बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

!! आमची नर्मदा परिक्रमा !! (१० )

 !! आमची नर्मदा परिक्रमा !! (१० )

  पावसाळी वातावरणामुळे आमचा रात्रीचा मुक्काम तलवाडा डेब येथेच होता.आम्ही दुपारी भोजन प्रसाद घेतल्यानंतर कपिलेश्वर लोहारा याठिकाणी मार्गस्थ झालो. फक्त ५ किलोमीटरवर पांडवकालीन कपिलेश्वर मंदिर आहे. हा परिसर तपोभूमी म्हणून ओळखला जातो. नर्मदातटी असणारा हा वृक्षराजीने नटलेला भूभाग आहे. 


         

             कपिलेश्वर मंदिरापासून थोड्याच अंतरावर सिद्धेश्वर मंदिर आहे. हे  मंदिर ५००० वर्षांपूर्वीचे असावे असे महंतांनी सांगितले. येथील पिंडीवर अकरा जोतिर्लिंगे  तसेच नाग आणि नागीण प्रतिकात्मक स्वरुपात कोरली आहेत. पिंडीच्या वरती शिखराचे घुमट श्रीयंत्राच्या स्वरुपात आहे. येथे एकदा केलेली प्रार्थना सहस्त्रपटीने फलदायी ठरते असेही सांगितले. अशा ठिकाणचा शिवभक्तांनी अनुभव घ्यावा असे वाटते. मंदिर परिसरात गोशाळा उभारणीचे काम चालू आहे.  आपणही आपापल्या परिसरात गोसंवर्धनाच्या उपक्रमात  यथाशक्ती  मदत करावी असे वाटते. 

     राजेंद्र पवार 

    ९८५०७८११७८


#narmada #narmadaparikrama #narmadariver #narmadamai #shiva

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

!!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!

 !!ग्रीन पुणे मान्सून हिल मॅरेथॉन२०२५ !!              आज रविवार दिनांक १३ जुलै २०२५ रोजी पुणे येथे" ग्रीन पुणे मान्सून हील मॅरेथॉनचे ...