मंगळवार, १८ जानेवारी, २०२२

!!आमची नर्मदा परिक्रमा !!(४१ )

  !!आमची नर्मदा परिक्रमा !!(४१ )

     आमचा कालचा मुक्काम  छोटा उदेपुर जिल्ह्यातील कडीपाणी येथे होता. कडीपाणीपासून बखतगढपर्यंत यायचे होते. हा संपूर्ण रस्ता पाऊलवाटेचा असल्याने थोडे उशिरा निघालो. आज गुजरात राज्य सोडले. गुजरातमध्ये स्वाध्याय परिवाराचे काम खूप मोठे आहे. गुजरातमध्ये बऱ्याच ठिकाणी योगेश्वर कृषी व घर मंदिर असे बोर्ड पहायला मिळाले.









  योगेश्वर कृषीबाबतची माहिती ..…

     स्वाध्याय परिवाराचा योगेश्वर कृषी एक भाग आहे. यामध्ये एखाद्याचे शेत ठराविक खंडाने घेतले जाते. स्वाध्याय परिवारातील लोक यामध्ये कष्ट करीत असतात. शेतकऱ्याचा खंड देऊन राहिलेले उत्पन्न हे स्वाध्याय परिवाराचे असते. हे मिळालेले उत्पन्न परिवाराच्या मुख्यालयाकडे पाठवले जाते. जर परिवारातील एखाद्या सदस्यास आर्थिक मदतीची गरज असेल तर यंत्रणेस माहिती देऊन गरजू व्यक्तीस ती मदत प्रसाद म्हणून पोहोचवली जाते. ज्याला मदत केली त्यांनी त्याची मागणी केली पाहिजे असा भाग नाही.

     घर मंदिर बाबतची माहिती....

     यामध्ये आठवडाभरासाठी योगेश्वर, पार्वती गणेश,पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी),भगवान शंकर यांच्या प्रतिमांचे पूजन घरात केले जाते. घराला मंदिराचे स्वरुप आलेले असते.या धार्मिक वातावरणामुळे कुटुंबात/समाजात सात्विक वातावरण निर्माण होते. समाज एकसंघ होतो.

 Other is not other but he is your devine brother.  दुसरी व्यक्ती, दुसरी व्यक्ती राहत नसून ती आपली बंधु बनते.घर मंदिरामध्ये त्रिकाल संध्या होत असते. यानिमित्ताने स्मृती, शक्ती, शांती मिळत असते.

     आज कडीपाणी ते बखतगढ हे चालणे पाऊलवाटेने झाले. हे चालणे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात झाले. सदाव्रताच्या माध्यमातून दुपारचा भोजन प्रसाद मिळाला.  मुक्कामासाठी कोसरिया येथे  आलो. बखतगढ ते कोसरिया हा रस्ता सिमेंट काँक्रिटचा असल्याने चालणे सुसह्य झाले.वाटेत अंबे माता व राणी काजल माता मंदिर अशी मंदिरे लागली. दोन्ही ठिकाणी आम्ही थोडा वेळ थांबलो.

       शेतीबाबत विचार करावयाचा झाला तर मोठ्या प्रमाणात मक्याची, मोहरीची तसेच फळबाग लागवड असलेली आढळली. फळबाग लागवडीमध्ये अंतर पीक आढळून आले. फळबाग लागवडीमध्ये आंतरपीके खूपच चांगली होती. आपणसुध्दा मिश्र पीक, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा व आपले उत्पन्न वाढवावे असे मला वाटते.

     राजेंद्र पवार 

  ९८५०७८११७८


#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा  #satara #satarakar

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...