!! आमची नर्मदा परिक्रमा !!( ७ )
आमचा कालचा मुक्काम शालिवाहन - नावडाटोवडी येथे होता. आम्ही सकाळी ६.३० वाजताच चालण्यास प्रारंभ केला. बराचसा रस्ता नदीकिनाऱ्यानेच होता. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपेच होती. नदीकिनारीची डगरट काय प्रकार असतो हे जवळून अनुभवता आले. सकाळी ९ वाजताच ढालखेडा येथील आश्रमात विसावलो. हा आश्रम सातारा जिल्ह्यातील फलटण येथील महाराज चालवतात. नदीकाठी आपणास अनेक शिवमंदिरे दृष्टीस पडतात. मा नर्मदा शिवकन्या आहे. तिचीही मंदिरे आपणाला अनेक ठिकाणी पहायला मिळतात. तासाभरातच आम्ही बलगाव आश्रमात पोहचलो. आश्रमाचा परिसर खूपच विस्तीर्ण आहे. शेजारी मोठी गोशाळा आहे.
खलघाट येथे सद्गुरु जोग महाराज (आळंदी देवाची ) येथे अन्नछत्र चालवले जाते. बाजरीची ताजी भाकरी, खर्डा, बटाटा भाजी यामुळे घरचे जेवण केल्याचा आनंद मिळाला. आज आम्ही २५ किलोमीटर अंतर सहजच पार केले. काही ठिकाणी केळीच्या बागाच बागा होत्या, रॅपनिंग चेंबर बघायला मिळाले. या परिसरात पशुधन जास्त आहे त्यामुळे प्रत्येक गावात जनावरांना पाणी पिण्यासाठी हौद बांधलेले आहेत. आज रात्रीचा मुक्काम चिचली या नर्मदाकाठच्या गावी होता.येथे सायंकाळी महिलांच्या हस्ते शिवप्रार्थना करण्यात आली. सगळीकडे पुरुषच पुढे दिसतात येथे मात्र महिलांना मानसन्मान मिळत असल्याचे दिसते. ज्यावेळी महिलांना मानसन्मान मिळतो तो समाज पुढे गेलेला दिसतो. आपणही आपल्या घरी,ज्या ज्या ठिकाणी सामाजिक उपक्रमात संधी मिळेल तेथे महिलांना संधी द्यायला हवी असे वाटते.
राजेंद्र पवार
९८५०७८११७८
#narmada #narmadaparikrama #parikramavasi #narmadariver #shivkanya #shiva #lordshiva #satara #faltan #alandi #devachialandi #maheshwar
खूप छान, सर
उत्तर द्याहटवाखूपच छान, पुढील प्रवासास शुभेच्छा
उत्तर द्याहटवा