शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (३८ )

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (३८ )

     आमचा कालचा मुक्काम झरीया गावातील पंचमुखी हनुमान मंदिरात होता.याठिकाणी सदाव्रताची सोय  होती मात्र भोजन बनवण्यास खूपच उशीर झाला त्यामुळे सकाळी थोडे नेहमीपेक्षा उशिराच निघालो. झरीयापासून २ किलोमीटर अंतरावर नर्मदा नदीवरचा मोठा कॅनॉल पहायला मिळाला. यापूर्वी  एवढा मोठा कॅनॉल मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला. कॅनालच्या दोन्ही बाजूस डांबरी रस्ता आहे.हे दृश्य खूपच मनोहारी होते.




           सुरुवातीचा काही चालणे पक्क्या रस्त्याने तर काही पायवाटेने, पाणंद रस्त्याने होते.ओढ्यावर पुरदर्शक फलक लावलेले होते. या फलकामुळे लोकांना सूचना मिळते ,धोका संभवत नाही.            

 

               सकाळी छोटा उदेपुर  जिल्ह्यातील जीवनपुरा गावातील अंबा माता मंदिरात आलो. हे मंदिर टेकडीवर आहे. मंदिराचा परिसर भव्य आहे. येथे आम्ही कपडे धुतली,भोजन प्रसाद घेऊन निघालो. आम्हाला बोरियाद गावी यायचे होते परंतु आम्हाला गाव लवकर सापडलेच नाही. याठिकाणी आमची सोय होण्यात खूपच अडचणी आल्या.

          परिक्रमेत कोणत्या अडचणी कधी येतील हे काही सांगता येत नाही. प्रत्येक माणसाला काहींना काही अडचणी येतात,आपण अडचणीवर मात  करायला शिकले पाहिजे असे मला वाटते.

      राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८


#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...