!!आमची नर्मदा परिक्रमा !! (१३ )
आमचा शनिवार दिनांक ४ डिसेंबरचा मुक्काम मेकलसुता धाम बडवानी येथे होता. मला माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे पाच दिवस परिक्रमा सलग करता आली नाही. मी पुन्हा नव्याने बडवानीपासुन परिक्रमेस सुरुवात केली आहे.आज मला बडवानी शहरातून जावे लागले. शहर स्वच्छतेच्या बाबतीत खूपच चांगले वाटले. शहरापासून पाच सहा किलोमीटरपासून रस्ता नागमोडी वळणाचा लागला. कल्याणपुरा, गणेशपुरा, कठरा, पिछोडी सारखी बरीचशी पुनर्वसित गावे लागली.
आजचा परिसर डोंगराळ असल्याने जमिनीची सलगता नव्हती. बराचसा उंचसखलपणा दिसून आला. याठिकाणी पेरणीची पध्दती समतलचर पध्दतीची आढळून आली. ठिबकसिंचन पध्दतीचा वापर दिसून आला. वाटेत गोय नावाची नदी आढळून आली. नदीकाठचा परिसर समृध्दच आहे.
आजचा मुक्काम भवती या पुनर्वसित गावात आहे. माणसे मनानं खूपच मोठी आहेत. आज मला शेतीच्या बाबतीत लोकांनी केलेला प्रयोग आवडला. जमिनीच्या उताराप्रमाणे पेरणी करावी. त्यामुळे पिकाला पाणी मिळणे सोपे होते. जेथे अगदीच चढउतार आहे तेथे ठिबकद्वारे पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. आपणसुध्दा जमिनीचा चढउतार बघून पेरणी तसेच पाणी देण्याची व्यवस्था करावी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadaparkrama
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा