गुरुवार, ३० डिसेंबर, २०२१

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (१५ )

!!आमची नर्मदा परिक्रमा !! (१५ )

           आज सकाळी साडेसहा वाजता चालायला सुरुवात केली. रस्ता जरी डांबरी असला तरी सुरुवातीचे दहा बारा किलोमीटर दोन्ही बाजूला सागवानाची झाडे होती. दहा किलोमीटर चालल्यावर उदय नावाची नदी लागली. तेथे स्नानाचा आनंद लुटला. परिक्रमेत स्वतःची कामे स्वतःलाच करावी लागतात. कपडे धुणे हे नित्याचेच काम असते,आज त्याचाही आनंद लुटला. वाटेत दुकाने भरपूर पण चहा घ्यायचं म्हटलं तर हॉटेल नाही अशीच परिस्थिती सर्वत्र दिसून येत होती.




 

             आजचे चालणं आपल्याच राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातून झालं. वाटेत राजबर्डी येथे शासकीय आश्रमशाळा लागली तेथे धनराज पाटील या कामाटी म्हणून काम करणाऱ्या माणसानं चहा ऐवजी जेवणच दिले. परिक्रमेत काही मिळाले तर नाकारायचे नसते असा प्रघात आहे नाहीतर पुढे वाईट अनुभव येण्याची शक्यता असते.

             आज आम्ही ३३ किलोमीटर चाललो. वाटेत धडगाव हे तालुक्याचे ठिकाण लागले याठिकाणी पूर्वी वर्णे येथे काम करत असलेले पराडके सर यांचे नातेवाईक डॉ. भगवान यांनी आमचे मोठे आदरातिथ्य केले. आज धडगावचा आठवडी बाजार होता. याठिकाणी जनावरांचा बाजार खूप मोठा भरत असल्याचे दिसून आले. धडगावला यात्रेचे स्वरुप आले होते. या परिसरातील वाहतूक व्यवस्था भयानक जाणवली. जागा मिळेल तेथे माणसे बसत होती, उभी राहत होती, गाडीत कमीतकमी पन्नासएक माणसे तरी असतील अशी स्थिती होती.

      आजचा मुक्काम  नंदुरबार जिल्ह्यातील अक्रनी तालुक्यातील खुंटामौडी आश्रमात होता. आजचं भोजनही परिक्रमावासीयांनीच केले.

                  आज वाहतूक व्यवस्थेने जास्त लक्ष वेधून घेतले. आपल्याकडे गतीचा नियम मोडला तरी एक हजार रुपयांपेक्षा जास्त दंड आणि येथे पोलिसांच्या साक्षीने वडाप जोरात अशी स्थिती. लोकांच्या जीविताचा विचार केला नियमांची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक असावे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार

     ९८५०७८११७८   

#नर्मदा #नर्मदापरिक्रमा #narmada #narmadariver 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...