बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! ( ९ )       

        आमचा रात्रीचा मुक्काम विश्वनाथ खेडा या छोट्या गावातील रामदेव बिर मंदिरात होता.  मंदिरात दोन वेळा आरती होत असते, आरतीच्या वेळी ग्रामस्थांच्या बरोबर गावातील कुत्रीसुध्दा आर्त स्वरूपात प्रतिसाद देतात हे प्रत्यक्ष अनुभवता आले. यावेळी विजेवर चालणारा वाद्यांचा संच पाहिला. वाटेत  दर १०/११ किलोमीटरवर परिक्रमावासीयांची  थांबण्याची व्यवस्था असते.








            आज तलवाडा डेब येथे दुपारच्या भोजन प्रसादाची व्यवस्था शशांक मुलेवा यांनी केली होती. शशांक मुलेवा हे तलवाडा डेब येथे सी. बी. एस. ई. पॅटर्नची शाळा चालवतात.त्याशाळेला भेट देण्याचा योग आला. ही विनाअनुदानित शाळा असून येथे शिक्षणाचा मूलभूत अधिकार या अंतर्गत होणारे २५% प्रवेश शत प्रतिशत होतातच. थोडक्यात या शाळेकडे पालकांचा ओढा जास्त असल्याचे दिसून आले. आजचे जेवण आपल्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणाऱ्या पुरणपोळी सारखे म्हणजे  "दाल बाटी" हे होते. प्रत्येक परिक्रमावासियाला कुंकूमतीलक लावला जात होता. दक्षिणा दिली जात होती. यामधून परिक्रमावासीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती उदात्त आहे हे सहज लक्षात येते.

             मार्गावर आपणास काही अडचण आल्यास निश्चितपणे मदत होते. आमचे सहप्रवासी गोरख चव्हाण यांचा पाय मुरगळला होता. आमची अडचण बघून मुलेवा यांनी आपल्या शाळेतील हाडांची माहिती असणारे शिक्षक योगेश पाटीदार   यांना बोलावून घेतले.त्यांनी पाय चोळला, थोडासा आराम वाटू लागला. आम्ही सेवेसाठी तत्पर असाच अनुभव  याठिकाणी आला. आज पावसामुळे येथेच थांबावे लागत आहे. सेवेत काहीच अडचण नाही. 

Service to man  is  service to God. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा  होय. मनुष्याचा जन्म सेवा करण्यासाठी आहे म्हणून आपणालाही जेवढी जनतेची सेवा करता येईल तेवढी केली पाहिजे असे मला वाटते.

    राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८

#narmada #narmadaparikrama #narmadariver #narmadamai

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...