!! आमची नर्मदा परिक्रमा !! (८ )
आमचा रात्रीचा मुक्काम चिचली येथे होता.चिचली येथे महिलांना जास्त प्राधान्य दिसून आले. रात्री महिलांचे भजन ऐकायला मिळाले. त्यांची भाषा निमाडी असल्याने आम्हाला नेमकं काय म्हणतात ते कळत नव्हते. परंतु त्या भजनातून प्रभू रामचंद्राचे स्तवन करत होत्या.गाव छोटेशे असल्याने खर्चाची व्यवस्था धान्य गोळा करुन, देणगी मिळवून केली जाते. यात गावातल्या प्रत्येक कुटूंबाचा सहभाग असतो. गावातल्या प्रत्येकाचा सहभाग असेल तर कोणतेच काम अवघड वाटत नाही हेच या गावावरुन दिसून आले. आज १७ किलोमीटरच चाललो. वाटेत एका ठिकाणी टेम्पोत केळी भरण्याचे काम चालू होते. बागेतून केळी आणणे,केळीचे घड वेगळे करणे, द्रावणात बुडवणे, वेष्टण गुंडाळणे, ट्रेमध्ये भरणे ,रॅपनिंग चेंबर्सपर्यंत पोहच करणे असे होते.
आज दुपारच्या भोजन प्रसादाची व्यवस्था ब्राह्मणगाव येथे झाली होती. गावात दोन हेमाडपंथी शिवमंदिरे होती.
रात्रीचा मुक्काम विश्वनाथखेडा येथे होता. गाव पुनर्वसित असल्याने खूपच सुंदर होते.भौतिक समृद्धीबरोबर आध्यात्मिक समृध्दी स्पष्टपणे जाणवत होती. येथे परवलीचा नामोच्चार आहे,"नर्मदे हर".लहान मुलांपासून मोठी माणसे "नर्मदे हर" म्हणून आपलं स्वागत करताना दिसतात. आपणही येणाऱ्या अतिथींचे " नमस्कार " म्हणून स्वागत करायला हवे. लहानपणापासून आपण मुलांना अशी सवय लावायला हवी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadaparikrama #narmadariver
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा