!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१४ )
आम्ही काल रात्री घोंगसा या आश्रमात मुक्काम केला होता. या मुक्कामात उघड्यावर झोपावे लागल्याने थंडी काय असते ते प्रकर्षांने जाणवले. नदीकिनारी प्रकाशाची व्यवस्था नसल्याने सकाळी आंघोळीचा आनंद लुटता आला नाही.घोंगसापासून भिलगावपर्यंत बोटीची व्यवस्था असल्याने आम्ही बोटीचा आधार घेतला.सात तासाच्या प्रवासानंतर आम्ही भिलगावला पोहोचलो. नर्मदा नदीच्या दोन्ही काठावर उंचच उंच डोंगर टेकड्या आहेत.
भिलगावला आश्रमशाळेत मुक्कामाची सोय केली जात होती ती व्यवस्था करण्याचे आता बंद केले आहे त्यामुळे मुक्कामाची व्यवस्था करताना कसरत झाली. भिलगावमध्ये सुखलाल पावरा यांनी आमची निवासाची सोय केली.सदाव्रताचा अनुभव आजही घेता आला. आमच्याबरोबर असणाऱ्या महिलांनी खिचडी बनवली.परिक्रमेत कोणता प्रसंग कधी येईल हे सांगता येत नाही.
आपण कोणत्याही प्रसंगाला सामोरे जायची तयारी ठेवली पाहिजे हेच आजच्या दिवसाने दाखवून दिले असे मला वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#नर्मदा #narmada #narmadaparikrama #narmadamai #narmadariver
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा