगरपालिका १८६४ साली स्थापन झाली. या परिसरात अनेक तलाव आहेत, आता फक्त काहीच तलाव शिल्लक आहेत. शिक्षण क्षेत्राचा विचार केला तर येथे अनेक सुविधा आहेत. या शहरात पर्यटकांची देखील खूप वर्दळ असते.

     आज सकाळपासून आमचे सर्वच लोकांनी आदराने स्वागत केले. या गोष्टी संस्काराशिवाय होऊ शकत नाहीत. या परिसरातला अनुभव वेगळाच आला. मोठी माणसे संस्कारक्षम असतील तर पुढची पिढी आपोआपच संस्कारक्षम होते. आपणही आपली पुढची पिढी अधिक संवेदनशील, संस्कारक्षम होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करुया.

   राजेंद्र पवार 

 ९८५०७८११७८

#नर्मदापरिक्रमा #shivaputri #narmadariver #narmadaparikrama #satarakar #Narmada #jabalpur #jabalpurdiaries #narmadapuram

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...