!!आमची नर्मदा परिक्रमा !! (४० ) हंफेश्वर तीर्थक्षेत्राचे महात्म्य....
आमचा कालचा मुक्काम कवांट या तालुक्याच्या ठिकाणी होता. आम्हाला हंफेश्वर येथे जावयाचे होते. कवांट ते हंफेश्वर हे अंतर १८ किलोमीटरचे आहे. वाटेत कडीपाणी नावाचे मोठे गाव आहे. येथे जवाहर नवोदय विद्यालय आहे. आम्ही कडीपाणीस साडेदहालाच पोहोचलो. येथून पुढचा रस्ता खूपच अवघड असल्याचे सांगितले. बहुतेक लोक हंफेश्वरला जात नाहीत कारण हंफेश्वरहून पुन्हा कडीपाणीस यावे लागते.
आम्ही हंफेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेतले.मूळचे मंदिर धरण क्षेत्रात बुडले आहे. सध्याचे मंदिर नव्याने बांधले आहे. मंदिर परिसर खूपच छान आहे. सध्या हा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरला आहे.
हंफेश्वर तीर्थक्षेत्राचे महात्म्य....
मार्कंडेय ऋषींनी युधिष्ठिराला ही कथा सांगितली होती तीच कथा आपल्या माहितीसाठी ....
कलहंस ऋषी भगवान शंकराची तपस्या करीत होते, इंद्र भगवान कलहंस ऋषींची परीक्षा घेण्यासाठी आले, त्यांनी कलहंस ऋषींना विचारले ," तुम्हाला काय हवंय" मला फक्त भगवान शंकराचे दर्शन हवे आहे.इंद्र भगवान यांच्या आशीर्वादाने भगवान शंकराचे दर्शन कलहंसऋषींना झाले. या स्थानाचे महात्म्य वाढवण्याचे काम कलहंसेश्वर ऋषींनी केले.
याठिकाणी जी व्यक्ती पूजा, दान, हवन, सत्कर्म करेल यांचा स्वर्गलोकात वास असेल (मोक्ष मिळेल) असे वचन शंकर भगवान यांनी दिले.याठिकाणी येणारे परिक्रमावासी, भक्तजन हे उंच टेकड्या खोल दऱ्याखोऱ्यामधून येतात. त्यांची श्वासोच्छ्वासाची क्रिया वाढते. त्यांना थकवा येतो. (हाफ वाढते) दम लागतो. म्हणून या जागेला हंफेश्वर महादेव असे नाव पडले आहे. आम्हाला दुपारचा भोजन प्रसाद हंफेश्वर याठिकाणी मिळाला. आजचा मुक्काम कडीपानी येथील नीलकंठ महादेव मंदिरात आहे.
आज कलहंस ऋषींनी तपश्चर्या केलेले ठिकाण पहावयास मिळाले. प्राचीन ऋषीमुनींनी तपश्चर्या करुन त्या त्या स्थानाचे महत्व वाढवले आहे. आपणही चांगले काम करुन आपल्या गावाचे ,परिसराचे नाव वाढवावे असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#shivaputri #narmada #narmadaparikrama #narmadariver #नर्मदापरिक्रमा #satara #satarakar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा